सिंधुदुर्ग: मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, केंद्रीयमंत्री नारायण राणे, उपमुख्यमंत्री अजित पवार, महसूलमंत्री उद्योगमंत्री सुभाष देसाई यांच्यासह दिग्गज नेत्यांच्या उपस्थितीत सिंधुदुर्ग येथील चिपी विमानतळाचा उद्घाटन सोहळा पार पडला. यावेळी केंद्रीयमंत्री नारायण राणे यांनी कोकणवासीयांना शुभेच्छा दिल्या. माझ्या आयुष्यातील हा आनंदाचा क्षण असल्याचेही नारायण राणे यांनी सांगितले. मात्र, पर्यटन आणि पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांना टोला लगावत आदित्य ठाकरे टॅक्स फ्री, काम करून दाखवा आनंद वाटेल, असा चिमटाही यावेळी काढला. (BJP Narayan Rane in Chipi Airport Inauguration Programme)
जीवनातील हा आनंदाचा क्षण आहे. चिपी विमानतळावरून विमानाने केलेले उड्डाण पाहून आनंद झाला. कोकणात अधिकाधिक पर्यटक यावेत. त्या माध्यमातून कोकणात समृद्धी यावी, असा मानस आहे. शिवसेनाप्रमुख दिवंगत बाळासाहेब ठाकरे यांच्यामुळे या जिल्ह्याचा विकास करू शकलो. यासाठी टाटा इन्स्टिट्यूटकडे गेलो. त्यावेळी त्यांनी पर्यटन जिल्हा करण्याचा सल्ला दिला. आत्ताचे इन्फ्रास्चक्चर आहे ते नारायण राणेंमुळे त्याच्या जवळपास पण कोणी नाही. शिक्षणात आग्रेसर जिल्हा झाला. तो कोणामुळे ते सर्वांना माहिती आहे, असेही नारायण राणे यांनी यावेळी बोलताना म्हटले.
आदित्य ठाकरे टॅक्स फ्री, काम करून दाखवा आनंद वाटेल
आदित्य ठाकरे टॅक्स फ्री आहेत. त्यांनी टाटांचा रिपोर्ट वाचावा. त्याचा सखोल अभ्यास करावा. सर्वांना अभिप्रेत असलेले काम करून दाखवावे, तर आम्हाला काय सगळ्यांना आनंद वाटेल, असा टोला नारायण राणे यांनी लगावला. तसेच बाळासाहेब ठाकरे यांना खोटे अजिबात आवडायचे नाही. खोटे बोलणाऱ्यांना त्यांच्यासमोर थारा नव्हता, असे सांगत तुम्हाला देण्यात आलेली माहिती खरी नाही, असेही नारायण राणे यांनी सांगितले.
विमानातून उतरल्यावर खड्डे बघायचे का
चिपी विमानतळावर विमानातून उतरल्यावर खड्डे बघायचे का, हा कार्यक्रम कोणाचा काय प्रोटोकोल काय, अशी विचारणा करत जे चाललेय ते एमआयडीसी ८० टक्के माझा अंतर्गत आहेत. समुद्र किनारी कोणते उद्योग येतात ते आणणार, असे आश्वासन देत चिपी विमानतळाचे सुशोभिकरण करणे आवश्यक आहे, त्यासाठी अजित पवारांनी पैसे द्यावेत, अशी मागणीही नारायण राणे यांनी यावेळी बोलताना केली.