शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL Auction 2025: तब्बल ५ तासांनी Mumbai Indians ने विकत घेतला पहिला खेळाडू, १२.५० कोटींना कोण आलं संघात?
2
'ज्यांनी मला त्रास दिला ते सगळे साफ झाले', अशोक चव्हाणांची थोरात-देशमुखांवर बोचरी टीका
3
IPL Auction 2025: मुंबई इंडियन्सने सोडलेला जोफ्रा आर्चर अखेर राजस्थान रॉयल्समध्ये गेला, किती मिळाली किंमत?
4
शिवसेना मुख्यमंत्री पदावर अडीच वर्षासाठी दावा करणार? केसरकर स्पष्टच बोलले...!
5
'तरुण नेतृत्व उभारणार, घरी बसणार नाही', पराभवानंतर शरद पवार नव्या जोमाने कामाला लागले
6
"सर्वेक्षण करा, जी ज्याची जागा असेल त्याला देऊन टाका..."; संभल जामा मशीद प्रकरणावर काय म्हणाले राकेश टिकैत?
7
IPL Auction 2025 : MI नं दिला नाही भाव; Ishan Kishan साठी काव्या मारन यांनी लावली एवढ्या कोटींची बोली
8
IPL Auction 2025 : बिग सरप्राइज! SRK च्या KKR नं रिलीज केलेल्या खेळाडूसाठी मोजली मोठी किंमत, अनेकांच्या भुवया उंचावणारी बोली
9
IPL Auction 2025: 'अनुभवी' अश्विनसाठी दोन जुने संघ भिडले, अखेर CSK ने RR ला दिली मात, कितीला विकत घेतलं?
10
IPL Auction 2025: Gujarat Titans ची शांतीत क्रांती! ३ मॅचविनर खेळाडूंना 'गपचूप' घेतलं ताफ्यात, पाहा कोण?
11
"योगी आदित्यनाथांच्या 'त्या' घोषणेमुळे...";'बटेंगे तो कटेंगे'वर शरद पवारांचे महत्त्वाचे विधान
12
"...त्यामुळे महिलांनी आमच्या विरोधात मतदान केलं"; निकालानंतर शरद पवारांची पहिली प्रतिक्रिया
13
IPL 2025 Auction : १८ कोटींच पॅकेज नाकरणाऱ्या KL Rahul साठी DC नं किती कोटी मोजले ?
14
"EVM बाबत माहिती नाही, पण लोक सांगतात की..."; पराभवानंतर शरद पवारांचे मोठं विधान
15
महायुतीच्या विजयात CM योगींची किती मोठी भूमिका? चंद्रशेखर बावनकुळे म्हणतात...
16
IPL Auction 2025: युजवेंद्र चहलला १७७ % 'अप्रेझल'! बनला सर्वात महागडा स्पिनर, पंजाब किंग्जने घेतलं संघात
17
"काय झालं हेच आम्हाला कळेना...;" निवडणूक निकालाच्या दुसऱ्या दिवशी काँग्रेसनं सांगितला पुढचा प्लॅन
18
TATA IPL Auction 2025 Live: इशान किशन हैदराबादच्या ताफ्यात; SRH ने लावली 11.25 कोटींची बोली...
19
IPL Auction 2025: व्वा पंत... मानलं ! अवघ्या १५ मिनिटात इतिहास बदलला, रिषभ सर्वात महागडा खेळाडू ठरला!!
20
विधानसभा संपल्या, आता विधान परिषदेवर लक्ष; महायुतीच्या कोणत्या 6 नेत्यांना लागणार लॉटरी?

