शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी: मविआतील तिढा सुटला?; काँग्रेस १०० जागा लढणार, ठाकरे-पवारांच्या वाट्याला किती?
2
"मुंबई विद्यापीठाचा कारभार म्हणजे 'फक्त' रात्रीस खेळ चाले"; पुन्हा सिनेट निवडणूक रद्द
3
इस्त्रायल लेबनानच्या 'पेजर' स्फोटात भारताचं कनेक्शन; केंद्रीय तपास यंत्रणा अलर्ट
4
"ओए... सोए हुए हैं सब लोग..!" कॅप्टन रोहित झाला 'अँग्री यंग मॅन'; सगळं स्टंप माइकमध्ये झालं रेकॉर्ड (VIDEO)
5
तणाव वाढला! जरांगेंच्या उपोषणाला पाठिंबा देण्यासाठी बीड, धाराशिवमध्ये बंदची हाक
6
सलमान खानने संगीता बिजलानीला दिला धोका, या अभिनेत्रीसोबत अभिनेत्याला पकडलं होतं रंगेहाथ, इतक्या वर्षांनंतर झाला खुलासा
7
VIDEO: PM मोदींच्या वाढदिवसानिमित्त खोटं खोटं रक्तदान; फोटो काढून निघून गेले भाजपचे महापौर
8
डीके शिवकुमारांची खेळी, JDS ला मोठा धक्का; पोटनिवडणुकीपूर्वी १३ नेत्यांनी साथ सोडली
9
तिरुपतीच्या लाडूंच्या विक्रीतून वर्षांला ५०० कोटींचा महसूल; पाहा किती जुना आहे 'मिठा प्रसादम'चा इतिहास
10
शंभुराज देसाईंचा मध्यरात्री फोन अन् मनोज जरांगेंनी घेतले सलाईनद्वारे उपचार
11
टुकडे टुकडे गँग, अर्बन नक्षलवादी काँग्रेस चालवत आहेत; वर्धेतील पीएम विश्वकर्मा योजना वर्षपूर्ती सोहळ्यात मोदींचा घणाघात
12
जबरदस्त क्रेझ... दर तीन मिनिटांना एका iPhone 16 ची विक्री; Blinkit आणि BigBasket वरही ग्राहकांची रांग
13
"५० खोक्यांचा मुकूट, विरोधी पक्ष फोडाया बुद्धी..."; नवरा माझा नवसाचा २ च्या भारूडाची जोरदार चर्चा
14
"राजकारण असा धंदा जिथे सामान्यांच्या शिव्या..."; देवेंद्र फडणवीसांनी व्यक्त केली भावना
15
भाजपच्या सभेतील माणसे काँग्रेसच्या सभेतही दिसतील! विविध कंपन्यांकडून गर्दी जमविण्याची हमी
16
Today Daily Horoscope: आजचे राशीभविष्य: कोणत्याही प्रकारे अविचारी निर्णय करू नका
17
ठाकरे गटाचा दसरा मेळावा यंदाही शिवाजी पार्कात? शिंदेसेनेकडून मैदानासाठी अर्ज नाही
18
अटल सेतूवर ट्रॅफिक नियम तोडाल तर, सावधान... वाहतुकीवर आयटीएमएसची करडी नजर
19
तिरुपतीचे तूप तापले! स्वस्त तूपखरेदीमुळे मंदिराच्या लाडूत भेसळ झाल्याचा आराेप
20
सुधारित आयटी नियम घटनाबाह्य, मुंबई उच्च न्यायालयाचा केंद्र सरकारला दणका

पावसाअभावी भातलागवडीचा खोळंबा

By admin | Published: July 08, 2017 10:39 PM

कडकडीत ऊन : शेती बनली खर्चिक, जिल्ह्यात पाऊस अघोषित संपावर, रोपे सुकण्याची वेळ, शेतकरी चिंतेत

