कणकवली: छत्रपती शिवाजी महाराज तसेच छत्रपती संभाजी महाराज हे आमचे दैवत आणि आदर्श आहेत. त्यांना औरंगजेबापेक्षा लहान दाखवण्याचा प्रयत्न कोणी करत असेल तर आम्ही ते खपवून घेणार नाही. अशा लोकांना देशात पुरस्कार देऊ नयेतच आणि यापूर्वी दिले असतील तर ते परत घ्यावेत अशी मागणी भाजप आमदार नितेश राणे यांनी सरकारकडे केली आहे.आमदार राणे यांनी आज, मंगळवारी कणकवली येथील निवासस्थानी प्रसिद्धी माध्यमांशी संवाद साधला. ते म्हणाले औरंगजेबाने जुलूम केले, अत्याचार केले. त्याला छत्रपती शिवाजी महाराजांपेक्षा मोठे समजायचे आणि छत्रपतींना इतिहासात लहान करायचे असे जे षडयंत्र चालू आहे. त्याला भालचंद्र नेमाडे हे खतपाणी घालत आहेत. औरंगजेब हिंदू द्वेषी नव्हता असे सांगून नेमाडे यांना औरंगजेबाची महती वाढवायची आहे. असले प्रकार आम्ही खपवून घेणार नाही असेही ते म्हणाले.मातोश्रीचा टोल बंद झाल्याने मुंबईचे टोल आठवले ते पुढे म्हणाले, ठाकरे सेनेचे खासदार संजय राऊत हे अकलेचे तारे तोडत आहेत. त्यांचा पुढील मुक्काम आर्थर रोड जेलमध्ये असेल. मातोश्रीचा टोल बंद झाल्याने आदित्य ठाकरे यांना आता मुंबईचे टोल आठवले आहेत. मात्र, मातोश्री २ कोणाच्या पैशातून बांधली. गुजराती आणि मारवाडी समाजाचे पैसे किती लागले याचा हिशोब त्यांनी द्यावा असे आव्हान नितेश राणे यांनी यावेळी दिले.महायुतीचीच सत्ता येणार अमित शहा हे २०२४ मध्ये पण मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याबद्दल गौरवोद्गार काढतील, कारण महायुतीचीच पुन्हा सत्ता येणार असल्याचा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.
भालचंद्र नेमाडेंना औरंगजेबाची महती वाढवायची आहे, असे प्रकार खपवून घेणार नाही - नितेश राणे
By सुधीर राणे | Published: August 08, 2023 4:58 PM