शहरं
Join us  
Trending Stories
1
Pope Francis: पोप फ्रान्सिस यांचं निधन, दीर्घ आजारपणानंतर व्हॅटिकन सिटी येथे घेतला अखेरचा श्वास
2
हद्दच झाली...! मित्रांनी नवरा-नवरीला निळा ड्रम गिफ्ट केला; दहशतीत असलेले सगळे वऱ्हाडी पाहू लागले
3
"एका रात्रीत सर्व उद्ध्वस्त, आमच्याकडे ना दुकान आहे ना जमीन; सरकारला विनंती करतो की..."
4
ब्राह्मण असून २ लग्न का केली? अभिनेत्याचं वादग्रस्त वक्तव्य, म्हणाला- "रामाच्या वडिलांच्या ३ बायका होत्या..."
5
बाजारात ५०० रुपयांच्या बनावट नोटांचा सुळसुळाट, थोडीशी नजरचूक पडू शकते महागात, सरकारने दिला अलर्ट 
6
Ajit Pawar: 'रिक्षात पुरुषाला बसवलं तर त्याचा फोटो काढा', अजितदादांच्या महिलांना सूचना
7
WhatsApp वर चुकूनही असे फोटो डाउनलोड करू नका; तुमचे बँक खाते होईल रिकामे
8
भारताचे जावई अमेरिकेचे उपराष्ट्राध्यक्ष म्हणून पहिल्यांदाच सासरी आले; ट्रेड वॉरची भेट देणार की नेणार?
9
८ दिवसांपासून शेअर विक्रीसाठी रांग, सातत्यानं लागतंय लोअर सर्किट; गुंतवणूकदारांवर डोक्यावर हात मारण्याची वेळ
10
श्रेयस अय्यर, ईशानचं पुनरागमन, या तरुण चेहऱ्यांनाही संधी, बीसीसीआयचे वार्षिक करार जाहीर 
11
Ashwini Bidre: अश्विनी बिद्रे हत्याकांड प्रकरणात न्याय झाला; मुख्य आरोपी अभय कुरुंदकरला जन्मठेप 
12
१ मे पासून पैसे काढणे आणि बॅलन्स तपासण्यासह 'या' गोष्टी महाग होणार, किती असणार शुल्क?
13
"माझे सगळे कपडे फेकून दिले आणि...", १८व्या वर्षी उषा नाडकर्णींना आईने काढलेलं घराबाहेर
14
भारी! बालपणीच्या सुंदर आठवणींना नवा साज देणारी 'आई'; खेळण्यांपासून बनवते अप्रतिम फर्निचर
15
४ रुग्णवाहिका, १० मृतदेह...एकाच कुटुंबातील ८ जणांच्या मृत्यूनं सगळ्यांचे डोळे पाणावले
16
IRCTC कडून ७ दिवसांची जपान टूर पॅकेज; कायकाय पाहायला मिळणार? किती असणार शुल्क?
17
'राम तेरी गंगा मैली' फेम मंदाकिनीला दाऊदपासून आहे मुलगा? दिल्लीच्या माजी कमिश्नर यांनी केलेला धक्कादायक खुलासा
18
BSNL चा धमाकेदार प्लान, ९०० रुपयांपेक्षा कमीत मिळतेय ६ महिन्यांची वैधता; बेनिफिट्सही आहेत खास
19
अवघं २ किलो वजन, १ हजार डिग्री तापमान, चीनने तयार केला अणुबॉम्बपेक्षा शक्तिशाली बॉम्ब, भारतासाठी धोक्याचा इशारा
20
आधी केस गळती, आता नखं गळती; पुण्यातील आरोग्य टीम बुलढाण्यात पोहोचली

संपूर्ण लॉकडाऊनला भाजपचा विरोधच  :प्रमोद जठार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 31, 2021 17:14 IST

BJP PramodJathar Sindhudurg-ठाकरे सरकारचे सर्वच आघाड्यांवरील नियोजन आता फसलेले आहे. महाविकास आघाडीला सरकार चालविण्यात अपयश आले आहे, तर मंत्र्यांवर ताबा नसल्यामुळे राज्यात पुन्हा एकदा लॉकडाऊन करण्याचा विचार मुख्यमंत्री करीत आहेत. मात्र, गरिबाने रस्त्यावर येऊन काम केल्याशिवाय त्याची चूल पेटत नाही. त्यामुळे राज्यात लॉकडाऊन झाल्यास भाजपचा त्याला पूर्णतः विरोध असेल, असे भाजप प्रदेश चिटणीस प्रमोद जठार यांनी येथे स्पष्ट केले.

