आफळेबुवा : शृंगाराला अतिमहत्त्व नको, सर्वच्या सर्व ४० लढाया जिंंकले; रत्नागिरीतील कीर्तन महोत्सवाला रसिकांची गर्दीेरत्नागिरी : ‘बाजीराव - मस्तानी चित्रपटामध्ये काही चुकीचे दाखले दिले आहेत, ते इतिहासाला पटणारे नाहीत. २० वर्षांच्या पेशवे कालखंडात बाजीरावाने ४० लढाया केल्या व सर्व जिंंकल्या. अशावेळी शृंगाराला फारसा वेळच नव्हता. त्यामुळे बाजीरावाचे शौर्य कितीतरी पटीने मोठे आहे. मात्र, चित्रपटात शृंगाराला महत्त्व देऊन तो चुकीच्या पद्धतीने दाखवला आहे,’ असे प्रतिपादन राष्ट्रीय कीर्तनकार चारुदत्त आफळेबुवा यांनी रत्नागिरी येथे केले.कीर्तनसंध्या परिवारातर्फे रत्नागिरीतील प्रमोद महाजन क्रीडा संकुलमध्ये कीर्तन महोत्सवाचे आयोजन केले आहे. या कीर्तन महोत्सवाच्या पहिल्या दिवशी त्यांनी बाजीराव पेशव्यांविषयी सांगितले. ते म्हणाले की, बुंदेलखंडामध्ये महंमदशहा बंगशने हल्ला केल्यावर छत्रसाल राजाने बाजीरावाला बोलावले. जैतापूरच्या किल्ल्याला दोन महिने वेढा देऊन बाजीरावाने बंगशला बाहेर येण्यास भाग पाडले. विजय झाल्यावर छत्रसालने त्याची कन्या मस्तानी-बाजीरावाचा विवाह करून दिला. बाजीरावांनी गोविंदपंत खेर (बुंदेले) यांना सेनापती म्हणून बुंदेलखंडात ठेवले. ब्राह्मणांमध्ये दुसरा विवाह मान्य नाही, छत्रसाल व मुस्लिम राणीच्या विवाहानंतर मस्तानीचा जन्म झाला असल्याने तिचा बाजीरावाशी विवाह मान्य नव्हता, असे त्यांनी यावेळी सांगितले.नातेसंबंध दृढ करण्यासाठी तत्कालीन राजेशाहीमध्ये असे अनेक विवाह करून संरक्षण केले जायचे. यामुळेच उत्तरेतील कोणत्याही राज्यात सकल सौभाग्यवती मस्तानी असे संबोधले जाते.ते म्हणाले, नरपती शाहू हर्षनिधान अशी मुद्रा पेशव्यांना प्राप्त झाली. शाहू गादीच्या संरक्षणासाठी व त्यांना हर्ष देण्यासाठी आम्ही सज्ज आहोत, अशी ही मुद्रा होती. भगव्या ध्वजाच्या अधिपत्याखाली शौर्य दाखवायला आणि प्राण द्यायला मराठे, ब्राह्मण, मुस्लिम आणि अठरापगड जातींतील लोक होते. हा इतिहास विसरून चालणार नाही. इतिहास संशोधनासंदर्भात ते म्हणाले, शासनाच्या निकषांप्रमाणे पत्रव्यवहाराला जास्त महत्त्व आहे. बखरी दुय्यम मानल्या आहेत. कारण त्या अनेक वर्षांनंतर मिळालेल्या माहितीनुसार व त्यात काही दंतकथाही असू शकतात. पण या इतिहासाची धार बोथट करूनच समाजाला इतिहास सांगितला जातो. ब्राह्मणांनी जो इतिहास लिहिला तो सत्य घटनेवरच लिहिला. त्यात कोणत्या जाती - धर्माच्या लोकांवर आसूड ओढलेला नाही. जे सत्य आहे तेच लिहिले आहे.त्यांनी पूर्वरंगामध्ये संत तुकारामांचा ‘आपुलिया हिता जो’ हा अभंग निरूपणाला घेतला. आज आयडॉल म्हणून प्रचंड श्रीमंत व्यक्तींचे नाव घेतले जाते. पण, त्यापेक्षा बाबा आमटे हे आयडॉल असतील तर देशाचे भवितव्य नक्कीच चांगले घडेल. आफळेबुवांनी खड्या आवाजात गायलेली घडवायाला राष्ट्र नवे, पद्मानाभा नारायणा, काय अंगकांती वर्णावी, खणखणती भाले तलवार या पदांना श्रोत्यांनी प्रतिसाद दिला. (प्रतिनिधी)जैतापूरच्या किल्ल्याला दोन महिने वेढा.मस्तानीचा बाजीरावांशी विवाह मान्य नव्हता.नातेसंबंध दृढ होण्यासाठी विवाह करून संरक्षण.भगव्या ध्वजाच्या अधिपत्याखाली लोक.इतिहासाची धार बोथट करूनच सांगितला जातो.बाबा आमटे हे आयडॉल असतील.
शृंगारापेक्षा बाजीरावाचे शौर्य, पराक्रम कितीतरी पटीने मोठ
By admin | Published: January 08, 2016 12:05 AM