सावंतवाडी : देशातील इंडिया आघाडीचे निवडणुकीबाबतचे सूत्र निश्चित झाले आहे यामध्ये सद्यस्थितीत लोकसभा व विधानसभेला ज्या पक्षाचा खासदार किंवा आमदार असेल त्याच पक्षाच्या उमेदवाराला तीच जागा देण्यात येणार असल्याचा दावा शिवसेना नेते खासदार विनायक राऊत यांनी केला आहे. मात्र त्यांनी इंडिया आघाडीचा जागा वाटपाचा अंतिम निर्णय पक्षश्रेष्ठी एकत्र बसून ठरवतील असेही त्यांनी सांगितले आहे.ते सावंतवाडी तालुक्यातील नेमळे येथे विविध विकासकामांच्या भूमिपूजन कार्यक्रमानंतर पत्रकारांशी संवाद साधला.यावेळी शिवसेना सर्पक प्रमुख अरूण दुधवडकर जिल्हाप्रमुख संजय पडते, शैलेश परब,रूपेश राऊळ उपस्थित होते.
खासदार राऊत म्हणाले, कदाचित लोकसभेच्या निवडणुकी सोबत विधानसभेची ही निवडणूक होऊ शकेल याबद्दल आत्ताच काही सांगता येणार नाही परंतु तूर्तास ज्या पक्षाचा खासदार आमदार सद्यस्थिती मध्ये आहे ती जागा त्या पक्षाला मिळणार हे आता निश्चित झाले आहे. तसे जागा वाटप निश्चित झाले आहे. यापुढे विधानसभा आणि लोकसभा मतदारसंघांमध्ये उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेचे पदाधिकारी ठाण मांडून बसणार आहेत. राज्यातील सरकारच्या मंत्र्यांना त्यांची जागा दाखवून देणार असल्याचा इशाराही त्यांनी यावेळी दिला आहे.