ठळक मुद्देसंपूर्ण लॉकडाऊनला भाजपचा विरोधच  :प्रमोद जठार महाविकास आघाडीला सरकार चालविण्यात अपयश

कणकवली : ठाकरे सरकारचे सर्वच आघाड्यांवरील नियोजन आता फसलेले आहे. महाविकास आघाडीला सरकार चालविण्यात अपयश आले आहे, तर मंत्र्यांवर ताबा नसल्यामुळे राज्यात पुन्हा एकदा लॉकडाऊन करण्याचा विचार मुख्यमंत्री करीत आहेत. मात्र, गरिबाने रस्त्यावर येऊन काम केल्याशिवाय त्याची चूल पेटत नाही. त्यामुळे राज्यात लॉकडाऊन झाल्यास भाजपचा त्याला पूर्णतः विरोध असेल, असे भाजप प्रदेश चिटणीस प्रमोद जठार यांनी येथे स्पष्ट केले.कणकवली येथील भाजप कार्यालयात मंगळवारी आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. यावेळी बबलू सावंत उपस्थित होते. प्रमोद जठार म्हणाले, लॉकडाऊन लागू झाला तर सर्वसामान्य, गोरगरीब आणि हातावर पोट असलेल्या कुटुंबांना उपाशी मरावे लागणार आहे. त्यामुळे लॉकडाऊनला विरोध करण्याचा आम्ही निर्णय घेतला आहे. तसेच लॉकडाऊन लागू केले तर आम्ही रस्त्यावर उतरूनही आंदोलन करणार आहोत. सरकारला जर लॉकडाऊन करायचाच असेल तर त्यांनी आधी गोरगरिबांच्या खात्यामध्ये महिन्याला किमान १० हजार रुपये जमा करावेत. त्यांच्या अन्नपाण्याची व्यवस्था करावी. त्यानंतरच लॉकडाऊनचा निर्णय घ्यावा, असेही जठार म्हणाले.राणेंनी भाजपमध्ये प्रवेश केल्यानंतर मूळ भाजपवासीयांना किंमत राहिलेली नाही, असे म्हणणारा कणकवलीतील युवा नेता आता शिवसेनेची साथ सोडून राष्ट्रवादीचे घड्याळ बांधण्याच्या तयारीत आहे. त्यामुळे त्याने आम्हांला निष्ठा शिकवू नये, असा टोला संदेश पारकर यांचे नाव न घेता जठार यांनी लगावला.भाजपमध्ये जुने-नवीन वाद नाहीतखासदार नारायण राणे हे आमचे भाजपचे नेते आहेत. ते भाजपवासी झाल्यानंतर राणेसमर्थक जिल्हा परिषद अध्यक्ष तर उपाध्यक्ष हा मूळ भाजपचा होईल, त्याचप्रमाणे चारही विषय समिती सभापती राणे समर्थक जिल्हा परिषद सदस्य होतील, असे ठरले होते. सभापती निवडीचे अधिकारही राणेंनाच आहेत. राष्ट्रवादीच्या अनिषा दळवी यांना सभापतीपद देण्यामागे राणेंची पुढील रणनीती आहे. त्या रणनीतीतून अनेकांची शिकार झालेली येत्या निवडणुकीत दिसून येईल. राणे यांनी धक्कातंत्र वापरून महाविकास आघाडीचा सदस्य फोडून त्यांनाच धक्का दिला आहे.

टॅग्स :BJPभाजपाPramod Jatharप्रमोद जठारsindhudurgसिंधुदुर्ग