शहरं
Join us  
Trending Stories
1
वर्ध्यातील इवोनिथ कंपनीत स्फोट; २२ कामगार भाजले, तिघांना नागपूरला हलविले
2
सदाभाऊ खोतांची शरद पवारांवर वादग्रस्त टीका; अजित पवार संतापले, महायुतीला थेट इशारा
3
पोस्टल मतपत्रिका केली व्हायरल, जवानावर गुन्हा दाखल
4
राज्य गुंतवणुकीत मागे पडले, ६४ हजार महिला बेपत्ता, शोधच लागेना; शरद पवारांची टीका
5
Maharashtra Vidhan Sabha Election 2024:"मुर्खासारखं काय बोलतो...याचं नाव घेऊन ठेवा रे", उद्धव ठाकरे पोलिसावर संतापले! काय घडलं?
6
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : दरमहा महिलांना ३ हजार, बेरोजगारांना ४ हजार अन्...; मविआच्या ५ गॅरंटी काय आहेत?
7
मविआ-महायुतीत स्पर्धा लागली! लाडक्या बहिणींना ९०० रुपये जास्त देणार; दोघांच्या जाहीरनाम्यात कुणाला काय मिळणार...
8
Maharashtra Election 2024: निकालानंतर अजित पवारांना सोबत घेण्याची वेळ आली, तर काय? जयंत पाटील म्हणाले... 
9
KL राहुल आणि ध्रुव जुरेलची Team India त एन्ट्री; ऋतुराज गायकवाडच्या नेतृत्वात खेळणार
10
देवेंद्र फडणवीसांना येणाऱ्या धमक्यांवर सातारचे खासदार छत्रपती उदयनराजे संतापले
11
राजू शेट्टींचा आश्चर्यकारक निर्णय! कोल्हापूर पट्ट्यात ठाकरे गटाच्या उमेदवाराला जाहीर पाठिंबा
12
बारामतीमध्ये कुणाचा विजय होणार? जयंत पाटील म्हणाले, "निर्णय कसा लागेल सांगणे अवघड"
13
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : "चेहऱ्यावरून त्यांना बोलणं यावरून तुमची..."; सदाभाऊ खोतांच्या टीकेला जितेंद्र आव्हाडांचं प्रत्युत्तर
14
दमदार! आता WhatsApp युजर्स शोधणार फोटो खरा आहे की खोटा, काय आहे नवीन फीचर?
15
Baba Siddique : बाबा सिद्दिकी हत्येप्रकरणी मोठी अपडेट; मुंबई पोलिसांनी दिली महत्त्वाची माहिती, म्हणाले...
16
'फाईट-फाईट-फाईट...'! एका फोटोनं ट्रम्प यांचं नशीब बदललं, आता बनले अमेरिकेचे 47वे राष्ट्राध्यक्ष
17
टाटाच्या ब्रँडने मोठा निर्णय घेतला; जग्वारने ब्रिटनमध्ये कारची विक्री थांबविली, कारण काय?
18
केंद्रीय मंत्रिमंडळ बैठकीत सरकारचा मोठा निर्णय; लाखो विद्यार्थ्यांचा होणार फायदा
19
Maharashtra Vidhan Sabha 2024: नवी मुंबईत अपक्ष कोणाच्या व्होट बँकेला पाडणार भगदाड?
20
“काँग्रेसने आत्मविश्वास गमावला आहे, जाहिरातीत पराभूत मानसिकतेचे लक्षण दिसते”: अशोक चव्हाण

बांद्यात आणखी एक माकडताप ‘पॉझिटिव्ह’

