शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Vidhan Sabha 2024: उत्तर महाराष्ट्रात ‘महायुती’चे प्राबल्य कायम राहणार का? 
2
PM नरेंद्र मोदी ब्राझीलला पोहोचले, जोरदार स्वागत; जी-२० शिखर परिषदेत सहभागी होणार! 
3
भाजप सरकारचा मुंबई लुटण्याचा डाव, तेलंगणाचे मुख्यमंत्री रेवंत रेड्डींचा आरोप 
4
Vidhan Sabha election 2024: अचलपूर मतदारसंघात बच्चू कडू इतिहास रचणार का? 
5
श्रीगोंद्यातील राहुल जगतापांना मोठा धक्का; शरद पवारांच्या राष्ट्रवादीतून निलंबन
6
नांदेड लोकसभा पोटनिवडणूक : विधानसभेच्या उमेदवारांवर लोकसभेच्या विजयाचा ‘टेकू’
7
Maharashtra Vidhan Sabha 2024:  उमेदवार किती कोट्यधीश, किती शिकलेले?
8
Success Story : रतन टाटांच्या कंपनीत करायचे नोकरी, एका खोलीतून सुरू केला बिझनेस; आज आहेत १३,५०० कोटींचे मालक
9
घटना बदलण्याचे पाप काँग्रेसचे, त्यांनी शेतकरी, मजुरांकडे दुर्लक्ष केले -नितीन गडकरी
10
'नौटंकी करून मते मिळत नाहीत, मविआकडून दिशाभूल', देवेंद्र फडणवीस यांचे नागपुरात शक्तिप्रदर्शन
11
कोल्हापूरमध्ये जनसुराज्य शक्तीच्या उमेदवारावर जीवघेणा हल्ला, धारदार शस्त्रांनी केले वार 
12
Today Daily Horoscope: आजचे राशीभविष्य: धन व प्रतिष्ठेची हानी संभवते, स्त्रीयांशी व्यवहार करताना सावध राहावे!
13
'बिग बॉस मराठी' फेम अभिनेत्याचं शुभमंगल सावधान! लग्नाचे फोटो आले समोर
14
तुम्ही कितीही झेंडे दाखविले तरी मविआच येणार निवडून; प्रियांका गांधी यांचे भाजप कार्यकर्त्यांना प्रत्युत्तर
15
प्रचाराच्या तोफा आज थंडावणार! उमेदवार, मतदारांना आता प्रतीक्षा बुधवारची
16
महागाई नियंत्रणात आणू, मुलांना मोफत शिक्षण देऊ; उद्धवसेनेचे पक्षप्रमुख ठाकरे यांचे आश्वासन
17
Maharashtra Vidhan Sabha 2024: ‘टॉप फाइव्ह’मध्ये मुंबई, ठाणे का नाही?
18
"एमएमआरमध्ये आणले सात लाख कोटींचे प्रकल्प"; देवेंद्र फडणवीस यांचा मुंबई, कोकणातील प्रचारात फोकस
19
Maharashtra Vidhan Sabha Election 2024: कोकणात आजी-माजी आमदारांची प्रतिष्ठा पणाला
20
विधानसभा निवडणुकीत पुन्हा महत्त्वाचा मुद्दा; कांद्यामुळे गावाकडे शेतकरी तर शहरात ग्राहक बेजार

सिंधुदुर्गात गणरायाचे थाटात आगमन, उत्साहात गणेशोत्सवाला प्रारंभ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 13, 2018 2:21 PM

' गणपती बाप्पा मोरया, मंगलमुर्ती मोरया' च्या जयघोषात गुरुवारी सिंधुदुर्गात ३५ ठिकाणी सार्वजनिक तर ६८ हजार २९१ ठिकाणी घरगुती अशा एकूण ६८ हजार ३२६ ठिकाणी गणेशमूर्तीची स्थापना करून विधिवत पूजन करण्यात आले. यानिमित्ताने भक्तिमय वातावरण निर्माण झाले असून मोठ्या उत्साहात गणेशोत्सवाला प्रारंभ झाला आहे. या आनंदोत्सवात लहान थोर दंग झाल्याचे चित्र सर्वत्र पहायला मिळत आहे.

