मालवण : सध्या शहरात कोरोना रुग्णांच्या संख्येत वाढ होत आहे. त्यामुळे कोरोनाची साखळी तोडणे अत्यावश्यक बनले आहे. वारंवार सूचना करूनही बाजारपेठेत नागरिक गर्दी करीत असल्याचे निदर्शनास येत आहे. त्यामुळे बाजारपेठेतील गर्दी टाळण्यासाठी प्रमुख रस्त्यांवर बॅरिकेट्स लावण्यात यावेत, अशा सूचना तहसीलदार अजय पाटणे यांनी पालिका प्रशासनास केल्या. त्यानुसार शहरातील प्रमुख नाक्यांवर तसेच बाजारपेठेतील मुख्य रस्त्यांवर बॅरिकेट्स उभारण्यात आले आहेत.सकाळी सात ते अकरा यावेळेत दुकाने उघडी ठेवण्यात येत असतानाही त्यानंतरही अनेक नागरिक विनाकारण फिरत असल्याच्या तक्रारी प्राप्त झाल्या आहेत. त्यामुळे शुक्रवारपासून विनाकारण फिरणार्यांवर कडक कारवाईची मोहीम राबविण्यात येणार आहे. ही कारवाई टाळण्यासाठी नागरिकांनी घराबाहेर न पडता घरातच रहावे, अशा सूचना प्रशासनाने केल्या आहेत.गतवर्षी बाजारपेठेत होणारी गर्दी टाळण्यासाठी भाजी, फळविक्रेत्यांच्या ठिकाणी नागरिकांसाठी सामाजिक अंतर ठेवले जावे यासाठी चौकोन आखण्यात आले होते. या उपक्रमाला चांगला प्रतिसादही मिळाला शिवाय गर्दी टाळण्यासही मदत मिळाली होती. याच धर्तीवर आता आजपासून भाजी, फळ विक्रेत्यांच्या ठिकाणी सामाजिक अंतर राखण्यासाठी पालिका प्रशासनाने चौकोन आखण्याची कार्यवाही केली जाणार आहे.
मालवण शहरातील प्रमुख रस्त्यांवर बॅरिकेट्स उभारले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 08, 2021 2:13 PM
CoroanVirus Malvan Sindhudurg : सध्या शहरात कोरोना रुग्णांच्या संख्येत वाढ होत आहे. त्यामुळे कोरोनाची साखळी तोडणे अत्यावश्यक बनले आहे. वारंवार सूचना करूनही बाजारपेठेत नागरिक गर्दी करीत असल्याचे निदर्शनास येत आहे. त्यामुळे बाजारपेठेतील गर्दी टाळण्यासाठी प्रमुख रस्त्यांवर बॅरिकेट्स लावण्यात यावेत, अशा सूचना तहसीलदार अजय पाटणे यांनी पालिका प्रशासनास केल्या. त्यानुसार शहरातील प्रमुख नाक्यांवर तसेच बाजारपेठेतील मुख्य रस्त्यांवर बॅरिकेट्स उभारण्यात आले आहेत.
ठळक मुद्देमालवण शहरातील प्रमुख रस्त्यांवर बॅरिकेट्स उभारले गर्दीवर नियंत्रणाचा प्रयत्न : विनाकारण फिरणाऱ्यांच्या अनेक तक्रारी