सिंधुदुर्ग : सिंधुदुर्ग जिल्ह्यात २३ ग्रामपंचायतींसाठी झालेल्या निवडणुकीत सुरूवातीच्या कलांमध्ये भाजपाने बाजी मारली आहे. आतापर्यंत झालेल्या निकालानुसार ५ ग्रामपंचायतींवर भाजपाने निर्विवाद वर्चस्व मिळविले आहे. त्यात ठाकरे सेनेचा अनेक ठिकाणी पराभव झाला आहे. तर ग्रामपंचायत पोटनिवडणुकीतही भाजपाची सरशी झाल्याचे पहायला मिळत आहे. त्यामुळे भाजपाच्या कार्यकर्त्यांनी जल्लोष करायला सुरूवात केली आहे.कणकवली तालुक्यातील हळवल, ग्रामपंचायत पोटनिवडणुकीत प्रभाकर श्रीधर राणे २३६ मते मिळवून निवडून आले आहेत. त्यांच्याविरोधातील उमेदवार सुभाष भिवा राणे यांना १६७ मते मिळाली. तर नोटाला तीन मते मिळाली.
वारगावच्या पोटनिवडणुकीत प्रमोद आत्माराम केसरकर २०३ व महेंद्र आत्माराम केसरकर १२० मते मिळाली यात यामध्ये प्रमोद केसरकर विजयी झाले. कणकवलीसह जिल्ह्यातील निवडणूक असलेल्या ठिकाणच्या तहसीलदार कार्यालयांमध्ये मतमोजणीला सुरूवात झाली असून सर्वत्र कडक पोलिस बंदोबस्त ठेवण्यात आला आहे