कणकवली: कणकवली तालुक्यातील ग्रामपंचायतीच्या सार्वत्रिक निवडणुकीअंतर्गत ओटव ग्रामपंचायतीवर भाजपचा झेंडा फडकला आहे. तर ठाकरे सेनेचा दारुण पराभव झाला आहे. बेळणे खुर्द ग्रामपंचायतीवर ठाकरे शिवसेनेने आपला झेंडा फडकविला असून सरपंचपदी अविनाश गिरकर विराजमान झाले आहेत. मात्र तिथे ग्रामपंचायत सदस्यपदी सर्व भाजपचे उमेदवार विजयी झाले आहेत. वारगाव ग्रामपंचायतीच्या सदस्य पदाच्या पोटनिवडणूकीत भाजपचे प्रमोद केसरकर तर हळवल ग्रामपंचायतीच्या सदस्य पद पोटनिवडणूकीत भाजपचे प्रभाकर राणे विजयी झाले आहेत. कणकवली तालुक्यात भाजपने आपले वर्चस्व सिद्ध केले आहे. मात्र, पक्षीय बलाचा विचार करता भाजप व ठाकरे शिवसेना गटाला प्रत्येकी एका ग्रामपंचायतीचे सरपंच पद मिळाले आहे.तालुक्यातील हळवल आणि वारगाव ग्रामपंचायतींच्या सदस्य पदाच्या पोटनिवडणूकीत वारगाव येथील प्रमोद केसरकर हे २०३ मते मिळाल्याने विजयी झाले. तर महेंद्र केसरकर याना १२० मते मिळाली आहेत. नोटा ४ मते मिळाली आहेत. तसेच हळवल ग्रामपंचायत सदस्य पदी प्रभाकर राणे हे २३६ मते मिळवित विजयी झाले आहेत. तर सुभाष राणे यांना १६७ मते मिळाली आहेत. तिथे नोटा ३ मते मिळाली आहेत. हळवल व वारगाव या निवडणुकीत भाजपा पुरस्कृत दोन्ही उमेदवार विजयी झाले आहेत.कणकवली तहसीलदार दीक्षांत देशपांडे यांच्या दालनात मातमोजणी झाली. मतमोजणीच्या निमित्ताने पोलिस निरीक्षक अमित यादव यांच्या मार्गदर्शनाखाली कडक बंदोबस्त ठेवण्यात आला होता.ओटव ग्रामपंचायतीवर भाजपचा झेंडा!ओटव सरपंच पदासाठी झालेल्या निवडणुकीत भाजपच्या रूहिता तांबे यांनी २६४ मते मिळवत १७९ एवढ्या मोठ्या मताधिक्याने विजय मिळवला. तर शिवसेना ठाकरे गटाच्या कविता तांबे यांना केवळ ८५ मते मिळाली. सरपंच पदासहित तीनही सदस्य पदांवर भाजपचा विजय झाला तसेच अन्य ४ सदस्य बिनविरोध झाले.प्रभाग एक मध्ये भाजपच्या दीक्षा जाधव यांनी १०३ मते मिळवत विजय संपादन केला. तर विरोधी उमेदवार कविता तांबे यांना १९ मते मिळाल्याने पराभव झाला. प्रभाग क्रमांक ३ मधील दोन जागांसाठी झालेल्या निवडणुकीत भाजपच्या वैष्णवी गावकर यांनी ८५ मते मिळवत विजय संपादन केला तर अनुष्का तांबे यांना ३२ मते मिळाली. दुसऱ्या जागेसाठी भाजपच्या लता तेली यांनी ७९ मते मिळवत विजय संपादन केला तर गार्गी गावकर यांना ३९ मते मिळाली.
बेळणे खुर्द ग्रामपंचायतीवर ठाकरे सेनेचा झेंडा!बेळणे खुर्द सरपंच पदासाठी झालेल्या निवडणुकीत ठाकरे शिवसेनेने भाजपला पराभूत करीत धक्का दिला. सरपंच पदासाठी शिंदे गटाचे विलास करांडे यांना २६ मते मिळाली. शिवसेना ठाकरे गटाचे अविनाश गिरकर २१८ मते मिळवून विजयी झाले. तर भाजपचे लक्ष्मण चाळके यांना १९२ मते पडली आहेत. शिवसेना ठाकरे गटाचे अविनाश गिरकर यांच्या विजयामुळे भाजपला मोठा धक्का बसला आहे. बेळणे खुर्द प्रभाग १ मध्ये राजेंद्र चाळके ९० मते (भाजप) विजयी झाले आहेत. उदय चाळके यांना ८३ मते मिळाली. तर नोटा ३ मते मिळालीआहेत. प्रभाग ३ मध्ये विलास करांडे याना १० मते तर सिद्धार्थ तांबे यांनी ६५ मते (भाजप) मिळवत विजय संपादन केला आहे.