सावंतवाडी : आंबोली कावळेसाद येथील (गेळे पॉइंट ) दरीत खून करून टाकलेल्या भड़गाव (गडहिंग्लज) येथील शिक्षक विजयकुमार गुरव (वय ४७) याच्या खुनाचा उलगडा करण्यात स्थानिक गुन्हा अन्वेषण विभाग व सावंतवाडी पोलीसांना यश आले असून शिक्षकाच्या संशयित पत्नी जयलक्ष्मी गुरवसह अन्य एकाला मुंबईतून ताब्यात घेण्यात आले आहे.
आंबोली कावळेसाद येथील दरीत खून करून टाकलेल्या गहडिग्लज येथील शिक्षक विजयकुमार गुरव याच्या खुनाचा उलगडा करण्यात स्थानिक गुन्हा अन्वेषण विभाग व सावंतवाडी पोलीसांना यश आले आहे. शिक्षकाच्या पत्नीसह अन्य एकाला मुंबईतून स्थानिक गुन्हा अन्वेषण विभागने ताब्यात घेतले आहे. सशयितांची सावंतवाडीत स्थानिक गुन्हा अन्वेषणचे पोलीस निरिक्षक विश्वजीत काईगडे, सावंतवाडी पोलीस निरिक्षक सुनिल धनावडे याच्याकडून चौकशी सुरू आहे .
संशयिताना ओरस येथील न्यायलायात हजर करण्यात येणार आहेत, तसेच विजयकुमार गुरवचा खून घरी करण्यात आला किंवा त्या बद्दल काही पुरावे मिळतील का? यासाठी भडगाव (गडहींग्लज) येथील घरी फोरेंसीक टीम तपास करणार आहे.
संशयीतांच्या विरोधात दोन दिवसापूर्वी विजयकुमार गुरवच्या तिन्ही मुलांनी व नातेवाईकांनी बेपत्ता झालेली पत्नी यांच्या विरोधात फिर्याद दिली होती. या फिर्यादीत पत्नी जयलक्ष्मी विजय गुरव यांनी घरातून पळून जाण्याआधी सुमारे ५० तोळे सोने व इतर साहित्य आपल्या सोबत नेले होते.
तपास लवकरात लवकर करुण आरोपींना पकडण्यात यावे अशी मागणी केली होती.त्यावर तत्काळ पोलिसांनी कारवाई करत पत्नी व अन्य एकाला ताब्यात घेतले.तसेच त्यांची चौकशी करण्यात येत आहे. आता तपासाला गती मिळाल्याने खुनामागचे खरे कारण बाहेर येईल. हा खून अनैतिक संबंधातून झाल्याचा संशय व्यक्त होत आहे.