ठळक मुद्देसिंधुदुर्गात गणरायाचे थाटात आगमनउत्साहात गणेशोत्सवाला प्रारंभ

सुधीर राणे कणकवली : ' गणपती बाप्पा मोरया, मंगलमुर्ती मोरया' च्या जयघोषात गुरुवारी सिंधुदुर्गात ३५ ठिकाणी सार्वजनिक तर ६८ हजार २९१ ठिकाणी घरगुती अशा एकूण ६८ हजार ३२६ ठिकाणी गणेशमूर्तीची स्थापना करून विधिवत पूजन करण्यात आले. यानिमित्ताने भक्तिमय वातावरण निर्माण झाले असून मोठ्या उत्साहात गणेशोत्सवाला प्रारंभ झाला आहे. या आनंदोत्सवात लहान थोर दंग झाल्याचे चित्र सर्वत्र पहायला मिळत आहे.सिंधुदुर्गसह कोकणात महत्वपूर्ण समजल्या जाणाऱ्या गणेशोत्सवाची तयारी गेल्या एक महिन्यापासून अधिक काळ सुरु होती. भाद्रपद महीना सुरु झाला आणि या तयारीने आणखीनच वेग घेतला होता. अखेर भाद्रपद शुध्द चतुर्थीला म्हणजेच गुरुवारी गणरायाची भावपूर्ण वातावरणात अनेक घरात स्थापना करण्यात आली.गणेशचतुर्थीच्या दिवशी होणारी तारांबळ टाळण्यासाठी काही ठिकाणी बुधवारीच श्री गणेश मूर्ती घरी आणून ठेवण्यात आली होती. तर काही ठिकाणी ढोल ताशांच्या गजरात गुरुवारी सकाळी गणरायाचे आगमन झाले. सकाळपासूनच गणरायाच्या पूजेसाठी अनेक घरात लहान थोर मंडळींची लगबग सुरु होती.श्री गणेश मुर्तीची स्थापना झाल्यानंतर विधिवत पूजन करण्यात आले. त्यानंतर आरतीही करण्यात आली. उकडीच्या एकविस मोदकांचा नैवेद्य गणरायाला अर्पण करण्यात आला.त्यानंतर सर्वानी नैवेद्य प्रसाद म्हणून ग्रहण केला. तर सायंकाळी ही पुन्हा पूजन, आरती करण्याबरोबरच भजन तसेच अन्य धार्मिक विधि करण्याचा परिपाठ सुरु झाला आहे. तो श्री गणेश मूर्ती विसर्जनापर्यन्त सुरु रहाणार आहे.प्रत्येक घरात पारंपरिक पद्धतीने तसेच प्रत्येकाच्या रुढीनुसार दीड, पाच, सात, नऊ, अकरा, सतरा, एकोणिस, एकविस, बेचाळीस असा गणेशोत्सव साजरा होणार आहे. त्यामुळे त्यानिमित्ताने सर्वत्र वातावरण भारावलेले राहणार आहे.त्यासाठी नियोजन करण्यात आले आहे. तर सार्वजनिक गणेशोत्सवाच्या ठिकाणी धार्मिक कार्यक्रमांबरोबरच सांस्कृतिक कार्यक्रम होणार आहेत. प्रशासन ही कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये यासाठी प्रयत्न करीत आहे.पुरोहितांची लगबग !अनेक घरात पुरोहितांच्या उपस्थितीत श्री गणेश मुर्तीची स्थापना तसेच विधिवत पूजन करण्यात आले. अनेक ठिकाणी पुरोहिताना पुजेसाठी आमंत्रण देण्यात आलेले असल्याने यजमानांच्या घरी पूजनाची वेळ साधण्यासाठी सकाळ पासूनच अनेक पुरोहितांची लगबग सुरु होती.मृदंग, तबल्याच्या साथीने आरतीचे स्वर उमटले!घरोघरी गणरायाचे विधिवत पूजन झाल्यानंतर परंपरेप्रमाणे आरती करण्यात आली. तर घरात विराजमान झालेल्या राजस सुकुमार अशा गणरायाचे दर्शन झाल्यानंतर अगदी आतुरतेने आपल्या लाडक्या गणपती बाप्पाची वाट पहाणाऱ्या लहान थोर मंडळींचा आनंद गगनात मावेनासा झाला. टाळ, ढोलकी, मृदंग, तबला, हार्मोनियम आदी वाद्यांच्या साथीने सर्वत्र सुमधुर आरतीचे स्वर गणेशोत्सवाच्या निमित्ताने अनेक घरात उमटले.पावसाच्या उघडीपीने दिलासा!श्री गणेश चतुर्थीच्या दिवशी सकाळ पासूनच पावसाने उघडीप दिल्याने भाविकाना दिलासा मिळाला. तसेच श्री गणेश मूर्ती घरी आंणताना होणारी तारांबळ टाळता आली. त्यामुळे भाविकानी गणरायाचे आभार मानले.

टॅग्स :Ganesh Chaturthi 2018गणेश चतुर्थी २०१८sindhudurgसिंधुदुर्ग