वेंगुर्ला : परतीच्या पावसाने वेंगुर्ला तालुक्यातील भातशेतीचे नुकसान झाले आहे. अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसानीचे त्वरित पंचनामे करून सरकारकडे अहवाल सादर करावा. शासनाने ओला दुष्काळ जाहीर करावा आणि तातडीने मदत शेतकऱ्यांच्या खाती जमा करावी अशी मागणी भाजपा किसान मोर्चा वेंगुर्ल्याच्यावतीने तहसीलदारांकडे करण्यात आली आहे.त्यांनी दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, कृषी विभागाकडून नुकसानीचा अहवाल घेऊन शासनाकडे पाठवावा. तसेच प्रतीगुंठा १०० रुपये तुटपुंजी नुकसान भरपाई किमान प्रतीगुंठा ५०० रुपये करण्यात यावी. गोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात विमा लाभापासून अनेक लाभार्थी वंचित आहेत. तो लाभही तत्काळ देण्यात यावा. गेल्यावर्षी नुकसान भरपाईसाठी लागणाऱ्या सातबाऱ्यास सरकारकडून पैसे घेतले जात नव्हते. परंतु आता सातबारासाठी शासन पैसे घेत आहे ते शासनाने बंद करावे.या गोष्टींचा शासनाने सहानभूतीपूर्वक विचार करावा व केवळ घोषणा न करता ओला दुष्काळ जाहीर करून तातडीने शेतकऱ्यांना थेट मदत करावी. अन्यथा शासनाविरोधात शेतकऱ्यांना घेऊन आंदोलन करावे लागेल असा इशारा निवेदनाद्वारे देण्यात आला.यावेळी जिल्हा सरचिटणीस प्रसन्ना देसाई, तालुकाध्यक्ष सुहास गवंडळकर, किसान मोर्चा तालुकाध्यक्ष यशवंत उर्फ बापू पंडित, महिला तालुकाध्यक्षा स्मिता दामले, किसान मोर्चा उपाध्यक्ष मकरंद प्रभू, सरचिटणीस सत्यवान पालव, चिटणीस अपर्णा बोवलेकर, रामचंद्र गावडे, प्रकाश बांदवलकर, विनय गोरे, शांताराम तेली, दशरथ गडेकर, संदीप खोत, भूषण बांबार्डेकर इत्यादी किसान मोर्चाचे कार्यकर्ते उपस्थित होते.
शासनाने ओला दुष्काळ जाहीर करावा, भाजपा किसान मोर्चाची मागणी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 20, 2020 18:18 IST
bjp, vengurla, farmar, sindhdurgnews परतीच्या पावसाने वेंगुर्ला तालुक्यातील भातशेतीचे नुकसान झाले आहे. अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसानीचे त्वरित पंचनामे करून सरकारकडे अहवाल सादर करावा. शासनाने ओला दुष्काळ जाहीर करावा आणि तातडीने मदत शेतकऱ्यांच्या खाती जमा करावी अशी मागणी भाजपा किसान मोर्चा वेंगुर्ल्याच्यावतीने तहसीलदारांकडे करण्यात आली आहे.
शासनाने ओला दुष्काळ जाहीर करावा, भाजपा किसान मोर्चाची मागणी
ठळक मुद्देशासनाने ओला दुष्काळ जाहीर करावा, भाजपा किसान मोर्चाची मागणी वेंगुर्ला तहसीलदारांना निवेदन