शहरं
Join us  
Trending Stories
1
पक्षाध्यक्ष मी अन् यांनी कसे काय तिकीट दिले?;शरद पवारांनी उडवली अजित पवारांची खिल्ली
2
"मुख्यमंत्री नाही, पण ५ मिनिटांसाठी तरी पंतप्रधान होणार", महादेव जानकरांनी व्यक्त केला विश्वास 
3
अभिनेत्री कश्मीरा शाहचा भीषण अपघात, रक्ताने माखले कपडे; नेमकं काय घडलं?
4
"कुटुंबातील महिलांमध्ये वाद निर्माण करण्याची काँग्रेसची योजना", 'गृहलक्ष्मी'वरून चित्रा वाघ यांचा निशाणा
5
Basmath Vidhan Sabha 2024: दोन राष्ट्रवादीत लढत! जयप्रकाश दांडेगावकर vs राजू नवघरे रिंगणात... गुरूच्या विरोधात शिष्य!
6
दादर-माहीमची निवडणूक अटीतटीची होईल की एकतर्फी? अमित ठाकरे म्हणाले, "मी तुम्हाला..."
7
शाळांच्या सुट्टीबद्दल शिक्षण आयुक्तालय आणि महापालिकेचा परस्परविरोधी निर्णय
8
'मुन्नाभाई MBBS'मधला स्वामी आता दिसतो खूपच वेगळा, लेटेस्ट फोटो पाहून चाहते झाले अवाक्
9
Fact Check: 'जर्सी नं. 7' धोनीच्या सन्मानार्थ RBI ७ रुपयांचं नाणं आणणार?; व्हायरल दाव्यामागील सत्य वेगळंच
10
Maharashtra Election 2024 Live Updates: महाराष्ट्राची निवडणूक ही विचारसरणीची निवडणूक- राहुल गांधी
11
खासगी विमान, ३० हून अधिक लक्झरी कार्स, परदेशात मालमत्ता; नायजेरियाच्या राष्ट्रध्यक्षांची संपत्ती किती?
12
विलंबामुळे वाढले टेन्शन, हुकणार होती लग्नाची गाडी; मुंबईवरून निघालेल्या नवरदेवासाठी थांबविली रेल्वे!
13
ऑनलाइन तेल पडले महागात! अमेरिकेत मुलाची केस गळती, वाशीतल्या वडिलांना लाखोंचा गंडा
14
कैलाश गहलोत भाजपात जाणार, रविवारी दिला होता मंत्रिपदासह आपचा राजीनामा
15
संजय निरुपम यांनाच वोट करा! जान्हवीचा व्हिडिओ पाहून चाहत्यांचा संताप, म्हणाले- "किती पैसे मिळाले?"
16
Sankashti Chaturthi 2024: तुमचा आज संकष्टीचा उपास आहे? जाणून घ्या चंद्रोदयाची वेळ आणि नियम!
17
एकावर ४ बोनस शेअर्स देणार 'ही' कंपनी; शेअरमध्ये तुफान तेजी, कोणता आहे हा स्टॉक?
18
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 :'मी पुढील निवडणूक पाहणार की नाही..."; रोहिणी खडसेंसाठी एकनाथ खडसेंची भावनिक साद
19
जळगाव शहर मतदारसंघातील अपक्ष उमेदवाराच्या घरावर गोळीबार 
20
Maharashtra Vidhan Sabha 2024: उत्तर महाराष्ट्रात ‘महायुती’चे प्राबल्य कायम राहणार का? 

