शहरं
Join us  
Trending Stories
1
"शाहू महाराजांना फोन आला अन् मधुरिमाराजेंनी..."; शेवटच्या १० मिनिटांत घडलेल्या राजकीय भूकंपाचे कारण समोर
2
त्यांनी बाळासाहेबांचे विचार आणि धनुष्यबाण गहाण ठेवले होते; शिंदेंसाठी CM शिंदेंची बॅटिंग, ठाकरेंवर हल्ला
3
राज ठाकरे यांनी मुख्यमंत्र्यांवर केलेल्या टीकेला संजय शिरसाट यांचं प्रत्युत्तर; स्पष्टच बोलले
4
भाजपाला मोठा धक्का, अपक्ष निवडणूक लढवत असलेल्या माजी महिला खासदाराचा पक्षाला राम राम
5
“कोल्हापूर उत्तर आम्ही ७ वेळा जिंकली, ७ दिवस भांडलो पण काँग्रेसने जागा सोडली नाही”: संजय राऊत
6
नवाब मलिकांवरून अजितदादा गटाने भाजपा-शिंदे गटाला फटकारलं; "कुणाला काही वाटू दे..."
7
राजेश लाटकर घेणार उद्धव ठाकरेंची भेट! कोल्हापुरात राजकीय घडामोडींना वेग
8
काँग्रेसच्या बालेकिल्ल्यातून यंदा काँग्रेसचेच चिन्ह झाले 'हद्दपार'
9
AUS vs IND : भारताचा ऑस्ट्रेलिया दौरा! टीम इंडियासमोर मोठे आव्हान, शिखर धवननं दिला धीर
10
Sameer Bhujbal : दहा अपक्ष उमेदवारांनी माघार घेत समीर भुजबळ यांना दिला पाठिंबा
11
विराट कोहलीसाठी सिक्सर किंग युवीनं शेअर केली खास पोस्ट
12
महाले यांची माघार; भुजबळ, आहेर, गावित ठाम! दिंडोरीत नरहरी झिरवाळ यांना दिलासा
13
"मी यापुढे मराठी बोलणार नाही..."; रेल्वे टीसीचा मुजोरपणा, मराठी माणसाला धमकावलं
14
चातुर्मासाची सांगता: कार्तिकी एकादशी कधी आहे? विष्णुप्रबोधोत्सव महात्म्य अन् मान्यता
15
बारामतीचं राजकीय तापमान वाढणार: अजित पवारांना शह देण्यासाठी शरद पवार मैदानात; आज ६ ठिकाणी सभा!
16
Niva Bupa IPO : 'या' दिग्गज हेल्थ इन्शूरन्स कंपनीचा IPO येणार; किंमत किती, कधीपासून करता येणार अर्ज?
17
...यासाठी बाळासाहेब ठाकरे राज ठाकरेंना माफ करणार नाहीत; संजय राऊत भडकले
18
आजपासून महायुतीच्या प्रचाराचा प्रारंभ; पहिली सभा कोल्हापुरात, मुख्यमंत्र्यांसह दोन्ही उपमुख्यमंत्री उपस्थित राहणार!
19
शुक्राचा गुरु राशीत प्रवेश: १० राशींवर धनलक्ष्मी कृपा, अचानक धनलाभाचे योग; शुभ-लाभाचा काळ!
20
Devayani Farande : मध्य नाशिक मतदारसंघात बंडखोरांच्या माघारीचा भाजपाच्या देवयानी फरांदेंना फायदा

निळेली पशुधन संशोधन केंद्र पुरस्काराने सन्मानित

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 28, 2020 7:34 PM

Agriculture Sector Dapoli Sindhudurg डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठ, दापोलीअंतर्गत निळेली येथील पशुधन संशोधन केंद्रास कोकण कनयाळ या शेळी जातीच्या संवर्धनासाठी राष्ट्रीय पशु अनुवांशिक संसाधन ब्युरो, करनाल (हरियाणा) या नामांकित संस्थेमार्फत वंश संरक्षण पुरस्कार २०२०ने सन्मानित करण्यात आले.

ठळक मुद्देनिळेली पशुधन संशोधन केंद्र पुरस्काराने सन्मानित१४८ कोकण कनयाळ शेळ्यांचा कळप

माणगांव : डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठ, दापोलीअंतर्गत निळेली येथील पशुधन संशोधन केंद्रास कोकण कनयाळ या शेळी जातीच्या संवर्धनासाठी राष्ट्रीय पशु अनुवांशिक संसाधन ब्युरो, करनाल (हरियाणा) या नामांकित संस्थेमार्फत वंश संरक्षण पुरस्कार २०२०ने सन्मानित करण्यात आले.भारतीय वंशाच्या विविध पाळीव प्राण्यांचे जाणीवपूर्वक संवर्धन करणाऱ्या शेतकऱ्यांना तसेच संस्थांना भारतीय कृषी अनुसंधान परिषदेमार्फत दरवर्षी हा पुरस्कार दिला जातो. निळेली केंद्राचे प्रभारी अधिकारी डॉ. अशोककुमार चव्हाण म्हणाले, सर्वप्रथम कोकण कनयाळ या नवीन संशोधित शेळी जातीची नोंदणी २०१० मध्ये करण्यात आली होती. त्यानंतर सिंधुदुर्ग जिल्ह्यातील शेळीपालन करणाऱ्या शेतकऱ्यांकडून समान गुणधर्माच्या व उत्तम दर्जाच्या शेळ्या एकत्र करून त्यांचे निळेली येथील पशुधन संशोधनकेंद्रावर संवर्धन करण्याचे काम सुरू झाले.कोकणातील विविध कृषी विज्ञान केंद्रांवर प्रात्यक्षिक संच तयार करण्यात आले. मागील पाच-सहा वर्षांत विद्यापीठाने २००० हून अधिक कोकण कनयाळ जातीच्या शेळ्या उपलब्ध करून दिल्या आहेत. शेळी संशोधन प्रकल्पाशी निगडित पशुवैद्यकीय अधिकारी डॉ. विष्णू कविटकर व डॉ. समीर शिरसाट यांच्या योगदानाचे त्यांनी कौतुक केले.१४८ कोकण कनयाळ शेळ्यांचा कळपसध्या निळेली संशोधन केंद्रावर १४८ कोकण कनयाळ शेळ्यांचा कळप आहे. हा पुरस्कार प्रस्ताव सादरीकरणासाठी विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. संजय सावंत, संशोधन संचालक डॉ. पराग हळदणकर, पशुसंवर्धन विभागप्रमुख डॉ. बाळकृष्ण देसाई तसेच सहयोगी संशोधन संचालक डॉ. बळवंत सावंत यांचे मोलाचे मार्गदर्शन लाभले. केंद्राच्या या महत्त्वपूर्ण यशाबद्दल निळेली पशु संशोधन केंद्रावरील अधिकारी आणि कर्मचारीवर्गाचे सर्व स्तरांतून अभिनंदन होत आहे.

टॅग्स :Agriculture Sectorशेती क्षेत्रsindhudurgसिंधुदुर्गDapoli Nagar Panchayatदापोली नगरपंचायतRatnagiriरत्नागिरी