शहरं
Join us  
Trending Stories
1
वर्ध्यातील इवोनिथ कंपनीत स्फोट; २२ कामगार भाजले, तिघांना नागपूरला हलविले
2
सदाभाऊ खोतांची शरद पवारांवर वादग्रस्त टीका; अजित पवार संतापले, महायुतीला थेट इशारा
3
पोस्टल मतपत्रिका केली व्हायरल, जवानावर गुन्हा दाखल
4
राज्य गुंतवणुकीत मागे पडले, ६४ हजार महिला बेपत्ता, शोधच लागेना; शरद पवारांची टीका
5
Maharashtra Vidhan Sabha Election 2024:"मुर्खासारखं काय बोलतो...याचं नाव घेऊन ठेवा रे", उद्धव ठाकरे पोलिसावर संतापले! काय घडलं?
6
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : दरमहा महिलांना ३ हजार, बेरोजगारांना ४ हजार अन्...; मविआच्या ५ गॅरंटी काय आहेत?
7
मविआ-महायुतीत स्पर्धा लागली! लाडक्या बहिणींना ९०० रुपये जास्त देणार; दोघांच्या जाहीरनाम्यात कुणाला काय मिळणार...
8
Maharashtra Election 2024: निकालानंतर अजित पवारांना सोबत घेण्याची वेळ आली, तर काय? जयंत पाटील म्हणाले... 
9
KL राहुल आणि ध्रुव जुरेलची Team India त एन्ट्री; ऋतुराज गायकवाडच्या नेतृत्वात खेळणार
10
देवेंद्र फडणवीसांना येणाऱ्या धमक्यांवर सातारचे खासदार छत्रपती उदयनराजे संतापले
11
राजू शेट्टींचा आश्चर्यकारक निर्णय! कोल्हापूर पट्ट्यात ठाकरे गटाच्या उमेदवाराला जाहीर पाठिंबा
12
बारामतीमध्ये कुणाचा विजय होणार? जयंत पाटील म्हणाले, "निर्णय कसा लागेल सांगणे अवघड"
13
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : "चेहऱ्यावरून त्यांना बोलणं यावरून तुमची..."; सदाभाऊ खोतांच्या टीकेला जितेंद्र आव्हाडांचं प्रत्युत्तर
14
दमदार! आता WhatsApp युजर्स शोधणार फोटो खरा आहे की खोटा, काय आहे नवीन फीचर?
15
Baba Siddique : बाबा सिद्दिकी हत्येप्रकरणी मोठी अपडेट; मुंबई पोलिसांनी दिली महत्त्वाची माहिती, म्हणाले...
16
'फाईट-फाईट-फाईट...'! एका फोटोनं ट्रम्प यांचं नशीब बदललं, आता बनले अमेरिकेचे 47वे राष्ट्राध्यक्ष
17
टाटाच्या ब्रँडने मोठा निर्णय घेतला; जग्वारने ब्रिटनमध्ये कारची विक्री थांबविली, कारण काय?
18
केंद्रीय मंत्रिमंडळ बैठकीत सरकारचा मोठा निर्णय; लाखो विद्यार्थ्यांचा होणार फायदा
19
Maharashtra Vidhan Sabha 2024: नवी मुंबईत अपक्ष कोणाच्या व्होट बँकेला पाडणार भगदाड?