चौपदरीकरणांतर्गत पूलांचे भूमिपूजन

By admin | Published: May 04, 2015 12:35 AM

विनायक राऊत : महामार्गावर पाच ठिकाणी बॉक्सेलऐवजी उड्डाण पूल

कणकवली/सिंधुदुर्गनगरी : मुंबई गोवा महामार्गाच्या कामाची निविदा प्रक्रिया आॅगस्टपूर्वी पूर्ण केली जाईल. येत्या डिसेंबरपूर्वी चौपदरीकरणाचे काम सुरू करण्याचे नियोजन आहे. कणकवली, लांजा, पाली, चिपळूण या बाजारपेठांच्या ठिकाणी प्रस्तावित बॉक्सेल पुलाचे आराखडे बदलून येथे उड्डाणपूल बनविण्यासाठी आराखडे तयार करण्यात येत आहेत. खासदार विनायक राऊत यांनी सांगितले. जानवली पुलाच्या भूमिपूजनप्रसंगी आयोजित कार्यक्रमात राऊत बोलत होते. यावेळी मुंबई-गोवा महामार्गाच्या चौपदरीकरणाचा भाग म्हणून या महामार्गावरील जानवली (कणकवली), कसाल नदी व पीठढवळ नदीवरील पुलांचे भूमिपूजन रविवारी करण्यात आले. यावेळी राऊत बोलत होते. यावेळी आमदार वैभव नाईक, भाजपचे जिल्हाध्यक्ष अतुल काळसेकर, माजी आमदार प्रमोद जठार, संजय पडते, महामार्ग प्राधिकरणाचे ए. डी. सूर्यवंशी, यतीन पटवर्धन, बळी परब, युवासेना जिल्हाप्रमुख अ‍ॅड. हर्षद गावडे, भाजपा महिला आघाडी जिल्हाध्यक्षा राजश्री धुमाळे, उपजिल्हाप्रमुख राजू शेटये, तालुकाप्रमुख सचिन सावंत, नगरसेविका नंदिनी धुमाळे, सिद्धिविनायक ट्रस्टचे माजी अध्यक्ष सुभाष मयेकर, युवा सेना तालुकाप्रमुख राजू राठोड, शामल म्हाडगुत, उपतालुकाप्रमुख प्रथमेश सावंत आदी उपस्थित होते. राऊत पुढे म्हणाले की, चौपदरीकरण होत असताना जमिनी व मालमत्तांना नवीन कायद्याप्रमाणे बाजारभावाच्या दुप्पट व चौपट मोबदला देण्यात येणार आहे. घरे, मालमत्ता वाचविण्याचा प्रयत्न करण्यात येणार आहे. चौपदरीकरणासाठी केंद्रशासनाकडून ५ हजार कोटींची तरतूद करण्यात आली आहे. पहिल्या टप्प्यात मंजूर १४ पूलांच्या कामांपैकी ५ पुलांच्या कामाचे रविवारी उद्घाटन करण्यात आले. युती सरकार आल्यावर वर्षाच्या आत महामार्ग चौपदरीकरणाचे काम सुरू करण्यात आले आहे. यात राजकारणाचा भाग नसून लोकांची गरज म्हणून हे काम केले जात आहे. या चौपदरीकरणात फक्त पंधरा ते वीस टक्के मालमत्ता जाणार आहे. सध्या महामार्गाचे जमिन मोजणीचे काम सुरू असून लोकांनी याला सहकार्य करावे, असे आवाहन राऊत यांनी केले. विकासाच्या दृष्टीने सर्वांनी या कामाला सहकार्य करावे. जानवली पादचारी पुलासाठी भाजपा पदाधिकाऱ्यांनी आंदोलन केले होते. चौपदरीकरणाने ही समस्याच संपुष्टात येईल. चौपदरीकरणाचे काम २०१९ पर्यंत पूर्ण व्हायला हवे, असे माजी आमदार प्रमोद जठार म्हणाले. भाजपा जिल्हाध्यक्ष अतुल काळसेकर म्हणाले की, मुंबईत ५५ उड्डाणपूल युती सरकारने पूर्ण केले आहेत. युती सरकार आश्वासने पूर्ण करते, हे यामुळे सिद्ध झाले. आमदार वैभव नाईक म्हणाले, भूसंपादनाशी संबंधित लोकांचे प्रश्न, शंका असतील तर त्यांचे निरसन केले जाईल. महामार्ग चौपदरीकरणालाही काळाची गरज होती व आज ती प्रत्यक्षात उतरत आहे, यासाठी युतीचे शासन सर्वस्वी जबाबदार आहे. अतुल काळसेकर म्हणाले, सिंधुदुर्गात विकासाची स्थिती निर्माण करण्यासाठी युती शासनाने जी आश्वासने दिली होती ती पूर्ण केली जातील. या महामार्ग चौपदरीकरणासाठी केंद्रीय परिवहनमंत्री नितीन गडकरी व खासदार विनायक राऊत यांनी केलेले प्रयत्न निश्चितच स्पृहणीय आहेत. या महामार्गाचे काम २०१७ पर्यंत पूर्ण करण्याचा ध्यास आहे. शिवसैनिकांची मोटारसायकल रॅलीही यावेळी लक्षणीय ठरली. (प्रतिनिधी)