शहरं
Join us  
Trending Stories
1
मावळात राज ठाकरेंनी मोठा निर्णय घेतला; अजित पवार गटाच्या बंडखोर उमेदवाराला पाठिंबा जाहीर
2
महाराष्ट्रापूर्वी झारखंडमध्ये इंडिया आघाडीचा जाहीरनामा; ७ गॅरंटी, महिलांना पैसे देणार
3
कोल्हापूर उत्तरमधून अपक्ष उमेदवार राजेश लाटकर अर्ज मागे घेणार होते, तितक्यात...
4
महाराष्ट्रात कुठे कोणाची ताकद? मुंबई, विदर्भ, मराठवाड्याचे राजकीय समीकरण काय? पाहा...
5
शाहू महाराज खासदारकीचा राजीनामा देणार? सतेज पाटलांनी अपमान केल्याच्या अफवांवर छत्रपतींचे निवेदन...
6
उत्तर महाराष्ट्रातील ११ मतदारसंघात काट्याची लढत; कुठे कुठे बंडखोरांचं आव्हान?
7
ओडिशात धावत्या ट्रेनवर गोळीबार; प्रवाशांमध्ये प्रचंड घबराट, पाहा व्हिडिओ
8
"...तर हार्ट द्या!"; राष्ट्राध्यक्षपदाच्या निवडणुकीला सुरुवात होताच चर्चेत आली इवांका; काय घडलं?
9
Maharashtra Election: राजघराण्यातील तीन व्यक्ती पहिल्यांदाच निवडणुकीच्या रिंगणात आमने-सामने
10
देशातील अशी 'ही' १४ गावं; जिथले ५००० मतदार महाराष्ट्र अन् तेलंगणातही करतात मतदान
11
धक्कादायक! तांत्रिकाच्या सांगण्यावरून संपूर्ण कुटुंब उद्ध्वस्त; वाराणसीत चार जणांच्या हत्येनंतर आत्महत्या
12
राहुल गांधी उद्या महाराष्ट्रात; काँग्रेस विधानसभा प्रचाराचे रणशिंग फुंकणार, मविआच्या सभा
13
भयंकर! यूट्यूबवर Video पाहून गर्भवती महिलेचं केलं ऑपरेशन; महिलेचा मृत्यू होताच डॉक्टर फरार
14
मधुरिमाराजेंनी अर्ज घेतला मागे; संभाजीराजे म्हणाले, "तसं घडायला नको होतं, पण..."
15
माहिममध्ये रंगतोय वेगळाच खेळ?; उद्धव ठाकरेंनी अमित ठाकरेंविरोधात उमेदवार दिला, पण आता...
16
"वाटणारे तुम्ही अन् फूट पाडणारेही तुम्हीच..." मुख्यमंत्री योगींच्या विधानावर खरगेंचा पलटवार
17
सरकार संपत्तीच्या वितरणासंदर्भात कायदा करू शकते, पण प्रत्येक खासगी मालमत्तेच्या अधिग्रहणाची परवानगी नाही - SC
18
मिचेल स्टार्कला KKR ने दाखवला बाहेरचा रस्ता; आता ऑस्ट्रेलियन खेळाडूनं दिली धक्कादायक माहिती
19
Saroj Ahire : "माझ्याविरोधात जे काही षडयंत्र रचलं..."; सरोज अहिरे प्रचारादरम्यान झाल्या भावुक
20
अमेरिकेत मतदानही सुरु, सोबत मोजणीही! ट्रम्प-हॅरिसना मिळाली ३-३ मते; सर्व्हेचा अंदाजही धक्कादायक

पुढील चार दिवस सर्वच दुकाने बंद ठेवून शासनास सहकार्य करावे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 07, 2021 4:33 PM

CoronaVirus Kankavli Sindhudurg- शासनाने नव्याने जाहीर केलेल्या निर्बंधांबाबत व्यापाऱ्यांमध्ये संभ्रमावस्था आहे. याबाबत आज आम्ही व्यापाऱ्यांनी पालकमंत्री उदय सामंत व जिल्हाधिकारी के. मंजुलक्ष्मी यांच्याशी चर्चा केली. तसेच शनिवार व रविवार या दिवशी सर्वच बंद राहणार की जीवनावश्यक सेवा सुरू राहणार याबाबत खुलासा करण्याची मागणी केली. यावर ही नियमावली राज्यशासनाची असल्याने त्यावर शासनाचे लक्ष वेधण्यासाठी पालकमंत्र्यांनी ४ दिवसांचा अवधी मागितला आहे.

