शहरं
Join us  
Trending Stories
1
झाशी मेडिकल कॉलेजच्या NICU वॉर्डमध्ये भीषण आग, १० मुलांचा होरपळून मृत्यू
2
आजचे राशीभविष्य, १६ नोव्हेंबर २०२४ : कर्कसाठी आनंदाचा अन् कुंभसाठी काळजीचा दिवस
3
शरद पवारांच्या उमेदवारांना धाकधूक; आधीच ‘ट्रम्पेट’ची धास्ती, त्यात १६ ठिकाणी नामसाधर्म्य अपक्षांची भर!
4
राज ठाकरेंची शिवाजी पार्कवरील सभा अचानक रद्द; उद्धव ठाकरेंना मैदान मिळण्याची शक्यता
5
प्रवाशांनो लक्ष द्या, रविवारी तिन्ही मार्गांवर मेगाब्लॉक; असे असेल वेळापत्रक
6
महत्त्वाची बातमी: 'ते' २ दिवस शाळांना सुट्टी नाही; शिक्षण आयुक्तांनी दिलं स्पष्टीकरण
7
आजचा अग्रलेख: प्रचारातील काय चालेल हो?
8
मलिकांच्या जामीन रद्दच्या त्वरित सुनावणीस नकार
9
मतदारांच्या सोयीसाठी आयोगाचे रंगीत कार्पेट; कशी असेल व्यवस्था? जाणून घ्या...
10
ढगाळ हवामानामुळे मुंबईत थंडी पळाली; बदलत्या हवामानाचा परिणाम
11
संघ मुख्यालयाच्या अवतीभोवती घरोघरी प्रचारावर भर; मध्य नागपूर मतदारसंघात दटके-शेळके लढतीत पुणेकरांमुळे रंगत
12
लॉटरी किंगकडून आठ कोटींची रक्कम जप्त
13
विक्रमी वर्ष! दक्षिण आफ्रिके विरुद्ध मालिका जिंकत टीम इंडियानं रचला इतिहास
14
रितिका-रोहित दुसऱ्यांदा झाले आई-बाबा! बेबी बॉयच्या स्वागतासाठी Junior Hit-Man चा ट्रेंड
15
आरे देवा! संजूनं चौकार-षटाकारानं डोळ्याचं पारणं फेडलं, पण तिच्यावर आली रडण्याची वेळ!
16
मोठी बातमी! राज ठाकरेंनी विश्वास टाकला, उमेदवारी दिली, पण त्यानेच ठाकरे गटात प्रवेश केला
17
IND vs SA 4th T20I : अखेर सूर्यकुमार यादवनं टॉस जिंकला, मालिका जिंकण्यासाठी सेट करणार टार्गेट
18
"घुसखोरांसह काँग्रेसलाही बांगलादेशात पाठवायला हवे..."; असं का म्हणाले हिमंता बिस्वा सरमा?
19
अजित पवार, अशोक चव्हाणांचा 'बटेंगे तो कटेंगे'ला विरोध; फडणवीस म्हणाले, "त्यांना समजवून..."
20
विजय शिवतारेंच्या पराभवासाठी अनेकजण देव पाण्यात बुडवून बसलेत; एकनाथ शिंदेंची अजितदादांच्या उमेदवाराविरोधात सभा

सिंधुदुर्ग जिल्हा कबड्डी फेडरेशनचा मनमानी कारभार; कबड्डी प्रेमी, खेळाडूंचा आरोप

By सुधीर राणे | Published: June 21, 2023 2:16 PM

कणकवली : सिंधुदुर्ग जिल्हा कबड्डी फेडरेशनचा गेल्या अनेक वर्षापासून मनमानी कारभार सुरू आहे. सिंधुदुर्गातून चांगले कबड्डी खेळाडू तयार व्हावेत, ...