20
“काँग्रेसने आत्मविश्वास गमावला आहे, जाहिरातीत पराभूत मानसिकतेचे लक्षण दिसते”: अशोक चव्हाण

सर्वच व्यवहारांना नोटांचा चाप

By admin | Published: November 09, 2016 11:46 PM

पाचशे, हजार छोटे, शंभर झाले मोठे : केंद्र शासनाच्या अचानक निर्णयामुळे पळापळ, निर्णयाचे मात्र स्वागत

रत्नागिरी : पाचशे व हजार रुपयांच्या सध्याच्या नोटा मंगळवारी मध्यरात्रीपासून बंद करण्यात आल्याने सर्वच क्षेत्रांमधील आर्थिक व्यवहार आज थंडावले. या निर्णयाची सर्वाधिक झळ सर्वसामान्यांना बसली आहे. काळा पैसावाल्यांची या निर्णयाने दाणादाण उडाली. घाईगडबडीत कोणतीही कृती केल्यास अडचणीत येण्याच्या भीतीने ‘वेट अ‍ॅण्ड वॉच’ अशी सावध भूमिका घेतली जात आहे. संकटात सापडलेल्या पाचशे व हजारच्या नोटांच्या आपत्ती व्यवस्थापनात सारेजण गुंतले आहेत. केंद्रातील मोदी सरकारने मंगळवारी रात्रीचा मुहूर्त साधत ५०० व १००० रुपयांच्या नोटा बंद केल्याचा निर्णय जाहीर केला आणि देशभरात हल्लकल्लोळ माजला. रत्नागिरीत रात्रीपासून एटीएमसमोर गर्दी झाली होती. शंभरच्या मिळतील तेवढ्या नोटा काढण्यासाठी ग्राहकांची पळापळ सुरु होती. त्याचबरोबर १० नोव्हेंबरपासून ५०० व २००० रुपयांच्या नवीन नोटा टप्प्याटप्प्याने चलनात आणण्याचा निर्णयही जाहीर केला. मात्र, दैनंदिन व्यवहारासाठी आवश्यक असणाऱ्या १०, २०, ५० व १०० रुपयांच्या नोटा आणायच्या कुठून, असा गंभीर प्रश्न जनतेसमोर निर्माण झाला. दूध, भाजीसह कोणतीही जीवनावश्यक वस्तू खरेदी करताना नागरिकांना तारेवरची कसरत करावी लागते. मात्र, येत्या चार दिवसांत सर्वकाही सुरळीत होईल व जनसामान्यांचा त्रास दूर होईल, असे सरकारतर्फे सांगितले जात आहे. बंद झालेल्या नोटा व त्यामुळे होणाऱ्या गैरसोयीचीच चर्चा बुधवारी दिवसभर होती. दरम्यान, गुरुवारी पाचशे आणि हजारच्या नोटा बँकेत जमा करण्यासाठी उद्या गर्दी उसळण्याची शक्यता आहे. (प्रतिनिधी)संमिश्र वागणूकरूग्णालयात दाखल असलेल्या मात्र आज डिस्चार्ज मिळालेल्या किंवा अन्य विविध तपासण्यासाठीचे पैसे भरून घेताना विविध खासगी रूग्णालयातून ग्राहकांना समिश्र वागणूक मिळाली. काही खासगी रूग्णांलयांनी ग्राहकांकडील हजार, पाचशेच्या नोटा स्विकारून ग्राहकांना सेवा दिली. परंतु शहरातील एका मोठ्या खासगी रूग्णालयाने काऊंटरवर नोटा न स्विकारण्याची पाटीच लावली होती. काही रूग्णांच्या विविध तपासण्यांसाठीचे पैसे भरावयाचे असताना पैसे स्विकारण्यास नकार दर्शविल्यामुळे रूग्णाचे हाल झाले.आमचा आवाज...भाज्यांची खरेदी शंभर ते दोनशेच्या घरात करणाऱ्या ग्राहकांची संख्या अल्प आहे. परंतु आज ५० रूपयांच्या खरेदीसाठी ५०० रूपये घेऊन येणाऱ्या ग्राहकांची संख्या अधिक होती. आम्ही दररोज सकाळी भाज्या खरेदी करून दिवसभर विकतो. परंतु सकाळी माल खरेदी करण्यासाठी गेलो असता व्यापाऱ्यांनी पाचशे व हजार रूपयांच्या नोटा स्वीकारण्यास नकार दर्शविला. माल घेऊन जा, नंतर पैसे द्या, असे सांगितले. माल तर खरेदी केला. परंतु बाजारात ग्राहकांकडून फारसा प्रतिसाद न मिळाल्यामुळे माल पडून राहिला. ओळखीच्या ग्राहकांना उधारीवर माल दिला. त्यामुळे आजची उलाढाल मंदावली होती.