कणकवली : गणेशोत्सवाच्या कालावधीत कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये तसेच कोणती अप्रिय घटना घडू नये यासाठी सर्वांनी सतर्क राहावे. जिल्ह्याबाहेरून येणाऱ्या भाविकांची तसेच वाहनचालकांची गैरसोय होऊ नये, यासाठी कणकवली तालुक्यातील प्रत्येक शासकीय विभागाने योग्य पद्धतीने काळजी घ्यावी, असे आवाहन प्रांताधिकारी संतोष भिसे यांनी केले.येथील तहसील कार्यालयात प्रांताधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखाली गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर मंगळवारी शांतता समितीची आढावा बैठक झाली. यावेळी ते बोलत होते. उपविभागीय पोलीस अधिकारी पद्मजा चव्हाण, नगराध्यक्षा अॅड. प्रज्ञा खोत, तहसीलदार समीर घारे, गटविकास अधिकारी चंद्रसेन मकेश्वर, नायब तहसीलदार आर. जे. पवार, सहायक पोलीस निरीक्षक गीताराम शेवाळे, उमेश वाळके, तीन आसनी रिक्षा संघटनेचे प्रतिनिधी अण्णा कोदे, सहा आसनी रिक्षाचालकांचे प्रतिनिधी राजू पवार, फोंडाघाट सरपंच आशा परब, वीज वितरणचे अभियंता अनंत जोगदंड, संतोष सावंत, रमेश आमडोसकर, सचिन सरंगले, व्ही. आर. शिंदे, पी. व्ही. कांबळे उपस्थित होते. पोलीस, तीनआसनी रिक्षाचालक यांची याबाबत बैठक घेण्यात येईल, असे पोलीस उपविभागीय अधिकारी पद्मजा चव्हाण यांनी सांगितले. भाडे नाकारणाऱ्या चालकांवर कारवाई करावी अशी मागणी केली. तालुक्यात तीन सार्वजनिक गणेशोत्सव मंडळे असून त्यांनी ध्वनिप्रदूषणाचे नियम पाळावेत अशी सूचना केली. एसटीने सर्व बसस्थानकांवर विशेष व्यवस्था केल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले. रेल्वे स्थानकात एस.टी.च्या जादा गाड्या उपलब्ध करण्याबाबत कणकवली रेल्वेस्थानकात स्वतंत्र नियंत्रण कक्ष उभारण्यात येणार आहे. आरोग्य विभागातर्फे महामार्ग, रेल्वे व एस.टी. बसस्थानकावर विशेष आरोग्य पथके तैनात ठेवण्यात येणार आहेत. शुद्ध पाणीपुरवठा करण्याचे नियोजन केल्याची माहिती दिली. वीज वितरणने वीज पुरवठा सुरळीत ठेवण्याबरोबर सार्वजनिक ठिकाणी किंवा नागरी वस्तीत असलेल्या पेट्या वा वीजवाहिन्यांचा धोका नागरिकांना होणार नाही याबाबतची सूचना करण्यात आली. (वार्ताहर)परवानगीशिवाय फलक लावू नयेतगणेशोत्सव काळात मुंबई-गोवा महामार्गाच्या दुतर्फा किंवा बाजारपेठेमध्ये वाहनचालकांना त्रास होऊ नये, अशा ठिकाणी डिजिटल फलक उभारण्यात येऊ नयेत. फलक लावण्यासाठी परवानगी घेतली नसल्यास तो तत्काळ काढण्यात यावा. तशी सूचना तालुक्यातील ग्रामपंचायतींबरोबर नगरपंचायतीलाही करण्यात आली आहे. फोंडाघाट तसेच करुळ घाटातील खड्डे भरण्याचे काम सार्वजनिक बांधकाम विभागाने पूर्ण करावेत, अशी सूचना करण्यात आली. रेल्वेस्थानकांवर वाहनांची व्यवस्था करण्यात यावी.
कायदा, सुव्यवस्थेबाबत काळजी घ्या
By admin | Published: September 02, 2015 9:30 PM