कुडाळ , दि. ३ : मराठी परिषद मुुंबईचे ५२ वे अखिल भारतीय मराठी विज्ञान अधिवेशन सिंधुदुर्ग येथे होत आहे. या अधिवेशनाच्या यजमानपदाचा मान वसुंधरा विज्ञान केंद्रास मिळाला आहे.
अधिवेशन १६, १७ व १८ डिसेंबर असे तीन दिवस नेरूरपार येथील वसुंधरा केंद्र येथे होणार असून उद्घाटक म्हणून गोव्याचे मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर उपस्थित राहणार आहेत. तर समारोपप्रसंगी प्रमुख अतिथी म्हणून केंद्रीय वाणिज्य व उद्योगमंत्री सुरेश प्रभू उपस्थित राहणार आहेत, अशी माहिती वसुंधरा केंद्राच्या विश्वस्तांच्यावतीने पत्रकार परिषदेत देण्यात आली.
या अधिवेशनाचे स्वरूप काय असेल आणि त्या पाठीमागची संकल्पना काय याची माहिती देण्यासाठी रविवारी पत्रकार परिषदेचे आयोजन केले होते. यावेळी वसुंधरा विज्ञानकेंद्राचे विश्वस्त सतीश नाईक, अविनाश हावळ, गजानन कांदळगावकर, दिप्ती मोरे, प्रदीप बर्डे, योगेश प्रभू, लक्ष्मीकांत खोबरेकर, अॅड. सुहास सावंत, डॉ. नंदन सामंत, डॉ. विवेक मंटोरो, गीता महाशब्दे, संध्या तेरसे आदी उपस्थित होते.
यावेळी माहिती देताना अविनाश हावळ, सतीश नाईक यांनी सांगितले की, वसुंधरा सार्वजनिक विश्वस्त न्यास ही संस्था वसुंधरा विज्ञान केंद्राद्वारे सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये विज्ञान प्रसाराचे कार्य करत आहे. दोन दिवसांच्या मुख्य अधिवेशन कार्यक्रमामध्ये एकूण ५ परिसंवादाचे आयोजन केले आहे.
या परिसंवादाचे अध्यक्षपद बॉम्बे नॅचरल हिस्ट्री सोसायटीचे संचालक डॉ. दीपक आपटे यांनी स्वीकारले आहे. त्यांच्यासोबत डॉ. मिहिर सुळे आणि केतकी जोग हे दोन वैयक्तिक सहभागी होणार आहेत.
सिंधुदुर्गातील सागरीजीव, त्यांचा सहसंबंध व नष्ट होत चालेल्या सागरी प्रजाती या विषयी अभ्यासपूर्ण चर्चा होणार आहे. तसेच बदलत्या हवामानाचा शेतीक्षेत्रावर होणारा दुष्परिणाम व त्यावर मात करून शाश्वत उत्पन्नासाठी शेतकºयांनी केलेले उपाय याविषयी मार्गदर्शन करण्यासाठी डॉ. श्रीरंग कद्रेकर, संजय पाटील हे देशी बियाणे संवर्धनासाठी कार्य करतात. शेतकरी आदिवासी यांच्यासोबत त्यांनी तीनशेहून अधिक भाताच्या जातीचे संवर्धन केले आहे. सिंधुदुर्गात सुरू असलेल्या पारंपरिक बियाणे संवर्धन यावर पाटील हे माहिती देणार आहेत.
जैवविविधता-या अधिवेशनात किटक, फुलपाखरे व पक्षी यांचे परागिकरण प्रक्रियेमध्ये खूप महत्त्व असते. त्यांच्यामधील वैविध्य व अधिवास यांचा देखील मागोवा या परिसंवादात घेण्यात येणार आहे. पश्चिम घाटातील जैवविविधता संवर्धन मोहिमेची माहिती देण्याकरिता आंतरराष्टÑीय वन्यजीव व वनस्पतीशास्त्र अभ्यासक डॉ. बिभास आमोणकर येणार आहेत.
नाविन्यपूर्ण महिलांच्या रोजच्या दिनक्रमात सहाय्यभूत होणाºया वस्तू व त्यावर आधारित उद्योग या विषयांवर आधारित परिसंवादामध्ये डॉ. प्रियदर्शनी मार्गदर्शन करणार आहेत. तर गृहिणींना स्वयंपाकघर ही परिपूर्ण अशी रसायन प्रयोगशाळा आहे याची जाणीव डॉ. वर्षा जोशी करून देणार आहेत. प्रयोगातून विज्ञान-वसुंधराची सुरूवात विद्यार्थ्यांमध्ये वैज्ञानिक दृष्टीकोन निर्माण करणे ह्या उद्देशाने करण्यात आली.
सिंधुदुर्गातील विद्यार्थी व शिक्षकांसाठी शिक्षण तज्ज्ञांच्या कार्यशाळा वसुंधरामध्ये होतच असतात. या अधिवेशनात सायन्स पार्क पुण्याचे डॉ. कान्हेरे व त्यांचे सहकारी विद्यार्थ्यांसाठी विज्ञानाचे प्रयोग सादर करणार आहेत. तसेच नवनिर्मिती लर्निंग फाऊंडेशन, पुणे येथील गीता महाशब्दे सर्वांसाठी गणित विषयांवर सादरीकरण करणार आहेत. सोनाली कुलकर्णी, सचिन खेडेकर कविता वाचन करणारतसेच घनकचरा व्यवस्थापनामध्ये सिंधुदुर्गचे नाव राष्टÑीय पातळीवर नेणारे रामदास कोकरे आॅलिव्ह रिडले कासवांचे संवर्धन करणारे भाऊ काटदरे यांचा सत्कार करण्यात येणार आहे. मनोरंजनात्मक कार्यक्रम-१५ डिसेंबर रोजी आबा आमटे यांच्या कवितांवर आधारित कवितावाचनाचा कार्यक्रम ठरविलेला आहे. अभिनेत्री सोनाली कुलकर्णी आणि सचिन खेडेकर सहकाºयांसोबत कविता सादर करणार आहेत.