शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानात तख्तापालट होण्याचे संकेत? इम्रान खान यांच्या समर्थकांसोबत सैन्य; हस्तांदोलन, मिठ्या मारल्या 
2
'मी नेहमी संविधानाच्या मर्यादेचा आदर केला...', संविधान दिनानिमित्त पंतप्रधान मोदींचे भाष्य
3
“अशा निवडणुका पाकिस्तान, अफगाणिस्तानात होत नसतील, आयोग जिवंत आहे का”; संजय राऊत संतापले
4
मनोज जरांगेंचे ठरले; सरकार स्थापन झाल्यावर तारीख जाहीर करणार, पुन्हा बेमुदत उपोषणाला बसणार
5
"दहशतवादी संघटनांना चोख प्रत्युत्तर देणार"; २६/११च्या हल्ल्याच्या वर्षपूर्तीनिमित्त पंतप्रधान मोदींचे आश्वासन
6
झुनझुनवाला यांनी 10 मिनिटांत कमावले ₹105 कोटी; 'या' दोन शेअर्समुळे लागली लॉटरी; पडला पैशांचा पाऊस!
7
"अजित पवारांनी सरेंडर होऊन आमची..."; रामदास कदमांचे मोठं विधान, म्हणाले, "काहीही केलं तरी..."
8
...म्हणून मुख्यमंत्रिपदाचा उमेदवार जाहीर करण्यास विलंब; भाजपचे 'या' कामाला प्राधान्य
9
आधारवाडीतील इमारतीच्या पंधराव्या मजल्यावर भीषण आग; अग्निशमन दलाचे वाहन बिघडले
10
नाना पटोलेंनी दिल्ली गाठली, मल्लिकार्जून खरगे-राहुल गांधींची भेट घेतली; नेमके काय घडले?
11
BLOG: अमित ठाकरे निवडणुकीच्या चक्रव्यूहात शिरले खरे, पण...; 'राजपुत्रा'चं नेमकं काय चुकलं? सहा प्रमुख मुद्दे
12
राहुल गांधींचे नागरिकत्व रद्द होणार का? केंद्र सरकार १९ डिसेंबरला उच्च न्यायालयाला निर्णय कळविणार
13
"हिंदूंच्या हक्कांसंदर्भात बोलणारे निर्लज्ज, ...या सरकारला भारतातील अल्पसंख्यकांची चिंता नाही"; काय म्हणाले ओवेसी?
14
तिसऱ्या महायुद्धात अण्वस्त्रांचा वापर, एक तृतीयांश लोकसंख्या मारली जाणार; सिडनीच्या बिशपची भविष्यवाणी 
15
"हे फक्त शब्द नाहीत, इशारा आहे"; चिमुकलीवरील अत्याचाराच्या घटनेनंतर अमित ठाकरे संतापले
16
महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीतील महायुतीच्या विजयानंतर, काँग्रेसची मोठी घोषणा; देशभरात खास मोहीम चालवणार 
17
"तुम्ही जिंकता तेव्हा ईव्हीएम चांगले अन् पराभूत झाले, तर..."; सुप्रीम कोर्टाने पिळले कान
18
Numerology: ‘या’ ६ मूलांक होतील मालामाल, धनलाभाचे योग; नोव्हेंबरची सांगता होईल खास!
19
अपघातानंतर पहिल्यांदाच कश्मिरा शाहने शेअर केला Video; नाकाला झालेली दुखापत
20
TV, OTT, AI सगळं एकाच ठिकाणी; टीव्हीसोबतच मिळणार सगळ्याचं 'सबस्क्रिप्शन'

