शहरं
Join us  
Trending Stories
1
सत्तेची दोरी कुणाकडे? अटीतटीच्या लढतीत अस्तित्वाचा लढा कोण जिंकणार?
2
Maharashtra Vidhan Sabha 2024: मान्यता टिकविण्यासाठी मनसेला हवे तीन आमदार!
3
निकालानंतरच्या रणनीतीवर भाजपची बैठक; आमदारांना विशेष विमानाने आणण्याची शक्यता
4
लोकसभेच्या तुलनेत महिलांचे मतदान 43 लाखाने वाढले; निकालात निर्णायक ठरणार का?
5
‘कॅश फॉर व्होट’प्रकरण; गुजरातमधून अटक केलेल्या व्यक्तीला कोठडी
6
आरोपींच्या खात्यात पैसे टाकणारा जाळ्यात; बाबा सिद्दीकी हत्येप्रकरणी अकोल्यात कारवाई
7
दक्षिणेतील अभिनेत्यांना मुंबईच्या रिअल इस्टेटची भुरळ; वर्षभरात १०० कोटी रूपयांहून अधिक गुंतवणूक
8
लाचप्रकरणी अदानींवर अमेरिकेत अटक वॉरंट, उद्धव ठाकरेंची टीका; म्हणाले, “चार दिवस आधीच...”
9
“४१ वर्षे काम, पण...” निकालापूर्वी भाजपाला मोठा धक्का; बड्या नेत्याने घेतला राजकीय संन्यास
10
“उद्या दुपारी १२ वाजता महायुती हद्दपार झालेली दिसेल, मी सत्तेतील आमदार असेन”: विजय वडेट्टीवार
11
महायुती की मविआ? कोणाला पाठिंबा देणार? हितेंद्र ठाकूरांचा निर्णय झाला; दिले सूचक संकेत
12
“आम्ही छोटे पक्ष किंगमेकर ठरु, पाठिंबा हवा असेल तर...”; महादेव जानकरांनी ठेवल्या अटी
13
"५० पैकी एकजरी पडला तर राजकारण सोडेन"; सुषमा अंधारेंनी करून दिली एकनाथ शिंदेना आठवण
14
सत्तास्थापनेसाठी आम्हाला 'त्यांची' गरज नाही, पण..; रावसाहेब दानवेंचा मोठा दावा
15
IPL Auction 2025: MIला ८, CSKला ७... कोणत्या टीमला किती परदेशी खेळाडू विकत घेता येणार?
16
“युगेंद्र पवार आमदार होणार, महाविकास आघाडीला १६० जागा मिळणार”; जितेंद्र आव्हाडांचा दावा
17
  राणेंचा दबदबा की ठाकरे गट बाजी मारणार? असा आहे सिंधुदुर्गाचा कल
18
“विधानसभेच्या निकालानंतर शरद पवार महायुतीसोबत येऊ शकतात”; नारायण राणेंचे सूचक विधान
19
राहुल गांधी, खर्गेंना विनोद तावडेंची कायदेशीर नोटीस; पैसे वाटप प्रकरण तापणार
20
नेत्रदिपक भरारी! शेतकऱ्याच्या लेकीने रचला इतिहास; अवघ्या १९ व्या वर्षी झाली पायलट

बाळशास्त्री जांभेकर भवन प्रेरणास्थान होईल -दीपक केसरकर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 12, 2019 8:40 PM

सिंधुदुर्गनगरी : साडेचार कोटी रुपये खर्चून उभारण्यात येणारे बाळशास्त्री जांभेकर स्मारक व पत्रकार भवन राज्यातील पत्रकारांचे प्रेरणास्थान होईल. या ...

