सावंतवाडी : दोन दिवसापूर्वी सावंतवाडीत घडलेल्या चैत्राली निलेश मेस्त्री या महिलेच्या आत्महत्या प्रकरणाला वेगळेच वळण लागले असून ही आत्महत्या नसून तिचा खून झाल्याचे पोलिस तपासात पुढे आले आहे. हा खुन चैत्रालीचा चुलत दिर संदेश धोंडू मेस्त्री (19) यानेच केल्याचे पोलिसांचे म्हणने आहे.दरम्यान हा खुन जेवण वाढण्यावरून झालेल्या वादावादी तून घडला असून कुणाला संशय येऊ नये म्हणून आरोपी संदेश याने चैत्रालीने आत्महत्या केल्याचे भासवले असल्याचे पोलिस निरीक्षक ऋषिकेश अधिकारी यांनी सांगितले.
याबाबत माहिती अशी मूळची मुळशी पुणे येथील चैत्राली मेस्त्री हिचा विवाह रत्नागिरी-खेड येथील निलेश मेस्त्री यांच्याशी झाला होता.बरीच वर्षे हि पती पत्नी मुळशी पुणे येथे राहत असत.निलेश हा सुतारकाम करत असे तर पत्नी चैत्राली ही मोलमंजुरी करत होती.मात्र कालांतराने पती पत्नी मध्ये वाद विवाद होत असल्याने त्याचा फायदा निलेश याच्या मावशीचा मुलगा संदेश धोडू मेस्त्री याने घेतला त्याची सतत चैत्राली राहत असलेल्या मुळशी येथील घरी ये जा असायची यामुळे चैत्राली च्या घरातील नातेवाईक वैतागले त्यानी तुम्ही दुसरीकडे रहा असे सांगितले होते.
त्यातूनच चैत्राली ही चुलत दिर संदेश सोबत एक ते दिड महिन्या पूर्वी कुणाला न सांगता बाहेर पडली त्याना पुण्यातून थेट गोवा गाठायचे होते..पण पैसे कमी असल्याने सावंतवाडीत थांबण्याचा निर्णय त्यांनी घेतला तसेच सावंतवाडी शहरातील सबनीवाडा भागात हि दोघे व चैत्रालीचा मुलगा असे तिघे मिळून भाड्याने घर घेऊन राहत होती.सावंतवाडी येथे वास्तव्य केल्यानंतर संदेश याला एका दुकानात काम मिळाले तर चैत्राली ही घरकाम करू लागली.
अशातच शनिवारी सुट्टी असल्याने संदेश याने घरी मासे व मटण आणून दिले व मी दुपारी येतो करून ठेव असे सांगितले.ठरल्याप्रमाणे चैताली हिने जेवण करून ठेवले व ती झोपी गेली बाहेर गेलेला संदेश हा घरी आल्यानंतर चैत्राली झोपी गेल्याचे बघून तो संतपला मला जेवण वाढ असे सांगून त्याच्या दोघात जोरदार बाचाबाची झाली त्यातच संदेश याने चैत्रालीचे डोके भिंतीवर आदळले त्यातच ती गतप्राण झाली.चैत्राली काहिच बोलत नाही म्हटल्यावर आता आपण पुरते अडकलो हे लक्षात आल्यावर तिच्या गळ्यावर फास अडकवून तिला वर टागले तरीही त्याला चैत्राली मृत पावल्याची खात्री पटत नव्हती म्हणून त्याने तिच्या पायाला गरम चटका दिला तेव्हा चैत्राली ने कोणताही प्रतिकार केला नसल्याने अखेर चैत्राली मृत पावली यांची संदेश ला खात्री झाली.
त्यानंतर मृतदेह खाली उतरवत 112 नंबर करून पोलिसांना बोलवले.पोलिसांनी घटनास्थळी जाऊन खात्री केली त्यावेळी थोडाफार संशय आल्याने मृत चैत्रालीचा दिर संदेश याला ताब्यात घेतले व चौकशी केली असता त्यांच्याकडून मिळालेल्या उत्तरात विसंगती आढळून आल्याने अखेर सोमवारी सायंकाळी त्याला पोलिसांकडून रितसर अटक करण्यात आली.शवविच्छेदन कोल्हापूर सीपीआर येथे
चैत्राली हिच्या मृतदेहावर काही खुणा आढळून आल्याने पोलिसांकडून तिची उत्तरीय तपासणी कोल्हापूर येथील सीपीआर रूग्णालयात इन कॅमेरा करण्यात आली त्याचा अहवाल लवकरच पोलिसांना प्राप्त होणार आहे.मृत चैत्रालीच्या आईने दिली तक्रार
आपल्या मुलीचा संदेश यानेच खुन केल्यावर चैत्रालीची आई लता गाडले ठाम होती.तिनेच पोलिसात तक्रार दिली त्यावरून पोलिसांनी खुनाचा गुन्हा नोंदवला आहे.