कुडाळ : बेकायदेशीर गोवा बनावटीची दारू वाहतूक करताना सुमारे १ लाख १५ हजार २४ रुपये किमतीच्या दारूसह ८० हजारांची चारचाकी मिळून सुमारे १ लाख ९५ हजारांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. राज्य उत्पादन शुल्क कुडाळ कार्यालयामार्फत सावंतवाडी तालुक्यातील कोंडुरा येथे ही कारवाई करण्यात आली. या प्रकरणी दोघांना ताब्यात घेण्यात आले आहे.गोव्यावरून सातार्डामार्गे बेकायदेशीर दारू वाहतूक होत असल्याची माहिती उत्पादन शुल्क विभागाच्या कुडाळ येथील पथकाला मिळाली. याबाबत पथकाने पाळत ठेवत बेकायदेशीर दारूवाहतूक करणाऱ्या वाहनाचा पाठलाग करीत कोंडुरा येथे दारू वाहतूक करणारे वाहन पकडण्यात यश मिळविले.या वाहनाची झडती घेतली असता गोवा बनावटीच्या दारुचे १९ खोके गाडीमध्ये आढळून आले. या दारुची किंमत १ लाख १५ हजार २४ रुपये असल्याचे सांगण्यात आले. तसेच ८० हजार रुपये किमतीची चारचाकीही जप्त करण्यात आली.एकूण १ लाख ९५ हजार २०० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आल्याचे सांगण्यात आले. मात्र, या कारवाईबाबत गुप्तता पाळण्यात आली. ही दारू मालवण येथे न्यायची होती. मात्र, राज्य उत्पादन शुल्कच्या पथकाने धाड टाकून दारू जप्त केली आहे.
दारू वाहतूक : दोघे ताब्यात, सावंतवाडी तालुक्यातील कोंडुरा येथे कारवाई
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 07, 2020 2:53 PM
बेकायदेशीर गोवा बनावटीची दारू वाहतूक करताना सुमारे १ लाख १५ हजार २४ रुपये किमतीच्या दारूसह ८० हजारांची चारचाकी मिळून सुमारे १ लाख ९५ हजारांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. राज्य उत्पादन शुल्क कुडाळ कार्यालयामार्फत सावंतवाडी तालुक्यातील कोंडुरा येथे ही कारवाई करण्यात आली. या प्रकरणी दोघांना ताब्यात घेण्यात आले आहे.
ठळक मुद्देदारू वाहतूक : दोघे ताब्यात सावंतवाडी तालुक्यातील कोंडुरा येथे कारवाई