शहरं
Join us  
Trending Stories
1
"आता मी थोड्याच दिवसांचा पाहुणा’’, मनोज जरांगे पाटील भावूक; समर्थकांना केलं असं आवाहन
2
Ashish Shelar : "स्टेज खचला! संकेत कळला?, भाषण संपताच खचते पायाखालची माती"; शेलारांचा ठाकरेंना टोला
3
"लष्कर-ए-तैयबाचा सीईओ बोलतोय...", रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाला धमकीचा फोन
4
मोठा हलगर्जीपणा! रुग्णालयात मृत्यूनंतर रुग्णाचा डोळाच गायब; डॉक्टर म्हणतात, उंदराने कुरतडला
5
साहेबांच्या कारकिर्दीपेक्षा अधिक कामे माझ्या काळात; अजित पवारांचा दावा
6
लुटेरी दुल्हन! लग्नाच्या दुसऱ्याच दिवशी नवरीने रचला भयंकर कट; मौल्यवान वस्तू घेऊन गायब
7
Navneet Rana : नवनीत राणांच्या प्रचारसभेत मोठा राडा; अंगावर खुर्च्या फेकण्याचा प्रयत्न! 
8
बाबा झाल्यानंतर रणवीर सिंहचा आनंद गगनात मावेना, म्हणाला, "सध्या मी ड्युटीवर आहे..."
9
एकाचा 'हल्लाबोल', मग दुसरा 'पलटवार'! निवडणुकीच्या तोंडावर सलील कुलकर्णींची पोस्ट, म्हणाले- "सध्या प्रचारात..."
10
"उद्या ते असेही म्हणतील की, मी जातगणनेस विरोध करतो"; राहुल गांधींचे भाजपवर टीकास्त्र
11
मणिपूरमध्ये हिंसाचाराचा आगडोंब, ३ मंत्री आणि ६ आमदारांच्या घरांवर हल्ला, ५ जिल्ह्यांत संचारबंदी 
12
Chikhli Vidhan sabha 2024: तुल्यबळ वाटणारी लढत अखेरच्या टप्प्यात घेतेय वेगळे वळण!
13
मैत्रीसाठी काहीपण! अक्षय कुमारसाठी धावून आला अजय देवगण, दिग्दर्शित करणार सिनेमा
14
निशाणी आहे चपला; घालायच्या कशा?; उमेदवाराचा सवाल, निवडणूक आयोगाने दिले उत्तर
15
भाजपने अनेक राज्यांत भ्रष्टाचारातून सत्ता मिळवली, मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांचा मोठा आरोप
16
Mumbadevi Vidhan Sabha 2024: शायना एन.सी. विरुद्ध अमीन पटेल; गड राखण्याचे काँग्रेससमोर आव्हान! 
17
Maharashtra Election 2024 Live Updates: बारामती हेलिपॅडवर निवडणूक आयोगाकडून शरद पवारांच्या बॅगेची तपासणी
18
योगी आदित्यनाथ यांची आज कोल्हापुरात सभा, तपोवन मैदान सभेसाठी सज्ज
19
Maharashtra Election 2024: जातीय दुभंगाला सोयाबीनचा तडक! मराठवाड्यातील लढतींचा लक्ष्यवेध
20
इस्राइलचे पंतप्रधान बेंजामिन नेतन्याहू यांच्या निवासस्थानावर बॉम्बहल्ला

पर्यटनस्थळ आंबोली : पोलीस ठाण्याचा प्रस्ताव मंजुरीच्या प्रतीक्षेत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 13, 2020 2:42 PM

अनंत जाधव  सावंतवाडी : आंबोलीसाठी नव्याने उभारण्यात येणारे पोलीस ठाणे हे मंजुरीच्या प्रतीक्षेत आहे. अपुरे पोलीस बळ आणि मोठे ...

ठळक मुद्देपर्यटनस्थळ आंबोली : पोलीस ठाण्याचा प्रस्ताव मंजुरीच्या प्रतीक्षेत अपुरे पोलीस दल, मोठे क्षेत्रफळ!

अनंत जाधव सावंतवाडी : आंबोलीसाठी नव्याने उभारण्यात येणारे पोलीस ठाणे हे मंजुरीच्या प्रतीक्षेत आहे. अपुरे पोलीस बळ आणि मोठे क्षेत्रफळ हेही आंंबोलीत क्राईमच्या घटना वाढण्यास कारणीभूत असल्याचे दिसून येत आहे.

पश्चिम घाटातील पर्यटनाचा हॉटस्पॉट असलेले थंड हवेचे ठिकाण म्हणजे आंबोली. हे पर्यटन स्थळ गेल्या काही वर्षांपासून क्राईम मिस्ट्रीचा हॉटस्पॉट बनत चालले आहे. या ठिकाणी घडणाऱ्या घटनांनी पोलिसांंपुढची डोकेदुखी वाढत चालली आहे.

