VIDEO : गव्याची रिक्षाला धडक! सोशल मीडियावरील व्हायरल व्हिडिओ सिंधुदुर्गातील असल्याची अफवा
By अनंत खं.जाधव | Published: September 12, 2022 02:29 PM2022-09-12T14:29:20+5:302022-09-12T14:35:31+5:30
हा व्हिडीओ कर्नाटक किंवा केरळ येथील असल्याचे स्पष्टीकरण वनक्षेत्रपाल मदन क्षीरसागर यांनी दिले. तसेच या व्हिडिओवर विश्वास ठेवू नये, असे आवाहन ही त्यांनी केले आहे.
सावंतवाडी - गव्याने एका रिक्षेला धडक दिल्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. हा व्हिडिओ सावंतवाडी तालुक्यातील असनिये येथील असल्याचे बोलले जात आहे. तर कुण हा व्हिडिओ राधानगरी फोडा येथील असल्याचे सांगत आहेत. मात्र, या व्हायरल व्हिडीओची सत्यता पडताळून पाहिली असता, तसेच वनविभागाशी सर्पक केला असता हा व्हिडीओ कर्नाटक किंवा केरळ येथील असल्याचे स्पष्टीकरण वनक्षेत्रपाल मदन क्षीरसागर यांनी दिले. तसेच या व्हिडिओवर विश्वास ठेवू नये, असे आवाहन ही त्यांनी केले आहे.
सिंधुदुर्ग जिल्ह्यात गवा रेड्यानी गेल्या काही दिवसापासून धुमाकूळ घातला आहे. मध्यंतरी आंबोली आजरा मार्गावर कारला धडक दिली तर माजगाव सावंतवाडी मार्गावर गवा रेड्याने कारला दिलेल्या धडकेत अनेक जण जखमी ही झाले होते.या सर्व घटना ताज्या असतनाच अचानक गव्याने एका रिक्षेला धडक दिल्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला.
त्यामुळे सर्वचजण अवाक झाले हा व्हिडिओ सिंधुदुर्ग जिल्ह्यातील असावा असेच सर्वाना वाटू लागले त्यानंतर प्रत्येकजण हा व्हिडिओ प्रत्येक गावा पुढे जोडून व्हायरल करू लागले अनेकांनी तर सोशल मीडियावर हा व्हिडिओ सावंतवाडी तालुक्यातील असनिये येथील असल्याचे सांगत व्हायरल केला आहे. मात्र लोकमत ने या व्हिडिओ मागची सत्यता पडताळून पाहिली असता या व्हिडिओमधील भाषा ही केरळ तामिळनाडूतील असल्याचे ऐकू येऊ आले तर रिक्षा ही त्याच परिसरातील असल्याचे दिसून आले.
त्यामुळे हा व्हिडिओ केरळमधील असल्याचे स्पष्ट होत आहे. तरीही लोकमत ने सावंतवाडी वनक्षेत्रपाल मदन क्षीरसागर यांना विचारले असता त्यांनी हा व्हिडीओ सावंतवाडी तालुक्यात असनिये भागातील नाही, अशी कोणतीही घटना तेथे घडल्याची माहिती अद्याप प्राप्त झाली नाही असे सागितले.
गव्याची रिक्षाला धडक! सोशल मीडियावरील व्हायरल व्हिडिओ सिंधुदुर्गातील असल्याची अफवा#bisonpic.twitter.com/wV0SEdxfN0
— Lokmat (@lokmat) September 12, 2022
तसेच हा व्हिडिओ केरळ किंवा तामिळनाडू कर्नाटक येथील आहे. पण सिंधुदुर्ग जिल्ह्यातील नाही, असे त्यांनी स्पष्ट केले. त्यामुळे काही सोशल मीडियावर हा व्हिडिओ सिंधुदुर्ग जिल्ह्यातील म्हणून फिरत असले तर ती अफवा असून कोणी त्यावर विश्वास ठेवू नये, असे आवाहन ही वनक्षेत्रपाल क्षीरसागर यांनी केले आहे.