शहरं
Join us  
Trending Stories
1
आता पाण्याच्या थेंबा-थेंबासाठी तरसणार पाकिस्तान! पहलगामनंतर भारताचे 'वॉटर स्ट्राइक'; सिंधू जल करार स्थगित
2
अटारी चेकपोस्ट बंद, पाक नागरिकांचे व्हिसा रद्द, ४८ तासात देश सोडण्याचे आदेश; भारताची कठोर भूमिका
3
"तुम्ही हर-हर महादेव म्हणत संघटित तर होऊ शकत नाही, मग अल्लाह हू अकबर म्हणत..."; मनोज मुंतशिर भडकले
4
पहलगाम हल्ल्यातील दहशतवाद्यांची माहिती देणाऱ्यांना 'इतक्या' लाखांचे बक्षीस; काश्मीर पोलिसांची घोषणा
5
पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारताच्या बाजूने उभे राहिले हे मुस्लीम देश, काय म्हणतोय पाकिस्तान?
6
दुर्गम भाग, सुरक्षा व्यवस्था नाही...दहशतवाद्यांनी हल्ल्यासाठी पहलगाम का निवडले?
7
पहलगाम हल्ल्यानंतर PM मोदींच्या नेतृत्वात CCSची अडीच तास बैठक, पाकिस्तानला मोठा दणका
8
पहलगाम हल्ला: पाकिस्तानी क्रिकेटरनेच काढली पाकिस्तानची लक्तरं, म्हणाला- लाज वाटते...
9
"तू बाहर आ..."; दहशतवाद्यांनी आयत म्हणायला सांगितली, मग व्यावसायिकावर गोळ्या झाडल्या, मुलीनं सांगितला भयावह प्रसंग
10
पहलगाम हल्ल्यानंतर काश्मीरमध्ये मोठी कारवाई; 1500 लोकांना घेतले ताब्यात, चौकशी सुरू...
11
Pahalgam Terror Attack: मॅच आधी खेळाडूंनी दहशतवादी हल्ल्यातील मृत पर्यटकांना वाहिली श्रद्धांजली
12
बिल क्लिंटन भारतात येण्यापूर्वी झाली होती ३६ शीखांची हत्या; २५ वर्षांनी पहलगाममध्येही तेच घडलं
13
Pahalgam Terror Attack : सुट्टी घेऊन अमेरिकेहून काश्मीर फिरण्यासाठी आला अन् दहशतवादी हल्ल्यात जीव गमावला
14
पहलगाम हल्यामुळे काश्मीरच्या अर्थव्यवस्थेला फटका; पर्यटकांनी रद्द केल्या बुकिंग्स...
15
पहलगाम हल्ला: २४ तासांनंतर बांगलादेशची पहिली प्रतिक्रिया आली; मोहम्मद युनूस म्हणाले...
16
कुलगाममध्ये मोठी चकमक सुरु; पहलगाममध्ये हल्ला करणाऱ्या टीआरएफच्या कमांडरला घेरले
17
"निष्पाप भारतीयांना मारणं हाच पाकिस्तानचा राष्ट्रीय खेळ, आता..."; भारतीय क्रिकेटरला राग अनावर
18
“पंतप्रधानांनी खंबीर भूमिका घ्यावी, २६चा बदला २६०ने घेतला पाहिजे”; शिंदेसेनेचे नेते संतापले
19
"हे सरकार हिंदुत्वाबद्दल बोलतंय, त्यामुळे मुस्लिमांना कमकुवत झाल्यासारखं वाटतंय"; 'पहलगाम'बाबत रॉबर्ट वाड्रा यांचं विधान चर्चेत
20
"यांचा सामना कसा करायचा? भारताला चांगलं ठाऊक, आम्हीही सोबत...!"; पहलगाम हल्ल्यानंतर भारताच्या खास मित्राचं आश्वासन

कुडाळ तालुक्यात ३०० बेड्सची उपलब्धता, संजना सावंत यांची माहिती

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 5, 2021 15:12 IST

CoronaVirus Kudal Sindhudurg : कुडाळ तालुक्यातील वाढती रुग्णसंख्या लक्षात घेता, प्राधान्याने ॲग्रिकल्चर कॉलेज येथे, होमगार्ड भवन, वुमन्स कॉलेज येथे, बॅरिस्टर नाथ पै येथे, तसेच अणाव नर्सिंग असे मिळून कुडाळ तालुक्यात तीनशे बेड्‌सचे उद्दिष्ट पूर्ण करण्याचे नियोजन करण्यात आलेले आहे.