- जयसिंग जाधव, भाजीविके्रता.फळांचा व्यवसाय आहे. केळी ४० रूपये डझन आहेत. ग्राहक एक डझन केळ्यांसाठी पाचशेची नोट देत होता. परंतु ग्राहकांना परत पैसे देणार कुठून, हा प्रश्न होता. त्यामुळे आजचा दिवस ओळखीच्या ग्राहकांना खास उधारीची सवलत दिली. नोटा बंदमुळे व्यवसायाला चांगलाच फटका बसला.- रमेश श्रीनाथ, फळविक्रेता.पाच, दहा रुपयांची फुले, हार यांच्या खरेदीलाही लोक पाचशेची नोट घेऊन येत होते. बुके, पुष्पहार आॅर्डरप्रमाणे बनविण्यात येतात. किरकोळ विक्री अल्प आहे. सणासुदीलाच फुलांची उलाढाल अधिक होत असते. त्यामुळे फुलांच्या व्यवसायावर फारसा परिणाम जाणवला नाही. - भानूदास बारिंगे, फुलविक्रेता.मंगळवारी संध्याकाळी पाचशे व हजार रूपयांच्या नोटा मध्यरात्रीपासून रद्दची सूचना आली तरी रात्रीपर्यंत पाचशे, हजार रुपयांच्या नोटा पेट्रोलपंप चालकांनी स्वीकारल्या. आज सकाळी जेवढे पैसे तेवढेच पेट्रोल देण्याचा निर्णय घेतला. त्यामुळे हजार, पाचशेच्या नोटा बुधवारी रात्रीपर्यंत घेण्यात येणार आहेत. वास्तविक ग्राहकांना परत देण्यासाठीच पैसे नसल्यामुळे हा निर्णय घ्यावा लागला. पेट्रोल विक्री बंदी कायद्याविरोधात असल्यामुळे करू शकत नाही. परंतु नाईलाजाने जेवढे पैसे तेवढे पेट्रोल देण्याचा निर्णय घ्यावा लागला. पेट्रोलपंपावर कार्ड सिस्टीम सुरू असून, ग्राहकांकडून त्याचा वापर सुरू आहे.- उदय लोध, अध्यक्ष फामपेडा.पर्यटक जिल्ह्यात आले आहेत. काही पर्यटक निवासासाठी, तर काही परत फिरण्यासाठी येतात. त्यामुळे जेवण, नाष्ट्यासाठी आलेल्या ग्राहकांकडेही हजार, पाचशेच्या नोटा असल्यामुळे स्वीकारण्यात आल्या नाहीत. ज्यांच्याकडे कार्ड आहे त्यांनी स्वॅप पध्दतीचा फायदा घेतला. काऊंटरवरच बोर्ड लावल्यामुळे ग्राहकांना परत फिरावे लागत होते. अनेक पर्यटक मात्र हिरमुसले होते.- हॉटेल व्यावसायिकऔषधे खरेदीसाठी नेहमीप्रमाणे ग्राहक होते. शंभर रूपयांपासून हजार रूपयांच्या घरात औषधांची खरेदी सुरू होती. हजार व पाचशेच्या नोटा घेण्यात आल्या. मात्र, वरचे सुटे पैसे देण्यासाठी त्यांना चिठीच्या मागे लिहून देण्यात आले. रूग्णालयात दाखल असलेल्या रूग्णांना पैसे न घेता औषधे देण्यात आली. रूग्णालयाच्या बिलामध्ये ते पैसे वळते करून वसूल केले जाणार आहेत. शंभर रूपयांच्या औषधांसाठी पाचशे न घेता त्यांना नंतर पैसे आणून द्या, असेही सांगून औषधे दिली. ग्राहकांनीही चांगले सहकार्य केले.- रविकिरण जाधव, औषधविके्रता.मंगळवारी सायंकाळी ७ वाजेपर्यंत सोन्याचा दर प्रतितोळा ३० हजार ५०० रूपये होता. हजार पाचशेच्या नोटा रद्दचा संदेश फिरत असतानाच सोन्याच्या दरात वाढ झाली. काही ठिकाणी ३१ हजार ५०० ते ३४ हजारपर्यंत विविध दर सांगण्यात येत होते. लोकांमध्ये घबराट पसरल्यानंतर काही मंडळींनी सोने खरेदीसाठी दुकानातून धाव घेतली. मात्र, नोटाच चालणार नसल्यामुळे सराफी व्यावसायिकांनी ८ नंतर दुकाने बंद केली. जुने सोने बदलणे, नवीन खरेदी सुरू असली तरी ग्राहकांकडून नंतर पैसे देण्याच्या बोलीवर, किंवा चेक घेऊन जिन्नस देण्यात आले. अचानक बंदच्या निर्णयामुळे व्यवसायावर मात्र परिणाम झाला आहे.