शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL Auction 2025: 'अनुभवी' अश्विनसाठी दोन जुने संघ भिडले, अखेर CSK ने RR ला दिली मात, कितीला विकत घेतलं?
2
'ज्यांनी मला त्रास दिला ते सगळे साफ झाले', अशोक चव्हाणांची थोरात-देशमुखांवर बोचरी टीका
3
IPL Auction 2025: मुंबई इंडियन्सने सोडलेला जोफ्रा आर्चर अखेर राजस्थान रॉयल्समध्ये गेला, किती मिळाली किंमत?
4
शिवसेना मुख्यमंत्री पदावर अडीच वर्षासाठी दावा करणार? केसरकर स्पष्टच बोलले...!
5
IPL Auction 2025 : MI नं दिला नाही भाव; Ishan Kishan साठी काव्या मारन यांनी लावली एवढ्या कोटींची बोली
6
IPL Auction 2025 : बिग सरप्राइज! SRK च्या KKR नं रिलीज केलेल्या खेळाडूसाठी मोजली मोठी किंमत, अनेकांच्या भुवया उंचावणारी बोली
7
'तरुण नेतृत्व उभारणार, घरी बसणार नाही', पराभवानंतर शरद पवार नव्या जोमाने कामाला लागले
8
IPL Auction 2025: Gujarat Titans ची शांतीत क्रांती! ३ मॅचविनर खेळाडूंना 'गपचूप' घेतलं ताफ्यात, पाहा कोण?
9
"योगी आदित्यनाथांच्या 'त्या' घोषणेमुळे...";'बटेंगे तो कटेंगे'वर शरद पवारांचे महत्त्वाचे विधान
10
"...त्यामुळे महिलांनी आमच्या विरोधात मतदान केलं"; निकालानंतर शरद पवारांची पहिली प्रतिक्रिया
11
IPL 2025 Auction : १८ कोटींच पॅकेज नाकरणाऱ्या KL Rahul साठी DC नं किती कोटी मोजले ?
12
"EVM बाबत माहिती नाही, पण लोक सांगतात की..."; पराभवानंतर शरद पवारांचे मोठं विधान
13
महायुतीच्या विजयात CM योगींची किती मोठी भूमिका? चंद्रशेखर बावनकुळे म्हणतात...
14
IPL Auction 2025: युजवेंद्र चहलला १७७ % 'अप्रेझल'! बनला सर्वात महागडा स्पिनर, पंजाब किंग्जने घेतलं संघात
15
"काय झालं हेच आम्हाला कळेना...;" निवडणूक निकालाच्या दुसऱ्या दिवशी काँग्रेसनं सांगितला पुढचा प्लॅन
16
TATA IPL Auction 2025 Live: इशान किशन हैदराबादच्या ताफ्यात; SRH ने लावली 11.25 कोटींची बोली...
17
IPL Auction 2025: व्वा पंत... मानलं ! अवघ्या १५ मिनिटात इतिहास बदलला, रिषभ सर्वात महागडा खेळाडू ठरला!!
18
विधानसभा संपल्या, आता विधान परिषदेवर लक्ष; महायुतीच्या कोणत्या 6 नेत्यांना लागणार लॉटरी?
19
बनावट ASP बनून फिरली, पोलिसांनी केलं सॅल्यूट; एक छोटीशी चूक होताच झाली पोलखोल
20
"नियोजनाप्रमाणे प्रचार केला नाही"; काँग्रेस नेत्याने शरद पवार-ठाकरेंवर फोडलं पराभवाचे खापर

आयुष रुग्णालय पर्यटकांसाठी आकर्षणाचे केंद्र ठरेल : केसरकर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 02, 2019 4:22 PM

सिंधुदुर्गनगरी : जिल्हा रुग्णालय, सिंधुदुर्गनगरी येथे उभारण्यात येत असलेले आयुष रुग्णालय हे रुग्णांना सेवा देण्यासोबतच पर्यटकांसाठीही आकर्षणाचे केंद्र ठरेल, ...