लोकमत न्यूज नेटवर्करत्नागिरी : जिल्ह्यात सरासरी ३५९१ मिलिमीटर पाऊस पडतो. मात्र, आतापर्यंत जिल्ह्यात सरासरी १०८८.४० मिलिमीटर पाऊस पडला आहे. पावसाच्या पाण्यावर येथील भातशेती अवलंबून असल्याने व सध्या पाऊस गायब असल्यामुळे भातशेती लागवडीला विलंब होत आहे. कडकडीत ऊन पडत असल्यामुळे पंपाच्या पाण्यावर सध्या भातशेती लागवड सुरू असल्याने ती खर्चिक बनली आहे. जिल्ह्याचे मुख्य पीक भात असून, ७० हजार ९१० हेक्टर क्षेत्रावर भातपिकाची लागवड केली जाते. दुय्यम पीक म्हणून नागलीही लावण्यात येते. १४ हजार ७५० हेक्टर क्षेत्रावर नागली लागवड केली जाते. ८०९ हेक्टर क्षेत्रावर कडधान्य, ११८० हेक्टर क्षेत्रावर भाजीपाला तसेच ८२५९ हेक्टर क्षेत्रावर तृणधान्य व १०० हेक्टर क्षेत्रावर गळीतधान्य घेण्यात येते. जिल्ह्यात पारंपरिक पध्दतीने भातलागवड करण्यात येत असली, तरी येथील भातशेती ही मुख्यत्वे पावसावर अवलंबून आहे. गतवर्षी दि. ८ जुलै अखेर सरासरी १४३६.४५ मिलिमीटर पाऊस पडला होता. गतवर्षीच्या तुलनेत यावर्षी सरासरी ३५९.०१ मिलिमीटर इतका कमी पाऊस झाला आहे. जिल्ह्यात ७१ हजार हेक्टर क्षेत्रावर भातलागवड करण्यात येते. मात्र, पावसाअभावी आतापर्यंत ३२ हजार ५३२ हेक्टर क्षेत्रावरील भात लागवड पूर्ण करण्यात आली आहे. १४ हजार ७५० हेक्टर क्षेत्रावर नागली पिकाची लागवड करण्यात येते. मात्र, आतापर्यंत ५२८ हेक्टर क्षेत्रावर ही लागवड करण्यात आली असून, ५३ हेक्टर क्षेत्रावर वरीची लागवड पूर्ण झाली आहे. भाजीपाला लागवड ५१४ हेक्टरवर करण्यात आली असून, गळीत धान्यापैकी भुईमूग ५, कारले ६९, तीळ ३० मिळून एकूण १०० हेक्टरवर लागवड करण्यात आली आहे. आतापर्यंत जिल्ह्यात लागवडीचे ४५ टक्के काम पूर्ण झाले असून, शेतकऱ्यांना आता पावसाची प्रतीक्षा लागून राहिली आहे.सध्या पावसाने विश्रांती घेतल्याने बळीराजा चिंतेत आहे. लागवड पद्धतीने भातशेती करण्यात येत असल्याने रोपवाटिकेतून रोपे तयार होऊनसुद्धा पावसाअभावी शेतकऱ्यांना लागवड करणे अवघड बनले आहे. भातलागवड करताना चिखल करुन त्यामध्ये भाताची रोपे लावण्यात येतात. ही रोपे काढून पुन्हा दुसऱ्या शेतात लावण्यात आल्याने वरच्यावर ही लागवड असते. सध्या शेतकरी पंप भाड्याने घेऊन लागवड करीत असले, तरी पावसाच्या पाण्याअभावी ही रोपे वाळण्याचा धोका निर्माण झाला आहे. उन्हाच्या कडाक्यामुळे शेतात सोडलेले पंपाचे पाणीदेखील बाष्पीभवनामुळे कमी होत आहे. मात्र, शेतकरीवर्ग आर्थिक भुर्दंड सोसून भातलागवडीच्या कामात व्यस्त आहे. पाण्याअभावी डोंगर, व कातळावरील शेतीची कामे रखडली आहेत. पाण्याची अन्य कोणतीही सुविधा उपलब्ध नसल्याने शेतकऱ्यांना आता पावसाची प्रतीक्षा लागून राहिली आहे. भातलागवडीला केल्या जाणाऱ्या पाणीपुरवठ्यासाठी पंप भाड्याने घ्यावा लागत असून, त्यासाठी तासाला २५० ते ३०० रूपये भाडे शेतकऱ्यांना मोजावे लागत आहे. तर नांगरणीसाठी वापर होत असलेल्या पॉवर टिलरचे भाडे ३५० ते ४०० रूपये आकारले जात आहे. याचबरोबर स्त्री मजुरांची मजुरी दिवसाला १५० ते २०० रूपये तर पुरूष मजुरांची दिवसाला २०० ते २५० रूपये मजुरी आहे. खते, कीटकनाशके, बियाण्यांचे दर वाढल्यामुळे भातशेती लागवडीसाठी शेतकऱ्यांना अधिक खर्च येत असून, त्या तुलनेत उत्पन्न मिळत नसल्यामुळे शेतकरीवर्ग चिंताग्रस्त बनला आहे.तीन दिवस गायब : रोपे पिवळी पडू लागलीसिंचनाचे मोठे प्रकल्प जिल्ह्यात नसल्यामुळे उपलब्ध विहिरी, नदी, बंधारे व पाटाच्या पाण्यावर जिल्ह्यात लागवड सुरू आहे. गेले दोन-तीन दिवस पावसाची एकही सर कोसळलेली नाही. त्यामुळे कडाक्याच्या उन्हात ही शेती पिवळी पडू लागली आहे.