सावंतवाडी : रात्रीची संचारबंदी असतनाही गोव्याची अवैध दारू मोठ्या प्रमाणात जिल्ह्यात येत आहे. पोलिसांचे कडेकोट बंदोबस्त असून, पोलीसही चांगलेच सतर्क झाले आहेत. रात्री पोलिसांनी धडक कारवाई करीत आंबोली व आरोंदा येथील दूरक्षेत्रावर दोन कारसह दीड लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. तर तिघांना ताब्यात घेण्यात आले आहे. ही कारवाई रात्रीच्यावेळी करण्यात आल्याचे पोलिसांनी सांगितले.सध्या रात्रीची संचारबंदी असून, सर्वत्र कडेकोट पोलीस बंदोबस्त ठेवण्यात येतो. मात्र, अवैध दारू वाहतूक करणारे पोलिसांना चकवा देऊन दारू घेऊन जातात. मात्र, लॉकडाऊनमुळे पोलिसांनी सर्वच वाहने तपासणी केली. यात आरोंदा येथे वाहनांची तपासणी करताना कारमध्ये ५१ हजार रुपये किमतीची दारू जप्त करून चालक विशाल वासुदेव घाटोळ (२७, रा. आरोंदा) याला ताब्यात घेतले.दुसरी कारवाई आंबोली पोलिसांनी केली. असून आंबोली दूरक्षेत्रावर तपासणी केली असता कारमध्ये ९८ हजार ३०० रुपये किमतीची दारू जप्त केली. या प्रकरणी सांगली येथील कारचालक यासिर शब्बीर मुजावर (२८) व मोहीम हुमायूँ शेख (२८) या दोघांना ताब्यात घेतले. अधिक तपास सावंतवाडी पोलीस करीत आहेत.गोवा बनावटीची दारू जप्तपोलिसांनी बुधवारी रात्री तिघांना ताब्यात घेत दोन कार जप्त केल्या आहेत. या सर्वांना गुरुवारी न्यायालयासमोर हजर करण्यात येणार असल्याचे पोलिसांनी सांगितले. मागील वर्षाही कोरोनामुळे लॉकडाऊन करण्यात आले होते. या काळात ही मोठ्या प्रमाणात गोवा बनावटीची दारू जप्त करण्यात पोलिसांना तसेच उत्पादन शुल्क विभागाला यश आले होते.
मिनी लॉकडाऊनमध्ये दारू वाहतूूक तेजीत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 09, 2021 4:20 PM
Sawantwadi LiqerBan Sindhudurg: रात्रीची संचारबंदी असतनाही गोव्याची अवैध दारू मोठ्या प्रमाणात जिल्ह्यात येत आहे. पोलिसांचे कडेकोट बंदोबस्त असून, पोलीसही चांगलेच सतर्क झाले आहेत. रात्री पोलिसांनी धडक कारवाई करीत आंबोली व आरोंदा येथील दूरक्षेत्रावर दोन कारसह दीड लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. तर तिघांना ताब्यात घेण्यात आले आहे. ही कारवाई रात्रीच्यावेळी करण्यात आल्याचे पोलिसांनी सांगितले.
ठळक मुद्देमिनी लॉकडाऊनमध्ये दारू वाहतूूक तेजीत तिघे ताब्यात : आंबोली, आरोंद्यात दोन कार जप्त