सिंधुदुर्गनगरी : अंगणवाडीतील चिमुरड्यांना नाविण्यपूर्ण व हसतखेळत शिक्षण देण्यावर अंगणवाडी सेविकांचा भर असावा हा उद्देश डोळ्यासमोर ठेवून या सेविकांना प्रशिक्षण दिले जाणार आहे. ‘चिमण्यांची अंगणवाडी’ असे या पायलट प्रोजेक्टचे नाव असून या माध्यमातून अक्षर सुधारक्रम, नाविण्यपूर्ण बडबडगीत याचे मार्गदर्शन अंगणवाडी सेविकांना तज्ज्ञांमार्फत केले जाणार आहे. प्रायोगिक तत्वावर हा उपक्रम राबविण्यात येणार असून प्रथमत: कुडाळ तालुक्यात १ ते १० डिसेंबर या कालावधीत हा प्रकल्प राबविण्यात येणार आहे, अशी माहिती महिला व बालविकास अधिकारी सोमनाथ रसाळ यांनी दिली.जिल्हा परिषद महिला व बालविकास समितीची सभा सभापती स्नेहलता चोरगे यांच्या अध्यक्षतेखाली येथील बॅ. नाथ पै सभागृहात पार पडली. यावेळी समिती सदस्य रुक्मिणी कांदळगावकर, निकिता तानवडे, समिती सचिव तसेच जिल्हा महिला व बालविकास अधिकारी सोमनाथ रसाळ, अधिकारी, खातेप्रमुख उपस्थित होते.मनज्योत प्रतिष्ठानच्या माध्यमातून कुडाळ तालुक्यातील सर्व अंगणवाडी सेविकांना अंगणवाडीतील मुलांना हसत खेळत शिक्षण देता यावे यासाठी मार्गदर्शन करण्यात येणार आहे. बीट स्तरावर १ ते १० डिसेंबर या दरम्यान ही मोहिम राबविण्यात येणार आहे. ‘चिमण्यांची अंगणवाडी’ असे या प्रोजेक्टचे नाव आहे.सी.डी.पी.ओं.ची उपस्थिती कमीमंगळवारी पार पडलेल्या महिला व बालकल्याण समिती सभेत तालुका बालविकास प्रकल्प अधिकाऱ्यांची (सी.डी.पी.ओ.) उपस्थिती कमी असल्याने सभापती स्नेहलता चोरगे यांनी सभागृहात नाराजी व्यक्त केली. यावेळी सोमनाथ रसाळ माहिती देताना म्हणाले की, काही तालुका प्रकल्प अधिकारी यांची पदे रिक्त असल्याने या पदाचा कार्यभार गटविकास अधिकाऱ्यांकडे देण्यात आला आहे. त्यामुळे बीडीओंनी या सभेस येणे गरजेचे होते असे सांगत या संदर्भात सर्व अनुपस्थित असणाऱ्यांना पत्र काढणार असल्याचे रसाळ यांनी सभागृहात स्पष्ट केले.जिल्ह्यातील १५७० अंगणवाड्यांपैकी ५६५ अंगणवाड्या या भाड्याच्या तसेच समाजमंदिराचा आधार घेत सुरु आहेत. या अंगणवाड्यांना हक्काची इमारत नाही. यातील १०० अंगणवाड्या या भाड्याच्या इमारतीत आहेत. बऱ्याच अंगणवाड्यांना हक्काची इमारत मिळणार असल्याचे रसाळ यांनी सांगितले. (प्रतिनिधी)अंगणवाडी सेविकांची ३९ पदे रिक्त४जिल्ह्यात १५७० अंगणवाड्या असून त्यातील अंगणवाडी सेविका व मदतनीस यांच्या रिक्त असणाऱ्या पदांबाबत सभागृहात चर्चा करण्यात आली. ४याबाबत तालुक्याचा आढावा घेतला असता जिल्ह्यात ३९ पदे रिक्त असल्याची माहिती देण्यात आली.४ही पदे भरती प्रक्रियेतून तत्काळ भरा असे आदेश सभापती चोरगे यांनी दिले.मानधन राज्यस्तरावरून डिसेंबर किंवा जानेवारी या महिन्यांपासून अंगणवाडी सेविकांचे मानधन थेट राज्यस्तरावरून खात्यात जमा होणार आहे. त्यामुळे मानधन वेळेत जमा होण्यास मदत होणार आहे. यापूर्वी हे मानधन राज्यस्तरावर, जिल्हास्तरावर व तेथून तालुकास्तरावर जमा होत होते.
‘चिमण्यांची अंगणवाडी’ उपक्रम राबविणार
By admin | Published: November 25, 2015 11:23 PM