ठळक मुद्देपुढील चार दिवस सर्वच दुकाने बंद ठेवून शासनास सहकार्य करावेपालकमंत्री, जिल्हाधिकाऱ्यांकडे खुलासा करण्याची प्रसाद पारकर यांनी केली मागणी

ओरोस :  शासनाने नव्याने जाहीर केलेल्या निर्बंधांबाबत व्यापाऱ्यांमध्ये संभ्रमावस्था आहे. याबाबत आज आम्ही व्यापाऱ्यांनी पालकमंत्री उदय सामंत व जिल्हाधिकारी के. मंजुलक्ष्मी यांच्याशी चर्चा केली. तसेच शनिवार व रविवार या दिवशी सर्वच बंद राहणार की जीवनावश्यक सेवा सुरू राहणार याबाबत खुलासा करण्याची मागणी केली. यावर ही नियमावली राज्यशासनाची असल्याने त्यावर शासनाचे लक्ष वेधण्यासाठी पालकमंत्र्यांनी ४ दिवसांचा अवधी मागितला आहे.त्यामुळे पुढील चार दिवस सर्व दुकाने बंद ठेवण्याचा निर्णय व्यापारी संघटनांनी घेत पुढील ४ दिवसांत सर्व दुकाने बंद ठेवून शासनाला सहकार्य करावे, असे आवाहन करतानाच शनिवार रविवार दुकानांसह सर्वच बंद ठेवावे अशी मागणी शासनाकडे केली असल्याची माहिती सिंधुदुर्ग जिल्हा व्यापारी संघटनेचे अध्यक्ष प्रसाद पारकर यांनी पत्रकारांशी बोलताना दिली.शासनाने कोरोनाच्या पार्श्वभूमीवर जाहीर केलेल्या नवीन नियमावलीबाबत सिंधुदुर्ग जिल्हा व्यापारी संघटनेने पालकमंत्री उदय सामंत व जिल्हाधिकारी के. मंजुलक्ष्मी यांची भेट घेत चर्चा केली. त्यानंतर ते पत्रकारांशी बोलत होते. यावेळी व्यापारी संघटनेचे जिल्हाध्यक्ष प्रसाद पारकर, माजी अध्यक्ष नितीन वाळके, दीपक बेलवलकर, श्रीराम शिरसाट आदी उपस्थित होते.यावेळी प्रसाद पारकर म्हणाले की, शासनाने कोरोनाचा वाढता प्रभाव पाहता नवीन नियमावली जाहीर केली आहे. मात्र, यात अत्यावश्यक सेवा, जीवनावश्यक सेवा सुरू राहणार असल्याचे नमूद आहे. मात्र, अन्य कोणती दुकाने बंद राहणार का, की काही दिवस बंद राहणार तसेच शनिवार व रविवार या दिवशीही जीवनावश्यक सेवा सुरू राहणार की पूर्णतः बंद असणार याबाबत उल्लेख नाही. त्यामुळे व्यापारी वर्गात संभ्रमावस्था निर्माण झाली आहे. त्यामुळे याकडे  पालकमंत्र्यांचे लक्ष वेधण्यात आले.

यावेळी त्यांनी ही नियमावली राज्यशासन सचिव स्तरावर तयार केली आहे. त्यामुळे ती सर्वांसाठी लागू होते. तसेच यात काही त्रुटी आहेत त्याबाबत सचिवांशी चर्चा करण्यासाठी आपल्याला ४ दिवसांची मुदत द्यावी. त्या चार दिवसांत सचिवांशी बोलून नियमावलीमध्ये बदल करण्यात येईल, असे आश्वासन दिले आहे. त्यामुळे त्यांच्या आश्वासनावर विश्वास ठेवून पुढील ४ दिवस सर्व दुकाने बंद ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. तसेच हे चार दिवस आपली दुकाने बंद ठेवून शासनाला व्यापाऱ्यांनी सहकार्य करावे, असे आवाहन त्यांनी केले आहे. ज्या व्यापाऱ्यांनी आपली आरटीपीसीआर तपासणी केली आहे आणि लस घेतली आहे अशा व्यापाऱ्यांना त्यांची दुकाने सुरू करण्याची परवानगी देण्यात यावी. व्यापाऱ्यांना लसीकरण करण्यासाठी गाव पातळीवर आवश्यक ती यंत्रणा तयार करावी. त्याचबरोबर शनिवार, रविवार दुकांनासह सर्वच बंद ठेवावे अशी मागणी शासनाकडे केली आहे, असेही ते म्हणाले.पहिल्यांदाच झाली अन्य संघटनांची पत्रकार परिषदजिल्हाधिकारी कार्यालयातील बैठक कक्षामध्ये पालकमंत्री, जिल्हाधिकारी व अन्य मंत्र्यांच्या पत्रकार परिषदा होत असतात. प्रोटोकॉलनुसार त्यांना त्या ठिकाणी पत्रकार परिषदा घेण्याचे अधिकार आहेत. मात्र, पहिल्यांदाच या ठिकाणी सिंधुदुर्ग जिल्हा व्यापारी संघटनेची पत्रकार परिषद झाली. 

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याKankavliकणकवलीsindhudurgसिंधुदुर्ग