शहरं
Join us  
Trending Stories
1
मुख्यमंत्री होताच हेमंत सोरेन यांचा मोठा निर्णय, 'मैया सन्मान योजने'संदर्भात मोठी घोषणा
2
अमेरिकन भारतात पैसा गुंतवतात; मुकेश अंबानींनी अमेरिकेत केलं मोठं डील
3
PM Modi Salary: पंतप्रधान मोदींना दर महिन्याला सत्कार भत्ता म्हणून मिळतात केवळ 3000 रुपये, जाणूनघ्या किती आहे सॅलरी?
4
“आधी CM राज्यात ठरायचा आता दिल्लीत निर्णय होतो, अजितदादांनी वेगळा अनुभव घ्यावा”: काँग्रेस
5
इस्रायलनं काही तासांतच केलं युद्धविरामाचं उल्लंघन? लेबनानमध्ये हिजबुल्लाहच्या ठिकाणावर केला मोठा हवाई हल्ला
6
Killer Cat: पाळलेल्या मांजरीच्या हल्ल्यात एकाचा मृत्यू; पत्नी म्हणते...
7
विराट कोहली सोबत World Cup ची ट्रॉफी उंचावणाऱ्या भारतीय खेळाडूचा क्रिकेटला रामराम
8
शाही जामा मशिदीच्या सर्वेक्षणाविरोधात मशीद समितीची सर्वोच्च न्यायालयात धाव; उद्या सुनावणी
9
"घुमटात मंदिराचे अवशेष..., तळघरात आजही गर्भगृह विद्यमान"; अजमेर शरीफ दर्ग्यासंदर्भात हिंदू सेनेनं केले आहेत मोठे दावे
10
कलादिग्दर्शक नितीन चंद्रकांत देसाईंचा ND स्टुडिओ आता 'गोरेगाव फिल्मसिटी'च्या ताब्यात!
11
“भाजपा नेहमीच नवीन नेतृत्वाचा शोध घेत असते, राजस्थान-मध्य प्रदेशप्रमाणे...”: चंद्रकांत पाटील
12
"शिंदेनी मुख्यमंत्रीपदाचा दावा सोडलेला नाही", उदय सामंतांच्या विधानामुळे चर्चांना उधाण 
13
बाईकची टाकी फुल ठेवा, जास्त मायलेज मिळवा...! खरोखरच असे होते? तुम्हीही १००-२०० चेच भरता का...
14
IND vs PAK: भारताचा १३ वर्षीय वैभव सूर्यवंशी आता पाकिस्तानला चोपणार, सामना कधी?
15
पत्रकारानं थेट प्रश्न विचारला, अजित दादांनी मिश्किल उत्तर दिलं; म्हणाले, "मी काही ज्योतिष नाही..."! नेमकं काय घढलं?
16
मोठा दावा! एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री पदही स्वीकारणार नाहीत; शिंदे गटातून कोण होणार नेता...
17
बांगलादेशात 'इस्कॉन'च्या चिन्मय कृष्ण दास यांना अटक, शेख हसिना यूनुस सरकाविरोधात आक्रमक
18
भारतातील मोबाईल, फोन नंबर +91 ने का सुरु होतात? कोणी दिला हा नंबर...
19
... तर राजकारणातून निवृत्ती घेईन, शहाजीबापू पाटील यांचे मोठे विधान
20
७.८३ टक्के मतं कशी वाढली? नाना पटोलेंच्या आरोपांवर निवडणूक आयोग म्हणतं, "हे सामान्य आहे कारण..."

सतीश सावंत यांना अटक करा, जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा संजना सावंत यांची पोलिसांकडे धाव

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 30, 2021 3:59 PM

कणकवलीतील मतदान केंद्रावर मोबाईल आणू नये असे निवडणूक निर्णय अधिकाऱ्याचे निर्देश असतानाही जिल्हा बँकेचे उमेदवार सतीश सावंत यांनी याठिकाणी मोबाईल नेला. यावर संजना सावंत यांनी आक्षेप घेतला. त्यावेळी दोघांमध्ये बाचबाची झाली.

सिंधुदुर्ग : आक्षेपार्ह विधान व अपमानजनक वागणूक दिल्याप्रकरणी सतीश सावंत यांच्या विरोधात तक्रार दाखल करण्यासाठी जिल्हा परिषद अध्यक्ष संजना सावंत कणकवली पोलीस ठाण्यात दाखल झाल्या आहेत. मतदान केंद्रावर घडलेल्या प्रकार व्हिडीओ क्लीप आपल्याकडे असून मला अपमानस्पद वागणूक देत आक्षेपार्ह विधान केल्याप्रकरणी सतीश सावंत यांना अटक करा अशी मागणी संजना सावंत यांनी पोलिसांकडे केली आहे.कणकवलीतील मतदान केंद्रावर मोबाईल आणू नये असे निवडणूक निर्णय अधिकाऱ्याचे निर्देश असतानाही जिल्हा बँकेचे उमेदवार सतीश सावंत यांनी याठिकाणी मोबाईल नेला. यावर संजना सावंत यांनी आक्षेप घेतला. त्यावेळी दोघांमध्ये बाचबाची झाली. यावेळी सतीश सावंत यांनी आक्षेपार्ह शब्दाचा उच्चार केला. याबाबत संजना सावंत यांनी पोलीस ठाणे गाठून आक्षेपार्ह विधान व अपमानजनक वागणूक दिल्याप्रकरणी सतीश सावंत यांच्या विरोधात तक्रार दाखल करण्यासाठी पोलीस स्टेशनकडे धाव घेतली. तर, सतीश सावंत यांना अटक करा अशी मागणी देखील केली.सिंधुदुर्ग मध्यवर्ती सहकारी बँक निवडणुकीसाठी आज मतदान प्रक्रिया सुरु आहे. त्या पार्श्वभूमीवर कणकवली तहसील कार्यालयाबाहेर विकास आघाडीतील पदाधिकारी व कार्यकर्ते एका बुथवर तर भारतीय जनता पार्टीचे पदाधिकारी व कार्यकर्ते दुसऱ्या बुथवर मोठ्या संख्येने उपस्थित आहेत. राजकीय दृष्ट्या संवेदनशील कणकवलीत पोलिसांनी मतदान केंद्रावर चोख बंदोबस्त ठेवला आहे.

टॅग्स :sindhudurgसिंधुदुर्गbankबँकElectionनिवडणूक