ठळक मुद्देकुडाळ तालुक्यात ३०० बेड्सची उपलब्धता, संजना सावंत यांची माहिती वाढत्या रुग्णसंख्येने प्रशासनाने घाबरून जाऊ नये

ओरोस : कुडाळ तालुक्यातील वाढती रुग्णसंख्या लक्षात घेता, प्राधान्याने ॲग्रिकल्चर कॉलेज येथे, होमगार्ड भवन, वुमन्स कॉलेज येथे, बॅरिस्टर नाथ पै येथे, तसेच अणाव नर्सिंग असे मिळून कुडाळ तालुक्यात तीनशे बेड्‌सचे उद्दिष्ट पूर्ण करण्याचे नियोजन करण्यात आलेले आहे.कुडाळ तालुक्यातील कोविड सेंटर्सची यादी व उपलब्ध बेड्‌सची संख्या ऑनलाईन पद्धतीने जाहीर करण्यात येणार आहे, अशी माहिती अध्यक्षा संजना सावंत यांनी देतानाच, जिल्ह्यात कोरोना रुग्णसंख्या वाढत असताना जिल्हा परिषद आरोग्य विभाग सेवा देण्यासाठी कोणतीही कमतरता ठेवणार नसल्याची ग्वाही दिली आहे. याबाबतचे पूर्ण नियोजन जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. महेश खलिपे व तालुका आरोग्य अधिकारी डॉ. संदेश कांबळे यांच्या देखरेखीखाली झालेले आहे.उर्वरित जिल्ह्यात तालुकानिहाय जिल्हा परिषद आरोग्य विभागाच्या माध्यमातून अशाच प्रकारचे नियोजन करून १२०० अतिरिक्त बेड्‌स उपलब्ध करून ठेवणार असल्याचे उद्दिष्ट जिल्हा परिषद सिंधुदुर्ग आरोग्य विभागाने निश्चित केलेले आहे. यामध्ये कोरोनाबाधित रुग्णांना दाखल करून घेणे, तसेच त्यांच्यावर तज्ज्ञ डॉक्टरांमार्फत देखरेख ठेवणे, नियमित तपासणी करून आवश्यकतेप्रमाणे ऑक्सिजन सुविधा, आवश्यक असल्यास तात्पुरत्या स्वरूपात ऑक्सिजन व ऑक्सिजन कॉन्सन्ट्रेटर ही सुविधा देखील उपलब्ध करून देण्यात आलेली आहे.

जेणेकरून रुग्णांवर योग्य उपचार होतील व या आजारातून लवकर बाहेर येण्यास मदत होईल. याबाबत कुडाळ तालुक्यातील खासगी डॉक्टर यांना देखील विनंती करून, त्यांनीही आपली सेवा उपलब्ध करून देण्यास सहमती दर्शवली आहे. जिल्ह्यातील सर्व वैद्यकीय सेवा देणाऱ्या डॉक्टर्सना विनंती आहे की, आपल्याकडे तपासणीसाठी येणारे सापाचे रुग्ण यांना आपल्या नजीकच्या प्राथमिक आरोग्य केंद्राकडे रेफर करावे. सिम्प्टम्स असणाऱ्या व्यक्तींना हे कीट प्राधान्याने वापरावे, असे आवाहन जिल्हा परिषद अध्यक्षा संजना सावंत यांनी केले आहे.निदान लवकर झाल्याने प्रसार रोखता येणारज्या गावात, वाड्यात, वस्त्यांमध्ये किंवा घरामध्ये दहापेक्षा अधिक संशयित रुग्ण असल्यास, संबंधित व्यक्तीने किंवा त्यांच्या कुटुंबीयांनी नजीकच्या प्राथमिक आरोग्य केंद्रात संपर्क साधावा. जेणेकरून त्यांच्या ठिकाणापर्यंत मोबाईल ॲम्ब्युलन्स सेवा पथक पाठवून संशयित रुग्णाचे स्वॅब घेता येतील. त्यामुळे संबंधित कुटुंबाला टेस्टिंगसाठी प्रवास करावा लागणार नाही. तसेच तातडीने स्वॅब घेतल्याने रिपोर्ट पण लवकर घेऊन उपचार करणे देखील सोपे होणार आहे. यामुळे करोना रुग्णाचे निदान लवकर झाल्यामुळे पुढील प्रसारदेखील रोखता येणार आहे.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याsindhudurgसिंधुदुर्गkudal police stationकुडाळ पोलिस स्टेशन