शहरं
Join us  
Trending Stories
1
संजू सॅमसन अन् तिलक वर्मा दोघांची शतकं; टीम इंडियाच्या जोडीनं रचला खास विक्रम
2
"तुम्हाला आत टाकणार"; आदित्य ठाकरेंचा सदा सरवणकरांना भरसभेत इशारा
3
"शरद पवार फॅक्टर आहेत आणि राहतील, कारण..."; देवेंद्र फडणवीसांचं मोठं विधान
4
IND vs SA : सर्वोच्च धावसंख्या, सर्वाधिक षटकार अन् दोन शतकवीर; मॅचमधील ५ रेकॉर्ड्स 
5
"काळा डाग गुलाबी रंगाने झाकला जात नाही...", अमोल कोल्हेंचा नाव न घेता अजित दादांवर निशाणा
6
आरे देवा! संजूनं चौकार-षटाकारानं डोळ्याचं पारणं फेडलं, पण तिच्यावर आली रडण्याची वेळ!
7
दिल्लीत पुन्हा ड्रग्सची मोठी खेप जप्त; आंतरराष्ट्रीय बाजारात तब्बल 900 कोटी रुपये किंमत
8
"लोकं आम्हाला सोडून गेले अन् आता सांगतात की..."; शरद पवारांचा हसन मुश्रीफांवर हल्लाबोल
9
भयानक...! धनत्रयोदशीला नवी कोरी इनोव्हा घेतलेली, अपघातात सहा तरुण मित्रमैत्रिणींचा जीव गेला
10
पॉवर प्लेमध्ये Sanju Samson अन् Abhishek Sharma नं दाखवली 'पॉवर'; पण...
11
मोठी बातमी! राज ठाकरेंनी विश्वास टाकला, उमेदवारी दिली, पण त्यानेच ठाकरे गटात प्रवेश केला
12
लुटणाऱ्याचे पैसे घ्या, पण मनसेला मतदान करा; उल्हासनगरच्या सभेत राज ठाकरेंचे वक्तव्य 
13
IND vs SA 4th T20I : अखेर सूर्यकुमार यादवनं टॉस जिंकला, मालिका जिंकण्यासाठी सेट करणार टार्गेट
14
"घुसखोरांसह काँग्रेसलाही बांगलादेशात पाठवायला हवे..."; असं का म्हणाले हिमंता बिस्वा सरमा?
15
अजित पवार, अशोक चव्हाणांचा 'बटेंगे तो कटेंगे'ला विरोध; फडणवीस म्हणाले, "त्यांना समजवून..."
16
विजय शिवतारेंच्या पराभवासाठी अनेकजण देव पाण्यात बुडवून बसलेत; एकनाथ शिंदेंची अजितदादांच्या उमेदवाराविरोधात सभा
17
महायुती सत्तेत आली, तर मुख्यमंत्री कोण होणार? एकनाथ शिंदे अन् अजित दादांचं नाव घेत जयंत पाटलांची भविष्यवाणी!
18
अजित पवारांविरोधात उमेदवार देण्याचं शरद पवारांनी सांगितलं वेगळंच कारण; काय बोलले?
19
माइक टायसनचे 19 वर्षांनंतर कमबॅक, एका फाइटसाठी मिळणार तब्बल 168 कोटी रुपये
20
आता महाराष्ट्राला महिला मुख्यमंत्री मिळालेली पाहण्याची माझी इच्छा; शरद पवारांचे पुण्यात मोठे वक्तव्य

पालकमंत्री असल्याचे नेहमी भान ठेवा

By admin | Published: June 18, 2015 10:23 PM

परशुराम उपरकर : दीपक केसरकर यांच्यावर जोरदार टीका

कणकवली : कोकणचा विकास करणार असे मंत्रीपदाची शपथ घेतल्यानंतर सांगणारे दीपक केसरकर फक्त आपल्या विधानसभा मतदारसंघाच्या विकासकामांबाबतच विचार करीत आहेत. ते फक्त सावंतवाडी विधानसभा मतदारसंघाचे नसून, संपूर्ण सिंधुदुर्ग जिल्ह्याचे पालकमंत्री आहेत, याचे त्यांनी भान ठेवावे, असा टोला मनसेचे कोकण विभागीय संघटक परशुराम उपरकर यांनी लगावला आहे.येथील संपर्क कार्यालयात गुरुवारी आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. यावेळी मनसे जिल्हाध्यक्ष धीरज परब, दया मेस्त्री उपस्थित होते. उपरकर म्हणाले, पूर्वीच्या पालकमंत्र्यांनी मंजूर करून आणलेली विकासकामे दीपक केसरकर रद्द करीत आहेत. चिपी विमानतळाच्या आजूबाजूच्या परिसरात विकासकामे करून संपूर्ण जिल्ह्याचा विकास केल्याचा आव ते आणत आहेत. चिपी विमानतळ ते गोव्यापर्यंतच्या सागरी मार्गासाठी ११५ कोटी रुपयांचा निधी मंजूर झाला असल्याचे त्यांनी अलिकडेच सांगितले. मात्र मालवण, देवगड, विजयदुर्ग हा भागही सागरी मार्गामध्ये येतो याबद्दल ते काहीही वाच्यता करीत नाहीत. तिंबलोच्या हॉटेलला फायदा मिळावा यासाठी केसरकरांची सर्व धडपड सुरु आहे.वेंगुर्ले तालुक्यासाठी २५० कोटींची नळयोजना आणणार असल्याचे ते सांगत असले तरी ही योजना नेमकी कोणासाठी आहे हे जनतेला माहित आहे. पूर्वीचे पालकमंत्री जूनमध्ये चिपी विमानतळावर विमान उतरणार असे सांगत होते. मात्र, केसरकर डिसेंबरमध्ये विमान उतरणार असल्याचे सांगतात. ही जनतेची दिशाभूल आहे. जनतेकडून कमी दराने घेतलेली जमीन ८ हजार रुपये गुंठा दराने आयआरबी कंपनीला वापरासाठी देण्यात आली आहे. एलएनटी कंपनीने ५० कोटींचे काम याठिकाणी केले असून आता काम बंद आहे. कारण कामाच्या निविदेमध्ये नमूद करण्यात आलेले काम आता कमी करण्यात आले आहे. त्यामुळे या कंपनीचे नुकसान होणार आहे. विमानतळावरील धावपट्टी ३.४५ किलोमीटरवरून २.५ किलोमीटरवर आणण्यात आली आहे तर पाच विमानांसाठी पार्कींग शेड उभारण्याचे पूर्वी ठरले होते. मात्र, आता ही व्यवस्था दोनच विमानांसाठी होणार आहे. सुरक्षिततेसाठी असलेली कंपाऊंड वॉलही कमी करण्यात आली आहे. सामान्यांसाठी विमानतळाचा काही उपयोग होणार नाही. विमानात बसण्याची सर्वसामान्यांची इच्छा अपूर्ण राहणार असून, तिंबलोसारख्या हॉटेलातील पर्यटकांनाच या विमानतळाचा उपयोग होणार असल्याचेही ते म्हणाले. (वार्ताहर)