आॅनलाईन लोकमतसिंधुदुर्गनगरी दि. २३ : मासळीच्या साठ्याचे जतन तसेच मच्छिमारांची जिवित व वित्त यांचे रक्षण करण्याच्या हेतुने महाराष्ट्र सागरी मासेमारी नियमन अधिनियम १९८१ च्या कलम ४ च्या पोटकलम (१) आणि (२) मध्ये उल्लेख केलेल्या बाबी लक्षात घेऊन उक्त अधिनियमांच्या कलम ३ अन्वये रचना केलेल्या सल्लागार समित्यांशी विचार विनिमय करुन शासन आदेश क्रमांक कृषि व पदुम विभाग मंत्रालय क्रमांक मत्स्यवि- १११५/प्र. क्र १३७/पदूम-१४, दि. 0१/0६/२0१५ अन्वये १ जून ते ३१ जुलै (दोन्ही दिवस धरुन) राज्याच्या जलधी क्षेत्रात यांत्रिक मासेमारी नौकांस पावसाळी मासेमारी बंदी घालण्यात आलेली आहे. या कालावधीत मासळीच्या जिवांना प्रजोत्पादनास पोषक वातावरण असते. या कालावधीत मासेमारी बंदी मुळे मासळीच्या बिज निर्मिती प्रक्रीयेस वाव मिळुन मासळीच्या साठ्याचे जतन होते. तसेचया कालावधीत खराब-वादळी हवामानामुळे होणारी मच्छिमारांची जिवित व वित्त हानी मासेमारी बंदी मुळे टाळता येणे शक्य होते.मासळीच्या साठ्याचे जतन तसेच मच्छिमारांचे जिवित व वित्त यांचे रक्षण या हेतूने यावर्षी १ जून २0१७ ते ३१ जुलै २0१७ या कालावधीत (दोन्ही दिवस धरुन) राज्याच्या सागरी जलधी क्षेत्रात (सागरी किना-यापासुन १२ सागरी मैलापर्यंत) यांत्रिक मासेमारी नौकांस पावसाळी मासेमारी बंदी लागु करण्?यात येत आहे. पावसाळी मासेमारी बंदी यांत्रिक मासेमारी नौकांना लागु राहील. पावसाळी मासेमारी बंदी ही पारंपारिक पध्दतीने मासेमारी करणा-या बिगर यांत्रिक नौकांना लागु राहणार नाही. राज्याच्या सागरी जलधी क्षेत्राबाहेरील (सागरी किना-यापासुन 12 सागरी मैलापुढे) खोल समुद्रात मासेमारीसाठी जाणा-या नौकांना केंद्र शासनाच्या खोल समुद्रातील मासेमारी बाबतचे धोरण/ मार्गदर्शक सुचना / आदेश लागु राहतील. राज्याच्या सागरी जलधी क्षेत्रात (सागरी किना-यापासुन १२ सागरी मैलापर्यंत) यांत्रिक मासेमारी नौका पावसाळी मासेमारी बंदी कालावधीत मासेमारी करताना आढळल्यास / केल्यास महाराष्?ट्र सागरी मासेमारी नियमन अधिनियम १९८१ च्या कलम १४ अन्वये असे गलबत जप्त करण्यात येईल आणि त्यात पकडलेली मासळी जप्त करण्यात येईल. तसेच १७ (१)(२)(३) अन्वये जास्तीत जास्त कठोर शास्ती (दंड) लादण्यात येईल. शासन निर्णय कृषि व पदुम विभाग मंत्रालय क्रमांक रासनि-१९९५/३२७0५/(२४३)/पदुम-१४ दि. १३ नोव्हेबर १९९५ नुसार बंदी कालावधीत ज्या मच्छिमार संस्थांच्या यांत्रिक मासेमारी नौका मासेमारी करताना आढळतील अशा संस्था नि पुरस्कृत केलेले अर्ज रासविनि योजनेच्या लाभाकरीता विचारात घेतले जाणार नाहीत. पावसाळी मासेमारी बंदी कालावधीत मासेमारी करतना यांत्रिक मासेमारी नौकेस अपघात झाल्?यास अशा नौकेस शासनाकडुन नुकसान भरपाई मिळणार नाही. १ जून २0१७ पूर्वी मासेमारीस गेलेल्या नौकांना दिनांक १ जून २0१७ नंतर कोणत्याही परिस्थतिीत बंदरात मासे उतरविण्यास परवानगी असणार नाही व अशा नौका महाराष्ट्र सागरी मासेमारी नियमन अधिनियम १९८१ अंतर्गत कारवाईस पात्र राहतील.राज्याच्या सागरी जलधी क्षेत्रात (सागरी किना-यापासुन १२ सागरी मैलापर्यंत) व त्यापुढे पावसाळी मासेमारी बंदी कालावधीत यांत्रिक मासेमारी नौकेने बेकायदेशीर मासेमारी न करण्याबाबत आपल्या सर्व नौका धारक सभासदांना व सर्वसाधारण सभासदांना अवगत करावे. तसेच बंदी कालावधीत आपल्या संस्थेच्या सभासदांकडुन यांत्रिक मासेमारी नौकेने बेकायदेशीर मासेमारी केली जाणार नाही/ पावसाळी मासेमारी बंदीचा भंग होणार नाही. याची दक्षता घ्यावी, असे आवाहन सहाय्यक आयुक्तांनी केले आहे.
कोकणात पावसाळी कालावधीत मासेमारीस बंदी
By admin | Published: May 23, 2017 6:42 PM