वेंगुर्ले : वेंगुर्ले नगरपरिषदेला रस्ता विकास, नगरोत्थान विकास, दलित वस्ती विकास निधी अंतर्गत मंजूर झालेल्या दोन कोटींच्या विकासकामांचे भूमिपूजन नगराध्यक्ष प्रसन्ना कुबल, उपनगराध्यक्ष अभिषेक वेंगुर्लेकर, मुख्याधिकारी रामदास कोेकरे व नगरसेवक यांच्या उपस्थितीत केले. वेंगुर्ले नगरपरिषदेस शहरातील कामांसाठी प्राप्त झालेल्या दोन कोटींच्या विकास निधीतून मंजूर कामांचे भूमिपूजन केले. यामध्ये नगरपरिषद हद्दीतील कोचीन बंगला ते मोहन गावडे यांच्या घरापर्यंत जाणारा रस्ता (२.४६ लाख), रामेश्वर मंदिर ते कुंभवडापर्यंतचा रस्ता (२.९५ लाख), साई मंगल कार्यालय ते रामेश्वर मंदिर गल्लीपर्यंत जाणारा रस्ता (२.७६ लाख), ग्रामीण रुग्णालयाकडील रस्ता (२.९५ लाख), घोलयेकर परबवाडी ते लक्ष्मी राणे यांच्या घरापर्यंतचा रस्ता (४.३३ लाख), लोपाद्रेश्वर वडखोल रस्ता (३३.४८ लाख), जुने तहसीलदार कार्यालय ते नवीन तहसीलदार कार्यालय रस्ता (६.३५ लाख), विनय सामंत यांच्या घरापासून नाल्यापर्यंतचा रस्ता (५.0८ लाख), भाऊ आरोलकर ते राजवाडामार्गे आतील विठ्ठलवाडी शाम गावडे यांच्या घरापर्यंतचा रस्ता (२२.८८ लाख), परुळेकर गल्ली रस्ता (४.८२ लाख), आदी रस्त्यांचे डांबरीकरण करणे त्याचबरोबर लोपाद्रे्रेश्वर वडखोल रस्ता संरक्षक भिंत व मोरीचे बांधकाम करणे (३९.३४ लाख), महाजनवाडी येथील पाणंदीचे सिमेंटीकरण करणे (५.९३ लाख), दाभोसवाडा येथील बाबी रेडकर ते भाऊ आरोलकर यांच्या घरापर्यंत गटाराचे बांधकाम करणे (१३.५0 लाख), सदानंद बांदेकर यांच्या घरासमोरील गटाराचे बांधकाम करणे (११.२९ लाख), वेंगुर्ले नगरपरिषदेस व्हेईकल माऊंडेट फॉगिंग मशीन पुरविणे (४.२0 लाख), वडखोल येथील पिण्याच्या पाण्याचा विहिरीचा विकास करणे (७.७५ लाख), आनंदवाडी भागातील ठिकाणी नवीन पाईप लाईन टाकून पाणीपुरवठा करणे (८.७१ लाख), १३ व्या वित्त अनुदान आयोगातून वेंगुर्ले शहरात एलईडी दिवे पुरवठा करणे (१८.७८ लाख), आदी दोन कोटींच्या कामांना मंजुरी मिळाली आहे. यांचे भूमिपूजन नगराध्यक्ष प्रसन्ना कुबल, उपनगराध्यक्ष अभिषेक वेंगुर्लेकर, मुख्याधिकारी रामदास कोेकरे व नगरसेवक यांच्या उपस्थितीत करण्यात आले. (प्रतिनिधी)
दोन कोटींच्या विकासकामांचे भूमिपूजन
By admin | Published: December 01, 2015 10:27 PM