बांदा ग्रामपंचायतीच्या कारभारावर हल्लाबोल

By admin | Published: July 20, 2016 11:23 PM

श्रीकृष्ण काणेकर यांची टीका : कचराकुंडी खरेदीत भ्रष्टाचार ; सीईओंना भेटणार

बांदा : ग्रामपंचायतीच्या कचराकुंडी खरेदीत ९0 हजार रुपयांचा भ्रष्टाचार करण्यात आला असून बांदा ग्रामपंचायतीत बेनामी ठेकेदारी वाढली आहे. शहरातील कामे निकृष्ट दर्जाची व बोगस केली जात आहेत. केवळ भाजपच्या वरिष्ठ पदाधिकाऱ्यांना खुश करण्यासाठी ‘मिलकर खाए’ अशी अवस्था निर्माण झाली आहे. अशा कारभाराची विशेष पथकाकडून लेखापरिक्षण केल्यास अनेक घोटाळे बाहेर येतील. याबाबत मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांकडे पाठपुरावा करणार असल्याची माहिती माजी सरपंच श्रीकृष्ण काणेकर यांनी दिली. बांदा ग्रामपंचायतीच्या कारभाराबाबत व सत्ताधाऱ्यांवर चौफेर टिका केली. बांदा येथे आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. यावेळी त्यांनी तंटामुक्त पुरस्काराच्या रकमेतून ग्रामपंचायतीने ४९ सार्वजनिक कचरा कुंड्या खरेदी केल्या आहेत. अ‍ॅरिस्टो प्लास्ट या कंपनीच्या कचरा कुंड्या या ४२७४ रुपये प्रति कचरा कुंडी या दराने खरेदी केल्या आहेत. याची कागदोपत्री माहिती आपण मिळविली असून याचा दर प्रति कुंडी २२४१ रुपये आहे. त्यामुळे कचरा कुंडी खरेदीत ९0 हजार रुपयांचा भ्रष्टाचार करण्यात आल्याचा आरोप काणेकर यांनी केला. यामुळे गेल्या २ वर्षातील सीएफएल बल्ब खरेदी व १५ टक्के मागासवर्गीय निधीतून खरेदी केलेल्या वस्तुंबाबत संशयास्पद कारभार असून त्याचीही सखोल चौकशी होण्याची गरज आहे. मच्छीमार्केट येथे सीआरझेडचा नियम असतानाही भाजी मार्केट बांंधण्याचा निर्णय ग्रामपंचायतीने घेतला. यासाठी लोकवर्गणीसाठी ५ लाख ४0 हजार रुपये नाहक भरण्यात आले आहेत. हे पैसे अडकून पडले आहेत. तर उभाबाजार येथील गटाराचे बांधकाम निकृष्ट काम पहिल्याच पावसात उघड झाले आहे. जनतेच्या पैशातून खरेदी केलेल्या फायबरची स्वच्छतागृहे विनावापर पडून आहेत. सत्ताधारी केवळ घोषणा करतात, मात्र शहरात भौतिक सुविधांची वानवा आहे. वस्तू खरेदीसाठी राबविण्यात येणारी ई-टेडरिंग सुविधा ही भ्रष्टाचारासाठी कुरण असल्याचे बांदा ग्रामपंचायतीत सिध्द झाले आहे. विशेष लेखापरिक्षकांकरवी ग्रामपंचायतीचे लेखापरिक्षण केल्यास अनेक आर्थिक घोटाळे उघड होण्याची शक्यता आहे. लवकरच ग्रामपंचायतीतील सर्व प्रकरणांची चौकशी करण्यासाठी प्रशासनाकडे पाठपुरावा करणार असल्याचे काणेकर यांनी स्पष्ट केले. तसेच शहरात कोट्यवधी रुपयांची विकासकामे केल्याचा आव आणत आहेत. मात्र पोलिस स्थानकातील नळपाणी पाईपलाईन, आळवाडी येथील उद्यान, तीन तुळशीकडील ओहोळावरील पूल, बांदेश्वर मंदिरकडील मोठ्या गटाराची सफाई आपण आपल्या कारकिर्दित केली आहे, असे यावेळी काणेकर यांनी सांगितले. तर पारदर्शक कारभार करा व जनतेचा विश्वास मिळवा, असा सल्लाही काणेकर यांनी यावेळी दिला. (प्रतिनिधी)आपल्या कारकीर्दीतील व्यवहार पारदर्शीआपण सरपंच असतानाचे सर्व व्यवहार हे पारदर्शक होते. हिंमत असेल तर आपल्या कारकीर्र्दीतील घोटाळे उघड करुन दाखवावेत, असे आव्हानही काणेकर यांनी यावेळी दिले.सरपंचांचे फुकाचे श्रेय घेण्याचा प्रयत्नदिपक केसरकर हे आमदार असताना बांद्यात क्रीडानगरीचे आश्वासन मी सरपंच असताना आपणास दिले होते. त्यामुुळे हे क्रीडा संकुल आपण मंजूर करुन आणल्याचा सरपंचांचा दावा खोटा आहे. कोणतीही कामे न करता केवळ फुकाचे श्रेय घेण्याचा त्यांचा प्रयत्न आहे.