By admin | Published: March 08, 2017 11:23 PM

रुग्णसंख्या ४० वर; रक्ततपासणी अहवाल मिळणार ताबडतोब

बांदा : बांदा-सटमटवाडी येथील आणखी एका रुग्णाचा अहवाल पॉझिटिव्ह आल्याने माकडताप बाधित रुग्णांची संख्या आता ४० वर पोहोचली आहे, तर बुधवारी निमजगावाडी येथे मृत माकड आढळून आल्याने मृत माकड आढळण्याचे सत्र सुरूच राहिले आहे. दरम्यान, जिल्हा परिषद उपाध्यक्ष एकनाथ नाडकर्णी यांनी बांदा प्राथमिक आरोग्य केंद्राला भेट देत डॉ. जगदीश पाटील यांच्याशी चर्चा करून परिस्थितीचा आढावा घेतला.मागील तीन महिन्यांपासून बांदा येथे माकडतापाने थैमान घातले आहे. आतापर्यंत यामुळे चौघांचे बळी गेले आहेत. त्यामुळे येथील ग्रामस्थ हवालदिल झाले असून, या तापाची भीती सर्वत्र दिसून येत आहे. सोमवारी रात्री पालकमंत्री दीपक केसरकर यांनी बांदा येथे भेट दिली असता ग्रामस्थांनी आपला रोष व्यक्त केला. त्यानंतर पालकमंत्र्यांनी सर्व विभागांना माकडताप नियंत्रणात आणण्यासाठी यंत्रणा जलद राबविण्याचे आदेश दिले होते. त्यानुसार मंगळवारपासून ही मोहीम तीव्र झाली आहे.जोखीमग्रस्त भागात वनविभागाचे विशेष पथक तैनात झाले असून, सर्व परिसरात निर्जंतुकीकरणासाठी फवारणी सुरू आहे. उपाध्यक्ष एकनाथ नाडकर्णी यांनी बांदा येथील पशुवैद्यकीय अधिकारी डॉ. एस. एम. जाधव यांच्याशी चर्चा करीत ग्रामस्थांची असलेली नाराजी लक्षात घ्या व काम करा, असे आदेश दिले. यावर डॉ. जाधव यांनी संपूर्ण परिसरात पशुधनचे पथक पाहणी करीत असून, सर्व पाळीव जनावरांना इंजेक्शन दिले जात असल्याचे सांगितले. गोठा निर्जंतुक करण्यासही सुरुवात करण्यात आल्याचे त्यांनी सांगितले. आपल्याकडे अर्ध्यापेक्षा जास्त तालुक्यांचा कार्यभार असल्याने थोडी दिरंगाई झाल्याचे त्यांनी सांगताच नाडकर्णी यांनी त्यांना तूर्तास इतर ठिकाणी जास्त लक्ष न देता या ठिकाणच्या परिस्थितीवर लक्ष देऊन काम करा, असे सांगितले.डॉ. जगदीश पाटील यांनी माहिती देताना सांगितले की, प्लेटलेट संतुलन आणि रक्ततपासणी यंत्रणा असणे आवश्यक असून, बुधवारपासून रक्ततपासणी यंत्रणा कार्यरत झाली आहे. त्यामुळे रक्ततपासणी अहवाल त्वरित मिळणार आहे. उपाध्यक्ष नाडकर्णी यांनी आपला अर्धा निधी येथील डीएमपी आॅईलसाठी दिला असून, गरज असेल तर उरलेला निधीही देतो, असे डॉ. पाटील यांना सांगितले.बांद्याबरोबरच नजीकच्या पत्रादेवी-गोवा हद्दीतही दोन दिवसांत तीन मृत माकडे आढळून आली आहेत. गोवा राज्य सरकारने याठिकाणी वनविभागाचे विशेष पथक पाठविले आहे. दरम्यान, याठिकाणी सापडलेल्या माकडांचे त्या ठिकाणीच शवविच्छेदन करण्यात आले असता ती माकडे केएफडी बाधित असल्याचे स्पष्ट झाले आहे.बांदा प्राथमिक आरोग्य केंद्रात उपचार घेत असलेल्या रुग्णांची प्रकृती स्थिर असल्याचे डॉ. पाटील यांनी सांगितले. तसेच मुबलक औषधे उपलब्ध असल्याचेही त्यांनी सांगितले. यावेळी बांदा सरपंच बाळा आकेरकर, संजय विर्नोडकर, डॉ. संतोष संगमवार उपस्थित होते. (प्रतिनिधी)