वैभववाडी : वाभवे-वैभववाडी नगरपंचायतीचे प्रभाग आरक्षण येथील तहसील कार्यालयाच्या सभागृहात सोडत पध्दतीने निश्चित करण्यात आले. त्यानुसार प्रभाग क्रमांक एक, पाच, अकरा, पंधरा हे चार प्रभाग खुले राहिले असून उर्वरित १३ प्रभाग अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती, नागरीकांचा मागास प्रवर्ग आणि महिलांसाठी आरक्षित झाले आहेत.पीठासन अधिकारी तथा प्रांताधिकारी संतोष भिसे, तहसीलदार जी. आर. गावीत यांच्या उपस्थितीत प्रभाग आरक्षणाची सोडत काढण्यात आली. यावेळी गटविकास अधिकारी सदानंद पाटील, प्रांताधिकारी कार्यालयाचे अव्वल कारकून पी. बी. पळसुले आदी उपस्थित होते.सुरुवातीला प्रांताधिकारी भिसे यांनी नगरपंचायतीच्या एकूण जागा आणि त्यामधील आरक्षित जागांची संख्या सांगितली. त्यानंतर आरक्षण सोडतीची प्रक्रिया उपस्थितांना समजावून सांगितले. लोकसंख्येच्या निकषांनुसार प्रभाग ७ व १४ अनुसूचित जातीसाठी तर प्रभाग ३ अनुसूचित जमातीसाठी आरक्षित करण्यात आले. तर शालेय विद्यार्थ्यांमार्फत चिठ्ठया काढून नगरपंचायतीच्या उर्वरित १४ प्रभागांचे आरक्षण निश्चित करण्यात आले. आरक्षण सोडतीसाठी महिला व बालकल्याण सभापती स्नेहलता चोरगे, सभापती वैशाली रावराणे, उपसभापती शोभा पांचाळ, भाजप जिल्हा सरचिटणीस प्रमोद रावराणे, काँग्रेसचे तालुकाध्यक्ष भालचंद्र साठे, शिवसेना तालुकाप्रमुख अशोक रावराणे, मनसेचे तालुकाध्यक्ष सचिन तावडे, जिल्हा परिषद सदस्य दिलीप रावराणे, माजी बांधकाम सभापती जयेंद्र रावराणे, पंचायत समिती सदस्य नासीर काझी, बंड्या मांजरेकर, शुभांगी पवार, अरविंद रावराणे, सज्जन रावराणे, राजेंद्र राणे, महेंद्र रावराणे, जयश्री रावराणे, माजी उपसरपंच गुलाबराव चव्हाण आदी उपस्थित होते. (प्रतिनिधी)प्रभाग क्र.प्रभागाचे नावआरक्षण१पंचायत समिती, अ. रा.विद्यालय परिसर सर्वसाधारण २माईणकरवाडी ना. मा. प्र.३पोस्ट आॅफिस परिसर अनुसूचित जमाती४जुनी पं.स.इमारत,डॉ. मराठे दवाखाना परिसर ना. मा. प्र. महिला५पोलीस ठाणे परिसर सर्वसाधारण६तालुका शाळा परिसर सर्वसाधारण महिला७जुना कोकिसरे रस्ताअनुसूचित जाती महिला८स्टेट बँक परिसरना. मा. प्र महिला९जुनी नळयोजना विहिर परिसर सर्वसाधारण महिला१०गोपाळनगर सर्वसाधारण महिला११बँक आॅफ इंडिया परिसरसर्वसाधारण१२सांगुळवाडी रस्तासर्वसाधारण महिला१३गांगोमंदिर परिसर, कोंडवाडी ना. मा. प्र महिला१४तांबेवाडीअनुसूचित जाती१५विश्रामगृह परिसर सर्वसाधारण१६गावठण, प्राथमिक शाळासर्वसाधारण महिला१७राणेवाडी, धनगरवाडाना. मा. प्र.
नगरपंचायत आरक्षण सोडत जाहीर
By admin | Published: August 20, 2015 10:42 PM