कणकवली: उत्तरप्रदेश हाथसर येथील पिढीत युवतीच्या मृत्यूचे पडसाद गुरुवारी कणकवलीत उमटले. 'आम्ही कणकवलीकर' परिवाराच्यावतीने या घटनेचा निषेध करत शहरातील अप्पासाहेब पटवर्धन चौक ते प्रांत कार्यालयापर्यंत 'मशाल मार्च' काढण्यात आला. तसेच प्रांताधिकारी वैशाली राजमाने यांना निवेदन देऊन आपल्या भावना शासनाला कळवाव्यात असे आवाहन करण्यात आले. कोणत्याही घोषणा न देता यावेळी सोशल डिस्टन्सचे पालन करण्यात आले.
यावेळी अर्पिता मुंबरकर,डॉ.प्रतिभा नाटेकर,मेघा शेट्टी,सुप्रिया पाटील,शैलजा मुखरे, डॉ.संदीप नाटेकर, उदय पाटील,अशोक करंबेळकर, बाळू मेस्त्री,संजय मालंडकर,अनिल हळदीवे, नितीन म्हापकर, शेखर गणपत्ते, नामानंद मोडक, डी. पी.तानावडे, सादिक कुडाळकर,रुपेश खाडये महेश कोदे,महानन्द चव्हाण,विनायक सापळे ,प्रदीप मांजरेकर आदींसह अनेक नागरिक सहभागी झाले होते.घडलेली घटना ही माणुसकीला काळिमा फासणारी आहे.त्याचा आम्ही निषेध करतो. गुन्हेगारांवर जलद कायदेशीर कारवाई व्हावी. अशी मागणी आम्ही कणकवलीकर परिवाराच्यावतीने निवेदनाद्वारे करण्यात आली.