आंबोलीसाठी नव्याने उभारण्यात येणारे पोलीस ठाणे हे मंजुरीच्या प्रतीक्षेत आहे. अपुरे पोलीस बळ आणि मोठे क्षेत्रफळ हेही आंंबोलीत क्राईमच्या घटना वाढण्यास कारणीभूत असल्याचे दिसून येत आहे.शांत, सुंदर आंबोलीचा चेहरा अशा घटनांनी बदलत चालल्याने तेथील व्यवसायावरही त्याचा मोठा परिणाम होत आहे. एकतर आंबोली घाट कोसळण्याच्या घटनांमुळे तेथील व्यावसायिक चिंतेत सापडला असताना सतत बाहेरील गुन्हेगारी डोके वर काढत असल्याने आंबोलीच्या चिंतेत आणखीनच भर पडत चालली आहे.आंबोलीची बदनामी होेणारी पहिली घटना म्हणजे पंजाब येथील युवकाने तेथील मुलीचा खून करून आंबोलीतील एका लॉजमध्ये केलेली आत्महत्या. त्यानंतर एकामागून एक अशा घटना घडत गेल्या. त्या अद्यापपर्यंत थांबण्याचे नावच घेत नाहीत.त्यातच सगळ्या महाराष्ट्राला हादरवून टाकणारी तशीच एक घटना घडली. ती म्हणजे सांगली येथील मोबाईल चोरीच्या घटनेतील संशयित आरोपीला आंंबोलीतील महादेवगड पॉर्इंटवर पोलिसांंनी आणून जाळून मारण्यात आले. या घटनेनंतर आंबोलीची संपूर्ण राज्यात बदनामी झाली.ही घटना सांगलीची असली तरी कृत्य आंबोलीत केल्याने आंबोलीची बदनामी झाली. त्यानंतर गडहिंग्लज येथील शिक्षकाची हत्या असो किंवा साखर वाहतूक करणाºया ट्रकवर दरोडा घालून ट्रक चालकाला आंबोलीत आणून खून केल्याचा प्रकार असो या घटना सतत घडत गेल्याने आंबोलीची सर्वत्र बदनामी झाल्याचे दिसून येत आहे.

त्यातच गेल्यावर्षी आंंबोली येथील घाटात असाच महिलेचा मृतदेह मिळाला होता. पण त्याचा तपास अद्याप लागलेला नाही. आता चार दिवसांपूर्वी नव्याने आणखी एका महिलेचा मृतदेह मिळाल्याने या घटनेचा तपासतरी लागतो का ? याबाबत प्रश्नचिन्ह आहे.सततच्या घटनांमुळे आंबोलीत बाहेरून पर्यटक जायचे की नाही याचा विचार करीत असतो. त्यातच आंबोलीत नैसर्गिक पर्यटन मोठ्या प्रमाणात आहे. खरे पण सरकारकडून सतत होणारा दुर्लक्ष यामुळे आंबोलीचे पर्यटन मागे पडत चालले आहे.पेट्रोलिंगवर भर देणार : शशिकांत खोतआंंबोलीतून खाली येणारी प्रत्येक गाडी तपासणी केल्यानंतरच खाली येते. मात्र, कोणी रात्रीच्या वेळी अशा घटना घडवित असतील तर घाटात रात्रीच्यावेळी पेट्रोलिंगही वाढवावे लागणार आहे. तसेच आंंबोलीचा परिसर मोठा असल्याने तेथे वाढीव पोलीस बळही दिले जाईल, असे मत सावंतवाडीचे पोलीस निरीक्षक शशिकांत खोत यांनी व्यक्त केले आहे.आंबोली, चौकुळ, गेळे हा परिसर क्षेत्रफळानुसार तसा मोठा आहे. मात्र, अपुरे पोलीस दल असल्याने पोलीस लक्ष तरी देणार कुठे? असाच प्रश्न पडतो. त्यामुळे आंबोलीची बदनामी रोखायची असल्यास आंबोलीला नव्याने पोलीस ठाणे मंजूर करणे गरजेचे आहे. सद्यस्थितीत आंबोलीत अतिरिक्त पोलीस दल देणे गरजेचे आहे. अन्यथा बाहेरील गुन्हेगारी आंबोलीची पर्यायाने सिंधुदुर्गची डोकेदुखी अशी वाढवित राहणार आहे.गुन्हेगारी घटनांनी पर्यटनाला बाधासतत घडणाऱ्या गुन्हेगारीच्या घटना आंबोलीच्या पर्यटनाला बाधा आणणाऱ्याच आहेत. आंबोली येथे सांंगली येथील घटनेनंतर दूरक्षेत्राऐवजी पोलीस ठाणे उभारण्याचा प्रस्ताव पुढे आला होता. पोलीस अधीक्षकांनी तसा प्रस्ताव शासनाकडेही पाठविला होता. मात्र, अद्यापपर्यंत आंबोलीसाठी नवे पोलीस ठाणे मंजूर झाले नाही.

टॅग्स :Amboli hill stationआंबोलि हिल स्टेशनPolice Stationपोलीस ठाणेsindhudurgसिंधुदुर्गtourismपर्यटन