रत्नागिरी : भारतीय बौध्द महासभेच्या विश्वस्त मंडळाचे चेअरमन डॉ. पी. जी. ज्योतिकर, विश्वस्त मंडळ सभासद आणि त्यांच्या अधिपत्याखालील शाखा यांच्याव्यतिरिक्त इतर कोणालाही मातृसंस्थेचे नाव घेऊन कोणतेही कार्यक्रम व संस्कार विधी करता येणार नाहीत. जातीच्या दाखल्यासाठी समाजाचा दाखला देता येणार नाही, कोणत्याही प्रकारची स्टेशनरी वापरता येणार नाही, कोणत्याही कार्यक्रमासाठी संस्थेच्या नावाचा, नंबरचा बॅनर्स वापरता येणार नसल्याची माहिती दि बुध्दिस्ट सोसायटी आॅफ इंडियाच्या जिल्हा शाखेचे अध्यक्ष एल. व्ही. पवार यांनी पत्रकार परिषदेत दिली. दि बुध्दिस्ट सोसायटी आॅफ इंडिया (भारतीय बौध्द महासभा) सोसायटी रजि. नं. ३२२७ पीटीएफ नं. ९८२ ही राष्ट्रीय स्तरावरील संस्था डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी मे १९५५ रोजी स्थापन केली. ते या संस्थेचे संस्थापक अध्यक्ष होते. बाबासाहेबांच्या महापरिनिर्वाणानंतर त्यांचे पुत्र भय्यासाहेब आंबेडकर हे त्या संस्थेचे अध्यक्ष झाले. भय्यासाहेबांचे १७ सप्टेंबर १९७७ रोजी निधन झाले. त्यांच्या निधनानंतर या संस्थेच्या अध्यक्षपदाचा वाद निर्माण झाला होता. या संस्थेचा अध्यक्ष मीच आहे, असा दावा भय्यासाहेब आंबेडकर यांच्या सुविद्य पत्नी मीरा आंबेडकर यांनी केला. त्यामुळे ही बाब न्यायप्रविष्ट झाली. संबंधित बाब ३४ वर्षे न्यायप्रविष्ट होती. २१ जून २०१३ रोजी उच्च न्यायालयाने मीरा आंबेडकर यांच्याविरोधात निकाल दिला. म्हणून या निकालाच्या विरूध्द १९ आॅगस्ट २०१३ रोजी सुप्रिम कोर्टात अपिल केले होते. संबंधित अपल सुप्रिम कोर्टाने २ फेब्रुवारी २०१५ रोजी फेटाळून लावले. उच्च न्यायालयाने २१ जून रोजी मीराताई आंबेडकर यांच्या विरोधात दिलेला निर्णय कायम ठेवला. मीरातार्इंनी निकालाच्या विरोधात पुन्हा सुप्रिम कोर्टात रिव्ह्यू पिटीशन दाखल केली. संबंधित रिव्ह्यू पिटीशन १५ एप्रिल १५ रोजी सुप्रिम कोर्टाने फेटाळून लावली. मीराताई आंबेडकर यांच्या विरोधात उच्च न्यायालयाने २१ जून २0१३ रोजी दिलेला निर्णय कायम केला. त्यानुसार धर्मादाय आयुक्त, मुंबई यांच्याकडे नोंद असलेले डॉ. पी. जी. ज्योतीकर ट्रस्टी चेअरमन व विश्वस्तांनाच संस्था चालविण्याचा अधिकार मिळाला असल्याची माहिती पवार यांनी पत्रकार परिषदेत दिली. (प्रतिनिधी)भारतीय बौद्ध महासभा एकमेव धार्मिक मातृसंस्थाभारतीय बौध्द महासभा ही राष्ट्रीयस्तरावरील संस्था असून, भारतातील बौध्दांची एकमेव धार्मिक मातृसंस्था आहे. याच संस्थेमार्फत बौध्दांचे धार्मिक विधी केले जातात. या संस्थेमध्ये बौध्दांच्या धार्मिक भावना गुंतल्या आहेत. जिल्ह्यात डॉ. पी. जी. ज्योतीकर ट्रस्टी चेअरमन असलेल्या संस्थेचे गेली ३६ वर्षे आम्ही कामकाज करीत आहोत. मात्र, न्यायालयाच्या निर्णयाने नाराज झालेले लोक अजूनही समाजामध्ये या संस्थेच्या नावाचा वापर करून समाजामध्ये गैरसमज पसरवत आहेत. वेगळे संघटन करून किंवा संयुक्तरित्या कार्यक्रमाचे आयोजन करून समाजामध्ये संभ्रम निर्माण करीत आहेत. कोणत्याही कार्यक्रमासाठी संस्थेच्या नावाचा, नंबरचा, बॅनर्सचा वापर करता येणार नाही. तसे कोणी केल्यास कायदेशीर कारवाई करण्यात येईल, असे त्यांनी सांगितले. जातीच्या दाखल्यासाठी समाजाचा दाखला देता येणार नाही.कोणत्याही प्रकारची स्टेशनरी वापरता येणार नाही.संस्थेच्या अध्यक्षपदाचा वाद निर्माण झाला होता.संस्थेच्या नावाचा वापर करून समाजात गैरसमज़३४ वर्षांनंतर मीरा आंबेडकर यांच्याविरोधात निकाल.
मातृसंस्थेचे नाव वापरून कार्यक्रमाला बंदी
By admin | Published: November 10, 2015 9:16 PM