रत्नागिरी : शासनाने सर्व शासकीय कामांसाठी आधारकार्ड अनिवार्य करणार असल्याचा दणका नागरिकांना देताच, ज्यांनी अद्याप आधारकार्ड काढलेली नाहीत किंवा ज्यांना ती मिळालेली नव्हती, अशांची आधारकार्डसाठी धावपळ सुरू झाली होती. त्यामुळे आधारकार्डच्या कामाला जिल्ह्यात गती आल्याने आधारनोंदणीचे काम आत्तापर्यंत ९८.५३ टक्के पूर्ण झाले. मात्र, न्यायालयाने आधारकार्ड सक्तीचे करू नये, असा निर्णय दिल्याने उर्वरीत दीड टक्के काम दीर्घकाळ रेंगाळण्याची शक्यता यामुळे निर्माण झाली आहे.राज्यात आधारकार्ड देण्याचे काम शासनाने ‘ग्लोडाईन’ या कंपनीकडे दिले होते. पण पहिल्या टप्प्यात जिल्ह्यात केवळ ३५ टक्के काम करून सदर कंपनीने हे काम अचानक थांबविले. १२ जानेवारी २०११ ते ३१ मार्च २०१२ या कालावधीत जिल्ह्यातील १६,१२,६७२ लोकसंख्येपैकी केवळ ६,४३,५८२ एवढ्याच आधारकार्डचे काम पूर्ण झाले होते. त्यानंतर विविध शिष्यवृत्ती, विविध योजनांचे अनुदान, गॅस सिलिंडरची सबसिडी आदींसाठीही आधारकार्ड सक्तीचे केल्यामुळे नागरिकांची यासाठी धावपळ सुरू झाली. १ जानेवारी २०१३पासून जिल्ह्यात ‘स्पॅन्को’ कंपनीतर्फे आधारकार्ड नोंदणीला सुरूवात करण्यात आली. जिल्ह्यातील ३१ महा ई - सेवा केंद्रांच्या माध्यमातून ही सेवा सध्या सुरू आहे. जिल्ह्याची एकूण लोकसंख्या (२०११च्या जनगणनेनुसार) १६,१५,०६९ इतकी आहे. त्यापैकी नोव्हेंबर २०१५पर्यंत १५ लाख ९१ हजार २८५ जणांची (९८.५३) आधार नोंदणी पूर्ण झाली आहे. तर केवळ २३,७८४ जणांची आधार नोंदणी होणे अद्याप बाकी आहे. युनिक कार्ड म्हणून आधारकार्डचा वापर केला जाण्याची घोषणा केंद्र सरकारने यापूर्वी केली होती. मात्र, ती जाचक ठरल्याने काही जणांनी न्यायालयाकडे दाद मागितली. त्यावर निवडणूक कार्ड आणि रेशनकार्ड यासाठी आधारकार्डची सक्ती करू नये, अशा न्यायालयाच्या सूचना आल्याने आता नागरिक आश्वस्त झाले आहेत. त्यामुळे उरलेले दीड टक्के आधारकार्ड नोंदणीचे काम आता दीर्घकाळ रेंगाळण्याची शक्यता यामुळे निर्माण झाली आहे. (प्रतिनिधी)तालुका लोकसंख्याआधारनोंदणीमंडणगड६२,१२३६१,६९७दापोली१,७८,३४०१,९९,३१२खेड१,८१,६१५१,७६.८२६चिपळूण२,७९,१२२२,६७,९५९गुहागर१,२३,२०९१,२५,१३२संगमेश्वर१,९८,३४३१,९२,५१२रत्नागिरी३,१९,४४९३,०२,३४०लांजा१,०६,९८६१,२३,०२५राजापूर१,६५,८८२१,४२,४८२एकूण१६,१५,०६९१५,९१,२८५आधारकार्ड सक्ती केल्यानंतर आधारकार्डसाठी गर्दी होत होती. मात्र, न्यायालयाने ही सक्ती करू नये असे सांगताच नागरिकांनी पाठ फिरवली. रेशनकार्डसाठी कार्ड आवश्यक करण्यात आले आहे.
आधारकार्डचा शिल्लक दीड टक्का रेंगाळणार
By admin | Published: November 30, 2015 12:29 AM