- प्रमोद खेडेकर, सराफी व्यावसायिककिराणा दुकानावर ग्राहकांची नेहमीप्रमाणे गर्दी नव्हती. नेहमीच्या यादीप्रमाणे खरेदी करणाऱ्या ग्राहकांना माल दिला. परंतु हजार, पाचशेच्या नोटांऐवजी त्यांना उधारीची सवलत देण्यात आली. देण्यासाठी पैसे सुटे नसल्यामुळे ग्राहकांना परत पाठवण्याऐवजी त्यांना केवळ किराणा घेऊन जाण्यासाठी सांगितलं. त्यामुळे दिवसभरात आर्थिक उलाढाल कमी राहिली होती.- सुरेश मुळीक, किराणा व्यावसायिक हजार, पाचशेच्या नोटा रद्दचा निर्णय झाला तरी प्रवासीवर्गाची गैरसोय होऊ नये, यासाठी राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या सूचनेनुसार सर्व आगारातील वाहकांना ९ व १० रोजी पाचशे व हजार रूपयांच्या नोटा स्वीकारण्याच्या सूचना दिल्या आहेत. शिवाय तिकिटाच्या किमतीनंतर उर्वरित पैसे परत देण्याचीही सूचना करण्यात आली आहे. प्रवाशांना मन:स्ताप होऊ नये, यासाठी महामंडळाचा रत्नागिरी विभाग सज्ज आहे.- अनघा बारटक्के, विभाग नियंत्रक, रत्नागिरीतातडीची सेवा व ग्राहकांनी आधी बुकिंग केल्यामुळे गॅस सिलिंडर घरपोच सेवा सुरू होती. मात्र, डिलर्सनी पाचशे व हजार रूपयांची स्पष्ट सूचना केल्यामुळे या नोटा आम्ही स्वीकारल्या. ग्राहकांना त्रास होऊ नये, यासाठी दोन दिवस नोटा स्वीकारणार आहोत. मात्र, दोन दिवसानंतर या नोटांचा अवलंब केला जाणार नाही.- गॅस सिलेंडर वितरककुठेही गेलं तरी पाचशे व हजार रुपयांच्या नोटा स्वीकारल्या जाणार नसल्याचे सांगण्यात येत होते. त्यामुळे दररोज लागणाऱ्या वस्तू पैसे असूनही काही खरेदी करता येत नव्हत्या. दूध, डाळी, भाज्या, अंडी, साबण काहीच खरेदी करता आले नाही. त्यामुळे घरात असणाऱ्या सामानावरच आज भागवावे लागले. काय करावे, हा प्रश्न होता. मात्र, माझ्यासारख्या अनेक भगिनींना याचा त्रास झाला. वास्तविक तातडीने सूचना देण्याऐवजी काही मुदत देणे आवश्यक होते.- अनिता साळवी, गृहिणी.शंभरच्या नोटांची मागणीरत्नागिरीच्या मिरकरवाडा मच्छीमारी बंदर जेटीवर दररोज घाऊक व किरकोळ मासे खरेदी विक्री व्यवहारांसाठी आजही नेहमीप्रमाणेच गर्दी होती. मात्र, मंगळवारी मध्यरात्रीपासून ५००, १००० रुपयांच्या नोटा बंद झाल्याची माहिती असल्याने मच्छीविक्रेत्यांकडून मासे खरेदीसाठी आलेल्या ग्राहकांकडून शंभर रुपयांच्या नोटांचीच मागणी केली जात होती. मोदींचा निर्णय चांगला आहे, काळा पैसा बाहेर निघेल, असे सांगताना मच्छी विक्रेत्या महिलांकडून ५०० व १००० रुपयांच्या नोटा गोड बोलून नाकारल्या जात होत्या. मात्र, काही विक्रेत्यांकडून ५०० वा हजार रुपयांची खरेदी होत असेल तर या नोटा स्वीकारल्या जात होत्या. ग्राहकांच्या सोयीसाठी बँकांमध्ये जादा काऊंटररत्नागिरी : नागरिकांची आर्थिक गैरसोय होऊ नये, यासाठी सर्व बँकांना उद्यापासून अधिकाधिक काऊंटर उघडण्याच्या सूचना देण्यात आल्या असून, यासंबंधी माहिती देण्यासाठी विशेष काऊंटरही उभारण्यात येणार आहेत. तसेच रत्नागिरीत ५०० तसेच २००० रूपयांच्या नवीन नोटा उपलब्ध झाल्या आहेत. मात्र, त्यांचा नियमित वापर सुरू होण्यास काही दिवस लागतील, असे जिल्हाधिकारी प्रदीप पी. यांनी आज सायंकाळी आयोजित केलेल्या पत्रकार परिषदेत सांगितले.