शहरं
Join us  
Trending Stories
1
मुख्यमंत्रिपदावर आज दिल्लीत निर्णय; फडणवीसांना पसंती, मात्र समर्थकांना धक्कातंत्राची भीती
2
Today Daily Horoscope: आजचे राशीभविष्य: आजचा दिवस लाभदायी, धनलाभ संभवतो!
3
जम्मू-काश्मिरच्या खोऱ्यात दहशतवाद्यांचा खात्मा होणार; NSG कमांडो कायमस्वरूपी तैनात करण्यास गृह मंत्रालयाची मंजुरी
4
VI नंबर १, सन्मान कॅपिटल २, इंडियन ऑईल ३... ही अशी कोणती लिस्ट, ज्यात कोणालाही नकोय नाव?
5
शेअर बाजारातून चांगला रिटर्न मिळवण्याच्या मोहात गमावले ११ कोटी; अधिकाऱ्यासोबत काय घडले?
6
कोण होणार मुख्यमंत्री? विनोद तावडेंनी घेतली अमित शाहांची भेट; 40 मिनिटं चर्चा
7
सत्ता भल्याभल्यांना मोहात पाडते, पण...; श्रीकांत शिंदेंची वडील एकनाथ शिंदेंबाबत भावुक पोस्ट
8
डिसेंबरमध्ये भाजपाच्या नवीन अध्यक्षांची निवड; निरीक्षकांच्या केल्या नेमणुका
9
शिंदे म्हणतात, ‘लढाई’ जिंकली, पण ‘युद्ध’ बाकी; २५ तारखेच्या दिल्लीतील बैठकीत काय घडलं?
10
मविआला पहिला धक्का?; मुंबई महापालिका स्वबळावर लढण्याची उद्धवसेनेची इच्छा
11
सोनिया, राहुल, प्रियांका - संसदेत तिहेरी तोफ; संसदीय इतिहासात पहिल्यांदाच एकत्र
12
डोंगरीत बहुमजली इमारतीला भीषण आग; पाच जखमी; ४० रहिवाशांची सुखरूप सुटका
13
कुजबुज: मोदी-शाहांचे आभार मात्र फडणवीसांचं नावही घेतलं नाही, शिंदेंची नाराजी का?
14
मुंबईतील दुर्दैवी घटना! डंपरच्या धडकेत मायलेकाचा मृत्यू; शाळेत जाताना काळाचा घाला
15
राज्याला भरली हुडहुडी! मुंबईसह उत्तर महाराष्ट्राला थंडीच्या लाटेचा इशारा
16
मानसिक छळाला कंटाळून एअर इंडियाच्या महिला पायलटनं उचललं टोकाचं पाऊल, मित्राला अटक
17
विधानसभा निवडणुकीतील पराभवानंतर स्वबळाची भाषा सुरू; मविआ फुटीच्या उंबरठ्यावर?
18
महापालिका निवडणुकीत पक्षाचे अस्तित्व टिकवण्याचे उद्धव ठाकरेंसमोर कडवे आव्हान
19
३० तारखेपर्यंत शपथविधी व्हायला हवा, अडीच वर्षांपूर्वीची परिस्थिती वेगळी, आताची वेगळी; अजित पवारांचे मुख्यमंत्रीपदावर वक्तव्य
20
नव्या सरकारमध्ये तुमचे स्थान काय असेल? उपमुख्यमंत्री की गृहमंत्री? एकनाथ शिंदेंचे सूचक विधान

सर्व गर्भलिंगनिदान केंद्रांची तपासणी सुरू

By admin | Published: May 14, 2017 10:49 PM

अशी माहिती राज्याचे आरोग्यमंत्री डॉ. दीपक सावंत यांनी दिली.

लोकमत न्यूज नेटवर्कदेवगड : म्हैसाळ येथील स्त्रीभ्रूणहत्या प्रकरण शासनाने गांभीर्याने घेतले असून, राज्यातील सर्व गर्भलिंगनिदान केंद्रांची तपासणी सुरू आहे. बेकायदेशीररीत्या सुरू असलेली केंद्रे बंद करण्यात आली असून, काहींवर कायदेशीर कारवाई करण्यात आली आहे. सिंधुदुर्ग जिल्ह्यात अशा प्रकारचे एकही बेकायदेशीवर अथवा विनापरवाना गर्भलिंगनिदान केंद्र तपासणीमध्ये आढळून आले नाही, अशी माहिती राज्याचे आरोग्यमंत्री डॉ. दीपक सावंत यांनी दिली. देवगड तालुक्यातील वळिवंडे येथे त्यांच्या निवासस्थानी रविवारी त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला. यावेळी जिल्हा शल्यचिकित्सक एस. व्ही. कुलकर्णी, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. योगेश साळे, डॉ. नितीन बिलोलीकर, शिवसेना उपजिल्हाप्रमुख विलास साळसकर, जिल्हा परिषदेचे सदस्य प्रदीप नारकर, आदी उपस्थित होते. देवगड येथे होणाऱ्या उपजिल्हा रुग्णालयाच्या कामाचा भूमिपूजन समारंभ व मोंड प्राथमिक आरोग्य केंद्राचे उद्घाटन श्रावण महिन्यातील पहिल्या सोमवारी करण्यात येणार आहे, अशी माहिती आरोग्यमंत्री सावंत यांनी यावेळी दिली. आशा स्वयंसेविकांचे काम उल्लेखनीय असून, त्यांच्या मानधनात वाढ करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. देवगड तालुक्यात अस्थिरोग रुग्णांसाठी खास शिबिराचे आयोजनही पावसाळ्यात करण्यात येणार आहे. त्याकरिता तज्ज्ञ वैद्यकीय अधिकारी उपस्थित राहून सेवा पुरविणार आहेत, असेही डॉ. सावंत यांनी यावेळी स्पष्ट केले.३१ जिल्ह्यांत सीटीस्कॅनडॉ. सावंत म्हणाले, सिंधुदुर्ग जिल्ह्यात महाराष्ट्रातील पहिली संसर्गजन्य रोग संशोधन प्रयोगशाळा साकारणार असून, त्याकरिता नऊ कोटी रुपये मंजूर झाले आहेत. त्याबरोबरच राज्यातील ३१ जिल्ह्यांकरिता सीटीस्कॅन मशीनची सुविधा देण्यात येणार असून, त्यामध्ये सिंधुदुर्ग जिल्ह्याचाही समावेश आहे. कुडाळ येथे स्त्री रुग्णालयाला ३२ कोटींची आर्थिक तरतूद करण्यात आली आहे.वैद्यकीय अधिकाऱ्यांची तत्काळ नियुक्तीसिंधुदुर्ग जिल्ह्याच्या आरोग्य खात्याचा कायापालट येत्या दोन वर्षांत निश्चितपणे केला जाईल. नवीन वैद्यकीय अधिकारी नियुक्तीबाबतचे सर्व अधिकार जिल्हाधिकारी, जिल्हा शल्यचिकित्सक, जिल्हा आरोग्य अधिकारी यांना देण्यात आले असून, येत्या दोन दिवसांत मुलाखती होतील व त्यानुसार वैद्यकीय अधिकाऱ्यांची तत्काळ नियुक्ती केली जाईल. त्याचबरोबर एमबीबीएस डॉक्टर न मिळाल्यास स्थानिक पातळीवर तदर्थ वैद्यकीय अधिकाऱ्यांची मानधन तत्त्वावर नियुक्ती करण्यात येणार असल्याचेही त्यांनी सांगितले.