मालवण : सुट्टीच्या कालावधीत शाळा महाविद्यालयात होणाऱ्या चोऱ्यांच्या पार्श्वभूमीवर पोलिसांनी संबंधितांना दक्ष राहण्याच्या सूचना केल्या आहेत. जिल्ह्यासह तालुक्यात शाळा महाविद्यालयात चोऱ्यांच्या घटनांत वाढ झाल्याने पोलीस निरीक्षक विश्वजित बुलबुले यांनी पोलीसपाटील तसेच मुख्याध्यापक व प्राचार्य यांची रविवारी संयुक्त बैठक घेऊन सुरक्षिततेच्या दृष्टीने खबरदारी घेण्याचे सांगितले आहे.मागील काही महिन्यात अज्ञात चोरांकडून बंद शाळा, महाविद्यालये, मंदिरे फोडण्याचे प्रकार समोर आले आहेत. पुढील काळात सुटीचा हंगाम सुरूहोणार असल्याने चोरांकडून शाळा महाविद्यालयांना लक्ष्य केले जाऊ शकते. यावर खबरदारीची उपाययोजना म्हणून तालुक्यातील पोलीसपाटलांनी सतर्क राहणे आवश्यक आहे.गावात कोणताही अनुचित प्रकार, अपहरण किंवा त्याबाबत माहिती समजल्यास पोलीस ठाण्याशी संपर्क साधून माहिती देण्याच्या सूचना पोलिसपाटलांना देण्यात आल्या. तसेच मागील एप्रिल मे महिन्यात शाळा महाविद्यालयांना चोरट्यांनी लक्ष्य केले होते. पोलीसपाटलांनी आपापल्या गावातील शाळा महाविद्यालयांवर तसेच संशयास्पद व्यक्तींवर लक्ष ठेवणे आवश्यक असल्याचे बुलबुले म्हणाले. (प्रतिनिधी)सध्या अल्पवयीन मुलींच्या अपहरणाचे प्रमाण वाढले असून, या संबंधीची माहिती मिळाल्यास पोलिसांशी संपर्क साधावा. तरुण मुले व मुली चंगळवादाच्या आहारी गेली आहेत. त्यांना रोखण्यासाठी पालकांची जबाबदारी महत्त्वाची आहे. पालकांनी आपली जबाबदारी ओळखून पाल्यावर नजर ठेवायला हवी. विद्यार्थ्यांना मार्गदर्शन शिबिर व्यक्तिमत्त्व विकासाबाबत मार्गदर्शनाची गरज आहे. पालकांनी शिक्षकांच्या संपर्कात राहायला हवे.- विश्वजित बुलबुले,पोलीस निरीक्षक मालवण
सुरक्षेच्यादृष्टीने खबरदारी घ्या
By admin | Published: March 24, 2015 10:03 PM