सिंधूदुर्गनगरी दि. १९ :- जिल्हयातील यांत्रिकी, बिगर यांत्रिकी सर्व नौकांना व्हेसल ट्रॅकिग सिस्टीम बसविण्यासाठी कृती आराखडा तयार करण्याची सूचना मत्स्यव्यवसाय मंत्री महादेव जानकर यांनी मंत्रालयात आयोजित बैठकीत केली. या बैठकीस सिंधूदुर्गचे पालकमंत्री दिपक केसरकर, मत्स्यव्यवसाय विभागाचे सचिव विकास देशमुख, आयुक्त गोविंद बोडके, उपसचिव गुरव, उपायुक्त री. चौगुले, मत्स्यव्यवसाय अधिकारी प्रदीप वस्त आदि उपस्थित होते.
मंत्रलायात आयोजित या बैठकीत सिंधूदुर्गातील मत्स्यव्यवसायाच्या विविध अडचणीबाबत सविस्तर चर्चा करण्यात आली. मासेमारी अंतर्गत१९८१ च्या अधिनियमामध्ये कालपरात्वे बदल करावयाचे असतील याबाबत मत्स्यव्यवसाय विभागाने आवश्यक कार्यवाही सुरु करावी, मत्स्यव्यवसाय सुरळीत सुरु राहवा यासाठी गृहविभागाने कोणती कार्यवाही करावी याबाबत गृह विभागास मत्स्यव्यवसाय विभागाने प्रस्ताव द्यावा, मत्स्य उत्पादन वाढावे याबाबत चांदा ते बांदा या महत्वकांक्षी कार्यक्रमांतर्गत विविध योजना घेण्याबाबत मंगळवारी मंत्रालयात बैठक आयोजित करावी, सोमवंशी अहवालानुसार बोटींची संख्या निश्चित करण्यासाठी अभ्यासगट नियुक्त करावा आदि निर्णय या बैठकीत झाले.