ठळक मुद्देसिंधुदुर्गनगरीत बाळशास्त्री जांभेकर स्मारक व पत्रकार भवन इमारतीचा भूमिपूजन समारंभ

सिंधुदुर्गनगरी : साडेचार कोटी रुपये खर्चून उभारण्यात येणारे बाळशास्त्री जांभेकर स्मारक व पत्रकार भवन राज्यातील पत्रकारांचे प्रेरणास्थान होईल. या पत्रकार भवनात अद्ययावत सभागृह, सिंधुदुर्गनगरीस भेट देणाऱ्या पत्रकार व पर्यटकांसाठी आठ सूट, व्यापारी गाळे तसेच बाळशास्त्री जांभेकर यांचा पुतळा उभारण्यात येणार असून, राज्यात आदर्शवत अशा पत्रकार भवनाची उभारणी होईल. कमीत कमी वेळात या पत्रकार भवनाची उभारणी पूर्ण होईल, असा विश्वास पालकमंत्री दीपक केसरकर यांनी येथे व्यक्त केला.

आद्य पत्रकार बाळशास्त्री जांभेकर स्मारक व पत्रकार भवन इमारतीचा भूमिपूजन समारंभ पालकमंत्री दीपक केसरकर यांच्या हस्ते करण्यात आला. सिंधुदुर्गनगरीतील जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या शेजारी ११ गुंठे क्षेत्रात या पत्रकार भवनाची उभारणी होत आहे. भूमिपूजन समारंभानंतर येथील जिल्हा नियोजन समितीच्या जुन्या सभागृहात आयोजित मुख्य समारंभात व्यासपीठावर आमदार वैभव नाईक, आमदार नीतेश राणे, जिल्हा परिषद अध्यक्षा संजना सावंत, जिल्हाधिकारी डॉ. दिलीप पांढरपट्टे, पत्रकार परिषदेचे अध्यक्ष सिद्धार्थ शर्मा, विश्वस्त किरण नाईक, परिषद प्रतिनिधी शशी सावंत, अभिनेते दिगंबर नाईक, सावंतवाडीचे नगराध्यक्ष बबन साळगावकर, जिल्हा माहिती अधिकारी मिलिंद बांदिवडेकर, जिल्हा पत्रकार संघाचे अध्यक्ष गजानन नाईक, सचिव गणेश जेठे, उपाध्यक्ष बाळ खडपकर, सहसचिव देवयानी वरसकर आदी उपस्थित होते.

यावेळी पालकमंत्री दीपक केसरकर म्हणाले, नवीन जाहिरात धोरण, पत्रकार संरक्षण कायदा आदी मागण्यांबरोबरच पत्रकारांना निवृत्तिवेतन लागू करण्यासाठी गेल्या अधिवेशनात शासनाने पंधरा कोटी रुपयांची तरतूद केली आहे. हा निधी माहिती व जनसंपर्क महासंचालनालयाकडे वर्ग करण्यात आला असून, आठ दिवसांत याबाबत शासन निर्णय काढण्यात येईल. युती शासनाच्या काळातच पत्रकार भवनांच्या निर्मितीसाठी निधी असो किंवा पत्रकार बांधवांच्या मागण्यांची पूर्तता झाली आहे, असेही ते म्हणाले.

पत्रकार परिषदेचे अध्यक्ष सिद्धार्थ शर्मा म्हणाले की, युती शासनाच्या काळातच पत्रकारांच्या बहुतांश मागण्या पूर्ण होण्याबरोबरच राज्यात विविध जिल्ह्यांत पत्रकार भवनांची उभारणी झाली आहे. शासनाने नवीन जाहिरात धोरण, पत्रकार संरक्षण कायदा, पत्रकारांना पेन्शन योजना, आदी मागण्या मंजूर केल्या आहेत. त्याची लवकरात लवकर अंमलबजावणी व्हावी.

पत्रकार परिषदेचे विश्वस्त किरण नाईक यांनी बाळशास्त्री जांभेकर यांचे स्मारक व पत्रकार भवनाचे महत्त्व विषद करताना जिल्ह्यातीलच नव्हे तर राज्यातील पत्रकारांसाठी बाळशास्त्री जांभेकर यांचे स्मारक महत्त्वाचे असल्याचे सांगितले. महाराष्ट्राच्या अनेक भागांमध्ये स्थानिक महत्त्वाच्या व्यक्तींची स्मारके उभारण्यात आली आहेत. पण, सिंधुदुर्गमध्ये पत्रकारितेचे आद्य जनक असलेल्या जांभेकरांचे स्मारक नव्हते. ती उणीव आता भरून निघाली आहे. या स्मारकाचे काम पूर्ण होण्यासाठी सर्वांनी एकत्र येऊन याचा पाठपुरावा करण्याची गरज आहे. मतभेद विसरून सर्वांनी एकत्र यावे, असे आवाहन त्यांनी यावेळी केले.

