मालवण : सामाजिक, आर्थिक व जात सर्वेक्षण २०११ च्या सुनावणीसाठी तहसीलदार, नायब तहसीलदार, गटविकास अधिकारी यांच्या नियुक्त्या करण्यात आल्या असताना शुक्रवारी सुनावणीच्या पहिल्याच दिवशी सुनावणीची प्रक्रिया सांख्यिकी विस्तार अधिकाऱ्यांमार्फत पूर्ण केल्याने याप्रकरणी भाजपा प्रांतिक सदस्य विलास हडकर यांनी हरकत घेत नाराजी व्यक्त केली आहे.सामाजिक, आर्थिक व जात सर्वेक्षणाची सुनावणी मालवण पंचायत समिती येथे आयोजित केली होती. सुनावणीच्या पहिल्या दिवशी हडी गावातील तीन अर्जदारांना आपले म्हणणे मांडण्यासाठी आदल्या दिवशी नोटिसा देऊन बोलविण्यात आले होते. परंतु ही सुनावणी घेण्याची जबाबदारी असणारे मालवणचे गटविकास अधिकारी राजेंद्र पराडकर सुनावणी ठिकाणी अनुपस्थित राहिल्याने सुनावणीची प्रक्रिया सांख्यिकी विस्तार अधिकारी चौगुले यांच्यामार्फत घेण्यात आली. ही सुनावणी सक्षम अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत न झाल्याने या कार्यपद्धतीवर विलास हडकर यांनी नाराजी व्यक्त केली. याबाबत विलास हडकर यांनी दिलेल्या प्रसिद्धीपत्रकात हडकर यांनी या सर्वेक्षणाच्या माहिती संकलन प्रक्रियेवरही आक्षेप नोंदविला आहे. प्रशासकीय चुकांमुळे कुटुंबप्रमुखाचे भविष्यात सर्व्हेत जे काही समावेश केले जाईल अथवा वगळले जाईल त्याला प्रशासन कुटुंबप्रमुखालाच जबाबदार धरणार व होणाऱ्या परिणामांना सामोरेही कुटुंबप्रमुखालाच जावे लागणार याची जाणीव ठेवून प्रशासकीय यंत्रणेने आक्षेप, दुरुस्ती नोंदविणाऱ्याचे आपल्या दप्तरी नोंदवून घेतलेल्या म्हणण्याचे व त्याचे म्हणणे या मांडणीवर संबंधित सुनावणी करणाऱ्याने दिलेला आदेश याची लेखी प्रत कुटुंबप्रमुखास मिळणे आवश्यक असल्याचे हडकर यांनी सांगितले आहे. (प्रतिनिधी)जनतेला फटका हा सर्व्हे प्रथमच आॅनपेपर न करता माहिती डायरेक्ट प्रगणक व डाटा आॅपरेटर यांच्यामार्फत भरताना कोड पद्धत वापरली गेली. मात्र, हे कोड आणि माहिती आॅपरेटरकडून चुकीच्या पद्धतीने भरली गेल्याने हडी गावातील ७० टक्के कुटुंबांची यादी सदोष दिसते. प्रशासनाच्या चुकीमुळे सामान्य जनतेला फटका बसत आहे असे हडकर यांनी म्हटले आहे.
जात सर्वेक्षण सुनावणी पहिल्याच दिवशी पूर्ण
By admin | Published: March 15, 2015 9:42 PM