कणकवली : सिंधुदुर्ग जिल्हा कबड्डी फेडरेशनचा गेल्या अनेक वर्षापासून मनमानी कारभार सुरू आहे. सिंधुदुर्गातून चांगले कबड्डी खेळाडू तयार व्हावेत, कबड्डीपटूंना प्रोत्साहन मिळावे यासाठी फेडरेशनने काहीच केलेले नाही. त्यामुळे अनेक खेळाडूंवर अन्याय झाला असल्याचा आरोप शिवछत्रपती पुरस्कार विजेते तथा क्रीडा भारती मुंबईचे अध्यक्ष रवींद्र करमळकर, कबड्डीप्रेमी बाळासाहेब सावंत, अण्णा कोदे, संघटक राजन रेडकर, नंदन वेंगुर्लेकर यांनी केला आहे.तसेच जिल्ह्याच्या निवड चाचणीत प्रामाणिक खेळाडूंना बाद करत वशिलेबाजीने इतरांची नियुक्ती केली जाते.  जिल्हा कबड्डी फेडरेशनच्या या चुकीच्या आणि मनमानी कारभारा विरोधात आम्ही महाराष्ट्र कबड्डी असोसिएशनचे अध्यक्ष अजित पवार व क्रीडा मंत्री गिरीश महाजन यांच्याकडे तक्रार करणार असल्याचेही यावेळी ते म्हणाले.सिंधुदुर्गातील कबड्डी खेळाचे संवर्धन व्हावे, कबड्डी खेळाडुंना प्रोत्साहन मिळावे या उद्देशाने कणकवली येथे कबड्डी खेळाडू आणि कबड्डीप्रेमींची मंगळवारी बैठक झाली. या बैठकीत सिंधुदुर्ग जिल्हा कबड्डी खेळाडू संघर्ष व उत्कर्ष समितीची स्थापना करण्यात आली. त्यानंतर सायंकाळी त्यांनी प्रसिद्धी माध्यमांशी  संवाद साधला. यावेळी एनआयएस कबड्डी कोच दिनानाथ बांदेकर, रतनकुमार झाजम आदींसह कबड्डी खेळाडू उपस्थित होते. रवींद्र करमळकर म्हणाले, कबड्डी खेळाच्या संवर्धनासाठी आपण आजवर काम केले. मात्र जिल्हा फेडरेशनकडून कबड्डी खेळासाठी आणि खेळाडूंसाठी कोणतेही चांगले काम झालेले नाही. जिल्ह्यात कबड्डीमध्ये अपप्रवृती बळावत आहे. आम्ही सिंधुदुर्गातील अन्यायग्रस्त कबड्डी पटूंच्या पाठीशी राहणार आहोत. येत्या काळात जिल्ह्यातील आठही तालुक्यात कबड्डी खेळाचे संवर्धन करण्याबरोबरच कबड्डीचा कृती आराखडा बनवणे, तंत्रशुद्ध प्रशिक्षण स्पर्धा भरवणे, सिंधुदुर्गातील खेळाडुंना राज्य, राष्ट्रीय स्तरापर्यंत पोहोचविणे आदी कामे करणार असल्याचे  करमळकर यांनी सांगितले. नंदन वेंगुर्लेकर म्हणाले, जिल्हा कबड्डी फेडरेशनच्या कारभाराबाबत अनेक खेळाडुंच्या तक्रारी आहेत. किशोर गट, कुमार गट, खुला गट या तीन गटांसाटी निवड चाचणी जिल्ह्याच्या विशिष्ट ठिकाणी लावली जाते. चुकीची कारणे दाखवत चांगल्या खेळांडुना डावलले जाते. निवड चाचणी सदस्यही त्यांचेच असतात. चाचणीत निवड झालेल्या खेळाडुंना हेतूपुरस्सर डावलेले जाते. फेडरेशन स्वतः आयोजक म्हणून कोणत्याही स्पर्धा घेत नाही. स्पर्धेच्या आयोजक मंडळांची दिशाभूल केली जाते. फेडरेशनकडे येणारे पैसे खेळाडुंवर खर्च होत नाहीत असा आरोपही वेंगुर्लेकर यांनी केला. अण्णा कोदे म्हणाले, कणकवलीतील प्रणय राणे या खेळाडूची निवड प्रो कबड्डीसाठी झाली. मात्र, फेडरेशनने त्याचा साधा सत्कारही केला नाही. ही शोकांतिका आहे. मग खेळाडुंना प्रोत्साहन मिळणार कसे? राजन रेडकर, बाळासाहेब सावंत यांच्यासह सर्वांनीच जिल्हा कबड्डी फेडरेशन विरोधात नाराजी व्यक्त केली.

टॅग्स :sindhudurgसिंधुदुर्गKabaddiकबड्डी