मालवण : आगामी पालिका निवडणूक शिवसेनेने स्वबळावर लढवावी, अशी मागणी शहरातील शिवसेना पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी आमदार वैभव नाईक यांच्याकडे केली. पालिका निवडणूक आणि युतीबाबतची जबाबदारी नितीन वाळके यांच्यावर सोपविण्यात आली आहे. पालिकेतील सत्ताधारी काँग्रेसच्या विरोधात जनतेमध्ये नाराजी असून त्याचा फायदा उठविण्यासाठी आतापासूनच आंदोलने करून जनतेला न्याय मिळवून द्या, असे आवाहन आमदार नाईक यांनी केले.मालवण पालिका निवडणुकीसाठी शिवसेनेकडून स्वबळाची चाचपणी करण्याबाबत महत्त्वपूर्ण बैठक येथील शासकीय विश्रामगृह येथे आमदार वैभव नाईक यांच्या अध्यक्षतेखाली घेण्यात आली. यावेळी शहरप्रमुख बाबी जोगी, उपतालुकाप्रमुख हरी खोबरेकर, निवडणूकप्रमुख नितीन वाळके, किरण वाळके, नगरसेवका सेजल परब, सन्मेश परब, रुपेश प्रभू, अन्वय प्रभू, गणेश कुडाळकर, किसन मांजरेकर, बाबू मांजरेकर, महिला तालुकाप्रमुख श्वेता सावंत, मेघा सावंत, पंकज सादये, बंड्या सरमळकर, महेश शिरपुटे, दादा पाटकर आदी पदाधिकारी, कार्यकर्ते उपस्थित होते. आगामी काळात युती होईल की नाही याबाबत कार्यकर्त्यांनी चर्चा न करता आपल्या प्रभागाकडे लक्ष देऊन प्रचाराला सुरुवात करावी. मालवण पालिकेत पुन्हा शिवसेनेची सत्ता येण्यासाठी सर्व आजी-माजी कार्यकर्त्यांना सोबत घेऊन निवडणूक प्रचार यंत्रणा राबविण्याबाबत आमदारांनी सूचना केल्या. यावेळी कार्यकर्त्यांनी काही समस्या आमदारांकडे मांडल्या. (प्रतिनिधी)इच्छुकांनी शहरप्रमुखांकडे नावे देण्याच्या सूचनाशिवसेनेतून निवडणूक लढविण्यासाठी इच्छुक उमेदवारांनी आपली नावे शहरप्रमुख बाबी जोगी यांच्याकडे नोंदविण्याची सूचना करण्यात आली आहे. तर उमेदवारांनी आपापल्या प्रभागातील संभाव्य प्रचाराचे मुद्देही प्रत्येकाने तयार करण्याच्या सूचना आमदार वैभव नाईक यांनी केल्या. बैठकीदरम्यान, सर्वच कार्यकर्त्यांनी शिवसेनेने पालिकेत स्वबळावर निवडणूक लढवावी अशी एकमुखी मागणी केल्याचे समजते. तर राज्यशासनाने नगराध्यक्षपदाचे आरक्षण जाहीर करण्याबाबत शिवसेनेने सरकारवर दबाव आणावा. यावेळी नगराध्यक्षपदाचे महिला आरक्षण कायम राहिल्यास विद्यमान नगरसेविका सेजल परब यांच्या नावाचा विचार होणार आहे. मालवण पालिका निवडणुकीत चुरसमालवण नगरपालिकेच्या निवडणुकीत शिवसेना-भाजप हे दोन्ही युती शासनातील पक्ष वेगवेगळे लढले तर त्याचा फायदा काँग्रेस-राष्ट्रवादीला होण्याची चिन्हे आहेत. कारण हे दोन राज्यात सत्ताधारी पक्ष आहेत. तर सध्या मालवण पालिका काँग्रेसच्या ताब्यात आहे.
सेनेचा स्वबळाचा नारा
By admin | Published: September 17, 2016 11:21 PM