ठळक मुद्देआयुष रुग्णालय पर्यटकांसाठी आकर्षणाचे केंद्र ठरेल : केसरकर३० खाटांच्या आयुष रुग्णालयाचा भूमिपूजन समारंभ

सिंधुदुर्गनगरी : जिल्हा रुग्णालय, सिंधुदुर्गनगरी येथे उभारण्यात येत असलेले आयुष रुग्णालय हे रुग्णांना सेवा देण्यासोबतच पर्यटकांसाठीही आकर्षणाचे केंद्र ठरेल, असे प्रतिपादन पालकमंत्री दीपक केसरकर यांनी येथे केले. जिल्हा रुग्णालयाच्या परिसरात केंद्रीय आयुष राज्यमंत्री श्रीपाद नाईक यांच्या हस्ते व पालकमंत्री दीपक केसरकर यांच्या अध्यक्षतेखाली ३० खाटांच्या आयुष रुग्णालयाचा भूमिपूजन समारंभ पार पडला. त्यावेळी ते बोलत होते.यावेळी केंद्रीय आयुष राज्यमंत्री श्रीपाद नाईक यांच्यासह खासदार विनायक राऊत, आमदार वैभव नाईक, जिल्हा परिषद सदस्य नागेंद्र परब, नकुल पार्सेकर, संदेश पारकर, संजय पडते, अमरसिंह सावंत, प्रभाकर सावंत, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. धनंजय चाकुरकर, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. महेश खलिपे, अतिरिक्त जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. पाटील, आयुषचे वैद्यकीय अधिकारी डॉ. परब, डॉ. कृपा गावडे यांच्यासह जिल्हा रुग्णालयातील डॉक्टर, अधिकारी, कर्मचारी व स्थानिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या संकल्पनेतून आज जगभरात योगाचा प्रसार झाल्याचे सांगून पालकमंत्री दीपक केसरकर पुढे म्हणाले की, आयुषमध्ये आयुर्वेदासोबतच पंचकर्म, युनानी, योगा, साध्य या सर्व गोष्टींचा समावेश होतो.

आयुर्वेदाची परंपरा जपण्याच्या उद्देशानेच आयुषची निर्मिती करण्यात आली आहे. सर्व सोयींनी युक्त असे आयुष रुग्णालय जिल्ह्यात उभे राहत आहे. हे रुग्णालय रुग्णांना बरे करण्यासोबतच या ठिकाणी असणारे पंचकर्म हे पर्यटकांसाठीही आकर्षण ठरेल असा मला विश्वास आहे.आपला जिल्हा हा निसर्गसंपन्न असा पर्यटन जिल्हा आहे. या जिल्ह्याच्या शिरपेचात या रुग्णालयाच्या माध्यमातून मानाचा तुरा खोवला जाईल. जिल्ह्यातील रुग्णांना व येणाऱ्या पर्यटकांना भारतीय उपचार पद्धतीचा लाभ घेता येणार आ हे.

जिल्हा मुख्यालय असलेल्या सिंधुदुर्गनगरीसाठी २५ कोटी रुपयांचा निधी मंजूर केला असून त्यापैकी १० कोटी रुपयांचा निधी वितरीत करण्यात आला आहे. त्या माध्यमातून लवकरच जिल्हा मुख्यालयाचा कायापालट होईल. यामध्ये सिंधुदुर्गनगरी येथील तलावामध्ये बोटींगची सोय केली जाणार आहे. तसेच सामाजिक वनीकरणाच्या उद्यानामध्ये छोटेसे रिसॉर्ट उभारण्यात येणार असल्याचे केसरकर यांनी सांगितले.आयुष दोन वर्षांतच सेवेसाठी तयार होईल!केंद्रीय आयुष राज्यमंत्री श्रीपाद नाईक म्हणाले की, जिल्ह्याच्या सह्याद्री पट्ट्यात व सागरी किनारी भागामध्ये आयुर्वेदिक औषधींसाठी उपयुक्त अशी वनसंपदा आहे. तसेच ग्रामीण भागात आयुर्वेदाचा प्रसार व्हावा यासाठी जिल्ह्यात १२ आयुर्वेदिक हेल्थ सेंटर उभारण्यासाठी प्रयत्न करू.

जिल्ह्यात उभारण्यात येत असलेले हे ३० खाटांचे आयुष रुग्णालय दोन वर्षांतच रुग्णांच्या सेवेसाठी तयार होईल. यासाठी लागणारा सर्व निधी वेळेवर उपलब्ध करुन देण्यात येईल. सध्या देशभरात २ हजार आयुर्वेदिक डॉक्टर कार्यरत असल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले.

टॅग्स :Deepak Kesarkarदीपक केसरकर sindhudurgसिंधुदुर्गhospitalहॉस्पिटल