अभिनेता दिगंबर नाईक शुभेच्छापर भाषणात म्हणाले की, सर्व पत्रकार या चांगल्या कामासाठी एकत्र आले याचा मला विशेष आनंद होत आहे. ‘पत्रकारांनी आमच्याबद्दल चांगला लिवुक व्हया इतकीच अपेक्षा आसा’ असे सांगून त्यांनी यावेळी ‘हम सब एक है’ या कवितेचे सादरीकरण करून सामूहिक गाºहाणेही घातले.

यावेळी जिल्हाधिकारी डॉ. दिलीप पांढरपट्टे, जिल्हा परिषद अध्यक्षा संजना सावंत यांनी स्मारकाच्या उभारणीच्या कामास शुभेच्छा दिल्या.कार्यक्रमाच्या सुरुवातीला जिल्हा पत्रकार संघाचे अध्यक्ष गजानन नाईक यांच्या हस्ते उपस्थित मान्यवरांचा सत्कार व स्वागत करण्यात आले. तसेच स्मारक व पत्रकार भवनासाठी सहकार्य केलेल्या प्रशासकीय अधिकारी, वास्तु विशारद व ठेकेदार यांचाही सत्कार करण्यात आला.

गजानन नाईक यांनी प्रस्तावनेमध्ये बाळशास्त्री जांभेकर यांचे स्मारक आणि पत्रकार भवनाच्या निर्मितीसाठीच्या कार्यवाहीचा आढावा घेतला. गेल्या कित्येक वर्षांचे जिल्ह्यातील पत्रकारांचे स्वप्न पूर्ण होत असल्याबद्दल आनंद व्यक्त केला. अनेक अडचणींवर मात करीत आज पत्रकार भवन उभे रहात असल्याबद्दल त्यांनी जिल्ह्यातील सर्व पत्रकारांचे अभिनंदन केले.कार्यक्रमाचे सूत्रसंचालन पत्रकार संघाचे सचिव गणेश जेठे यांनी केले. तर उपाध्यक्ष बाळ खडपकर यांनी आभार प्रदर्शन केले.आयोजकांचे अभिनंदनआमदार नीतेश राणे म्हणाले की, सिंधुदुर्ग जिल्ह्यात उभारण्यात येणारे बाळशास्त्री जांभेकर यांचे स्मारक व पत्रकार भवनाची इमारत हे भव्य असे स्मारक आहे. कमीत कमी वेळेत चांगल्या नियोजनासह या कार्यक्रमाचे आयोजन केल्याबद्दल आयोजकांचे अभिनंदन करतो. कमीत कमी वेळेत ही भव्य इमारत उभी रहावी, अशी अपेक्षाही त्यांनी यावेळी व्यक्त केली.जांभेकरांचे स्मारक प्रेरणादायीआमदार वैभव नाईक म्हणाले की, सिंधुदुर्गनगरी येथील बाळशास्त्री जांभेकर स्मारक व पत्रकार भवन हे राज्यात आदर्शवत ठरेल. मराठी वृत्तपत्रसृष्टीसाठी प्रेरणादायी असलेले जांभेकरांचे हे स्मारक सर्वच दृष्टीने वृत्तपत्रसृष्टीतील कार्यरत असलेल्या सर्व मराठी तसेच इतर भाषिक पत्रकारांसाठीही प्रेरणादायी ठरेल.आद्य पत्रकार बाळशास्त्री जांभेकर स्मारक व पत्रकार भवन इमारतीचे भूमिपूजन पालकमंत्री दीपक केसरकर यांनी केले. यावेळी आमदार नीतेश राणे, आमदार वैभव नाईक, जिल्हाधिकारी डॉ. दिलीप पांढरपट्टे, पत्रकार परिषदेचे अध्यक्ष सिद्धार्थ शर्मा, विश्वस्त किरण नाईक उपस्थित होते.

टॅग्स :reporterवार्ताहरsindhudurgसिंधुदुर्ग