५०० आणि १००० रूपयांच्या नोटा चलनातून रद्द करण्यात आल्या आहेत. त्यामुळे नागरिकांच्या दैनंदिन व्यवहारांवर मोठा परिणाम झाला. अत्यावश्यक सेवेतही आज या नोटा नाकारण्यात आल्याने सामान्य नागरिकांना मोठ्या गैरसोयीला सामोरे जावे लागले. याबाबत जिल्हा प्रशासनाने याची दखल घेत संबंधित विभागाची बैठक आयोजित केली होती. यासंबंधी जिल्हाधिकारी यांनी यावेळी माहिती दिली. यावेळी जिल्हा पुरवठा अधिकारी जयकृष्ण फड उपस्थित होते.आज काही ठिकाणी नागरिकांकडून ५०० तसेच १००० रूपयांच्य नोटा नाकारण्यात आल्याने त्यांची गैरसोय झाली. विशेषत: आरोग्यसेवा, पेट्रोलपंप, गॅस एजन्सी आदी ठिकाणी ही अडचण मोठ्या प्रमाणात जाणवली. त्यामुळे जिल्हा प्रशासनाने सर्व विभागांची तातडीने बैठक घेतली आणि त्यांना ७२ तासांकरिता ५०० आणि १००० रूपयांच्या नोटा स्वीकारण्याच्या सूचना दिल्या. सायंकाळी इंडियन मेडिकल असोसिएशनसमवेतही बैठक घेण्यात आली. त्यांनाही खासगी रूग्णालयात या नोटा स्वीकारण्यात याव्यात, असे आवाहन करण्यात आल्याचे जिल्हाधिकारी यांनी सांगितले. ५०० आणि १००० रूपयांच्या नोटा रद्द करण्यात आल्या असून, आता यापुढे १००, ५० रूपयांच्या नोटांचा वापर करण्यात येणार आहे. याची अंमलबजावणी सर्व बँकांमधून गुरूवारपासून करण्यात येणार आहे. जुन्या ५०० आणि १००० रूपयांच्या नोटा बँका तसेच पोस्ट कार्यालयांमधून ३० डिसेंबर २०१६ पर्यंत बदलून देण्यात येणार आहेत. यासाठी ४ हजार रूपयांची मर्यादा आहे. मात्र, या नोटा खात्यात जमा करताना कुठलीही मर्यादा ठेवण्यात आलेली नाही. तसेच यासाठी पॅनकार्ड, आधारकार्ड किंवा मतदार कार्ड यापैकी कोणताही ओळखीचा पुरावा अनिवार्य असेल. नागरिकांना आवश्यक असणाऱ्या १०० आणि ५० रूपयांच्या नोटांची उपलब्धता रिझर्व्ह बँकेकडून करण्यात आल्याची माहितीही जिल्हाधिकारी प्रदीप पी. यांनी दिली.आज आणि उद्या विविध बँकांची एटीएम बंद राहाणार आहेत. मात्र, परवा एटीएम सुरू झाल्यानंतर ही सेवा सुरळीत सुरू होईल, असा विश्वास जिल्हाधिकारी यांनी व्यक्त केला. एटीएममधून १९ नोव्हेंबरपर्यंत ग्राहकांना १०० आणि ५० रूपयांच्या नोटा मिळणार असून, प्रतिकार्ड २००० हजार रूपये काढता येतील. त्यानंतर ही सुविधा ४ हजार रूपयांपर्यंत वाढविण्यात येणार आहे. बँकेतून किंवा पोस्टातून १०,००० रूपये एका दिवशी पण आठवड्यातून जास्तीत जास्त २०,००० रूपये काढता येतील, असेही प्रदीप पी. यांनी यावेळी सांगितले. रत्नागिरीत ५०० तसेच २००० रूपयांच्या नवीन नोटा उपलब्ध झाल्यानंतर रिझर्व्ह बँकेकडून नागरिकांसाठी १०० आणि ५० रूपयांच्या नोटा अधिकाधिक उपलब्ध करून दिल्या जातील. त्यामुळे या नोटांची कमतरता भासणार नाही, असेही जिल्हाधिकारी प्रदीप पी. यांनी स्पष्ट केले. (प्रतिनिधी)आवश्यक तेवढीच रक्कम काढाबँकांच्या एटीएममधून १९ नोव्हेंबरपर्यंत प्रतिकार्ड २००० आणि त्यानंतर ४००० रूपये काढता येणार आहेत. तसेच बँकेतून किंवा पोस्टातून स्लीपद्वारे एकावेळी जास्तीत जास्त १० हजार पण आठवड्यातून २० हजार रूपये काढता येतील. मात्र, सर्वांनाच सोयीचे व्हावे, यासाठी जेवढी रक्कम आवश्यक आहे, तेवढी रक्कम काढून ग्राहकांनीही थोडे दिवस सहकार्य करावे, असे आवाहन लीड बँक मॅनेजर संजय बांदिवडेकर यांनी केले आहे.