बांदा : विद्यार्थ्यांच्या सुप्त कलागुणांना वाव मिळावा म्हणून सिंधुदुर्ग जिल्हा परिषदेने आयोजित केलेल्या बळीराजासाठी एक दिवस या उपक्रमांतर्गत जिल्हा परिषद केंद्रशाळा बांदा नं. १ या प्रशालेत विद्यार्थ्यांना रानभाज्यांची ओळख व्हावी यासाठी परिसरात उपलब्ध झालेल्या रानभाज्यांचे प्रदर्शन व विक्री करण्यात आली. बांदा परिसरात उपलब्ध झालेल्या २० हून अधिक प्रकारच्या रानभाज्या व फळभाज्या यांचे प्रदर्शन व विक्री यावेळी विद्यार्थ्यांना केली.या प्रदर्शनाचे उद्घाटन जिल्हा परिषद सदस्य श्वेता कोरगावकर यांच्या हस्ते रानभाजी पासून बनविलेल्या खाद्यपदार्थांची चव चाखून करण्यात आली. यावेळी शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष रवींद्र सावंत,उपाध्यक्ष सविता किल्लेदार, बांदा प्रभाग विस्तार अधिकारी दुर्वा साळगावकर, मुख्याध्यापिका सरोज नाईक , बांदा कृषी मंडळ अधिकारी प्रकाश घाटगे ,कृषी सहाय्यक टी. बी. देसाई, ग्रामपंचायत सदस्य उमांगी मयेकर आदी उपस्थित होते.या दिवशी विद्यार्थ्यांनी पुठ्ठ्यापासून बनविलेल्या शेतीविषयक अवजारांचे प्रदर्शन मांडण्यात आले होते. कृषी अधिकारी प्रकाश घाटगे रानभाज्यांचे विविध प्रकार व त्यांचे आहारातील महत्व विद्यार्थ्यांना समजावून सांगितले. या दिवशी विद्यार्थ्यांनी रानभाज्यांची विक्री करून खरी कमाईचा आनंदही मिळवला.कार्यक्रमाचे सूत्रसंचालन जे. डी. पाटील यांनी केले तर आभार रंगनाथ परब यांनी मानले. कार्यक्रम यशस्वी पार पाडण्यासाठी अनुराधा धामापूरकर, उर्मिला मोर्ये, रसिका मालवणकर, शुभेच्छा सावंत, वंदना शितोळे, जागृती धुरी, प्राजक्ता पाटील, शितल गवस व पालकांनी परिश्रम घेतले. विद्यार्थ्यांच्या सुप्त कलागुणांना वाव देण्यासाठी वाव देण्यासाठी राबविलेल्या या उपक्रमाचे कौतुक होत आहे.
बांदा केंद्रशाळा : विद्यार्थ्यांनीच भरवले रानभाज्यांचे प्रदर्शन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 11, 2019 2:06 PM
विद्यार्थ्यांच्या सुप्त कलागुणांना वाव मिळावा म्हणून सिंधुदुर्ग जिल्हा परिषदेने आयोजित केलेल्या बळीराजासाठी एक दिवस या उपक्रमांतर्गत जिल्हा परिषद केंद्रशाळा बांदा नं. १ या प्रशालेत विद्यार्थ्यांना रानभाज्यांची ओळख व्हावी यासाठी परिसरात उपलब्ध झालेल्या रानभाज्यांचे प्रदर्शन व विक्री करण्यात आली. बांदा परिसरात उपलब्ध झालेल्या २० हून अधिक प्रकारच्या रानभाज्या व फळभाज्या यांचे प्रदर्शन व विक्री यावेळी विद्यार्थ्यांना केली.
ठळक मुद्देबांदा केंद्रशाळा : विद्यार्थ्यांनीच भरवले रानभाज्यांचे प्रदर्शनबळीराजासाठी एक दिवस उपक्रम