ओरोस : सिंधुदुर्गचेजिल्हाधिकारी किशोर तावडे यांची व्यवस्थापकीय संचालक, महाराष्ट्र राज्य शेती महामंडळ, पुणे येथे बदली झाली आहे. तर सिंधुदुर्गच्याजिल्हाधिकारीपदी शासनाने अनिल पाटील यांची नियुक्ती केली आहे.किशोर तावडे यांनी २३ ऑगस्ट २०२३ रोजी सिंधुदुर्ग जिल्हाधिकारी पदाचा पदभार स्वीकारला होता. मात्र, जिल्ह्यातील त्यांचा प्रशासकीय कालावधी पूर्ण होण्याआधीच त्यांची व्यवस्थापकीय संचालक, महाराष्ट्र राज्य शेती महामंडळ, पुणे येथे बदली झाली आहे. तर त्यांच्या जागी नूतन जिल्हाधिकारी म्हणून हाफकाइन बायो-फार्मा कॉर्पोरेशन, मुंबई येथे व्यवस्थापकीय संचालकपदी कार्यरत असलेले अनिल पाटील यांची नियुक्ती शासनाने केली आहे.
विकासाची अनेक कामे मार्गी
जिल्हाधिकारी किशोर तावडे यांनी गेल्या वर्षभराच्या कालावधीत विकासाची अनेक कामे मार्गी लावली. अगदी तातडीने निर्णय घेण्याची त्यांची खासियत होती. जिल्ह्यात मागील वर्षभरात कोट्यवधी रुपयांची विकासकामे शासनाच्या वतीने झाली आहेत.
पालकमंत्र्यांशी समन्वयाचा अभावदरम्यानच्या कालावधीत पालकमंत्री रवींद्र चव्हाण यांनी जिल्हाधिकाऱ्यांना दोडामार्ग तालुक्यातील एका जमिनीच्या मोजणीसाठी पोलिस बंदोबस्त दिल्याच्या कारणावरून झापले होते. तर गेळे, आंबोली आदी विषयांवरून पालकमंत्री आणि जिल्हाधिकारी यांच्यामध्ये नसलेला समन्वय याचा फटका जिल्हाधिकाऱ्यांना बसला असल्याची चर्चा या बदलीनंतर जिल्ह्यात सुरू होती.