गुहागर : चुरशीने लढल्या गेलेल्या अंजनवेल ग्रामपंचायतीवर भाजप-सेना युतीने सत्ता कायम राखली, तर सेनेच्या ताब्यात असणाऱ्या वेळंब ग्रामपंचायतीत एकमेव जागेसाठी झालेल्या पोटनिवडणुकीत राष्ट्रवादीचे पंकज बिर्जे विजयी झाले.गुहागर तालुक्याची ग्रामपंचायत मतमोजणी सोमवारी शांततेत झाली. अंजनवेल ग्रामपंचायतीवर भाजप ३, शिवसेना ३ व आरपीआय १ असे युतीचे सात उमेदवार विजयी झाले. प्रभाग १ मधून सर्वसाधारण जागेसाठी या आधीचे सरपंच यशवंत बाईत (भाजप) ३०६ मते, शिवसेनेचे उपतालुकाप्रमुख आत्माराम मोरे ३१४ मते, सर्वसाधारण स्त्री स्वाती वाघे (भाजप) २९९ मते, प्रभाग २ मधून नामाप्रसाठी साक्षी सैतवडेकर (राष्ट्रवादी) २१२ मते, सर्वसाधारण स्त्री अनिता मेढेकर (शिवसेना) २१२ मते, प्रभाग ३मधून सुनील निवाते (राष्ट्रवादी) ३१३ मते, जवाहर तांडेल (राष्ट्रवादी) २४७ मते, सर्वसाधारण स्त्री सुप्रिया नेवरेकर (राष्ट्रवादी) २१३ मते, प्रभाग ४ सर्वसाधारण जागेसाठी योगेश धामणस्कर (शिवसेना) २०७ मते, नामाप्र स्त्रीसाठी वेदिका भुवड (भाजप) २०० मते, सर्वसाधारण स्त्री मानसी सकपाळ (आरपीआय) २०२ मते हे विजयी झाले.वेळंब ग्रामपंचायत यापूर्वी शिवसेनेकडे होती. येथील नऊही जागांवर राष्ट्रवादी काँग्रेसने एकहाती सत्ता मिळवली. यामध्ये प्रभाग१मधून वसंत पिंपळे ३११ मते, संदीप तांबे २९९ मते, प्रियांका बारगोडे ३२४ मते, प्रभाग २मधून अनिल राऊत २९९ मते, प्रियांका बारगोडे ३२४ मते, प्रभाग २मधून अनिल राऊत ३२६ मते, प्रभाग २मधून अर्चना रहाटे ३२७ मते, संजिवनी नांदळस्कर २४२ मते, प्रभाग ३मधून सुशील जाधव २२२ मते, समीक्षा बारगोडे २१२ मते, सुलभा आखलकर २१५ मते हे उमेदवार निवडून आले.याआधी अंजनवेल ग्रामपंचायतीत राष्ट्रवादीच्या फक्त २ जागा होत्या. आता चार जागा निवडून आल्या आहेत. शिवसेनेचे शाखाप्रमुख शरद यादव यांच्यासह यशवंत बाईत यांचा उजवा हात समजल्या जाणाऱ्या मनोहर पारधी यांनाही पराभवाची धूळ चारल्याने भविष्यात येथे राष्ट्रवादी अग्रेसर राहील, अशी खोचक प्रतिक्रिया मयुरेश कचरेकर यांनी व्यक्त केली. अंजनवेल ग्रामपंचायत ताब्यात घेण्यासाठी आमदार भास्कर जाधव यांनी येथील मुस्लिम समाजात तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न केला. युतीच्या विजयाने विरोधकांवर पुन्हा एकदा मात केल्याचे सिद्ध झाले आहे, अशी प्रतिक्रिया याआधीचे सरपंच विजयी उमेदवार यशवंत बाईत यांनी व्यक्त केली. (प्रतिनिधी)
अंजनवेल ग्रामपंचायतीत युती, वेळंबमध्ये सेनेला ‘दे धक्का’
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 22, 2015 1:08 AM