...तर विजयदुर्ग जगातील सुंदर बंदर बनेल

By admin | Published: August 29, 2014 10:55 PM

दिवाकर प्रसाद : विजयदुर्ग येथे सागरी विकास परिषद

कणकवली : छत्रपती शिवाजी महाराजांनी विजयदुर्ग किल्ला परिसरातील समुद्र आणि खाडी याचा अभ्यास करून आरमाराच्या दृष्टीकोनातून या किल्ल्याचे महत्त्व जाणून घेतले होते. विजयदुर्गची भौगोलिक परिस्थिती अभ्यासली असता या परिसरात ग्रीनफिल्ड पोर्ट ते अल्टिमेंट हार्बर पोर्ट अशी चार प्रकारची बंदरे बांधणे शक्य आहे. विजयदुर्ग खाडीतील गाळ काढल्यास मुंबई न्हावाशेवापेक्षा १५ पट अधिक क्षमतेचा तसेच जगातील सर्वात मोठे अल्टिमेट हार्बर बंदर उभे राहू शकेल. किंबहुना या विजयदुर्ग बंदरामुळे भारतातील दुसरी मुंबई वसवण्याची क्षमता आहे, असे मत मेरीटाईम बोर्डाचे अधिकारी दिवाकर प्रसाद यांनी व्यक्त केले.सिंधुभूमी फाऊंडेशन व कोकण क्लबच्यावतीने विजयदुर्गमधील एमटीडीसीच्या सभागृहात नुकतीच सागरी विकास परिषद झाली. यात कोकण व्हिजन २०१५ अंतर्गत कोकणातील बंदरांचा विकास व जलवाहतूक या विषयावर परिसंवाद आयोजित केला होता. यावेळी विजयदुर्ग बंदराचा विकास करण्यासाठी मेरीटाईम बोर्डाने नियुक्त केलेले अधिकारी दिवाकर प्रसाद यांच्यासह गुजरात राज्यातील बंदरांचा प्रतिकूल परिस्थितीत विकास करणारे मालवणचे कॅ. यतीन देऊलकर, काताळे- रत्नागिरी येथील खासगी बंदराचे संस्थापक कॅ. दिलीप भाटकर या तज्ज्ञांसह आमदार प्रमोद जठार, संजय यादवराव, खासदार विनायक राऊत आदी उपस्थित होते. मेरीटाईम बोर्डाने रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यातील बंदरांचा अभ्यास करण्यासाठी १९९८ मध्ये प्रमुख अधिकारी म्हणून दिवाकर प्रसाद यांची नियुक्ती केली होती. त्यांनी जयगडसह विजयदुर्ग आणि रेडी बंदरांचा अभ्यास करून अहवाल सादर केला. त्यांच्या म्हणण्यानुसार ग्रीनफिल्ड पोर्टसाठी आवश्यक १६ मीटर खोली विजयदुर्ग बंदरासाठी उपलब्ध आहे.कॅ. भाटकर यांनी कोकणामध्ये १९६८ मध्ये कोकण सेवक प्रवासी बोट वाहतूक सुरू केली. याचा अर्थ कोकणातील बंदरे पूर्वीपासून प्रवासी बोट वाहतुकीसाठी सुरक्षित आहेत. मात्र, मधल्या काळात ही बोट सेवा बंद पडली. राजकीय इच्छाशक्तीअभावी ती पुन्हा सुरू झाली नाही. मात्र विजयदुर्ग बंदराचा विकास झाल्यास तसेच अन्य बंदरातील गाळ काढला गेल्यास कोकणामध्ये पुन्हा सागरी जलवाहतूक सुरू होणे शक्य आहे. कॅ. इंद्रजीत सावंत यांनी, रस्ते, रेल्वे, विमान माल वाहतुकीच्या तुलनेने जल माल वाहतूक अत्यंत किफायतशीर असते. जागतिक आयात-निर्यातीमध्ये ७० टक्के मालवाहतूक सागरी मार्गाने होते. भारताला स्वातंत्र्य मिळाल्यावर ६७ वर्षे झाली. देशाला तीन बाजूंनी समुद्रकिनारा लाभला आहे. तरीही जलवाहतुकीचा वाटा केवळ १२ टक्केच एवढा राहिला आहे. आजवर कोकणातील अनेक बंदरे विकसीत करण्याच्या घोषणा कागदावरच राहिल्या, असे सांगितले. (प्रतिनिधी)बंदरांच्या नफ्याचे प्रमाण सरासरी ३८ टक्केजागतिक दर्जाची अल्टिमेट हार्बर जेटी उभारण्यासाठी २५ मीटर खोलीची गरज असते. विजयदुर्ग खाडीचा गाळ काढल्यास एवढी खोली मिळणे सहज शक्य आहे. कोकणासह राज्यातील खासदारांनी विजयदुर्ग बंदर होण्यासाठी जोर लावला तर या ठिकाणी जागतिक दर्जाचे सर्वात मोठे अल्टिमेट हार्बर बंदर भविष्यात होऊ शकेल. त्यामुळे विजयदुर्गसह सिंधुदुर्ग आणि लगतच्या रत्नागिरी जिल्ह्यातील राजापूर परिसरात दुसरे मुंबई शहर वसवणे हे वास्तववादी स्वप्न ठरेल. याशिवाय अन्य तीन प्रकारची छोटी बंदरे विजयदुर्ग परिसरात उभारणे शक्य आहे. या चारही बंदरांच्या नफ्याचे प्रमाण सरासरी ३८ टक्क्यांच्या दरम्यान राहील.