शहरं
Join us  
Trending Stories
1
"रामराजेंनी मला फोन केला, उद्या त्यांच्याशी..."; अजित पवारांनी सोडलं मौन
2
"महाराष्ट्रात 'खोके आणि धोके' सरकार"; प्रियंका गांधींचं टीकास्त्र, व्हिडीओ केला शेअर
3
PM नरेंद्र मोदींची घटनात्मक पदावर २३ वर्षे पूर्ण, २००१ मध्ये पहिल्यांदा मुख्यमंत्री बनले!
4
अकोल्यात किरकोळ कारणांवरून दोन गटात वाद, हरिहर पेठ येथे दगडफेक, तणावपूर्व परिस्थिती
5
 उद्धव ठाकरेंची कार्यशैली म्हणजे ‘आपला तो बाब्या, दुसऱ्याचं ते कारटं’, श्रीकांत शिंदेंची टीका
6
"महत्वाच्या टप्प्यावर पोहोचले युद्ध!", इकडे झेलेंस्कींनी घोषणा केली; तिकडे युक्रेननं रशियाचा तेल डेपो उडवला!
7
इस्रायलवर दुहेरी वार! हिज्बुल्ला अन् हमासने एकत्रितपणे केला मिसाईल हल्ला; अनेक जण जखमी
8
मुंबई लुटतच नाहीत तर फुकटात द्यायचं काम होतंय; आदित्य ठाकरेंचा CM शिंदेंवर गंभीर आरोप
9
माओवाद्यांची पुरवठा साखळी तोडण्यात महाराष्ट्राला मोठे यश; मुख्यमंत्री शिंदेंचा दावा
10
धक्कादायक! हिमाचल प्रदेशमध्ये चीनने पाठवले ड्रोन, भारताच्या हद्दीत हेरगिरीचा प्रयत्न?    
11
रिओ ऑलिम्पिकचे पदक थोडक्यात हुकलेली जिम्नॅस्ट दीपा कर्माकरची ३१व्या वर्षी निवृत्तीची घोषणा
12
वैद्यकीय क्षेत्रातील 'नोबेल' जाहीर! अमेरिकन शास्त्रज्ञ व्हिक्टर अम्ब्रोस, गॅरी रुवकुन यांची निवड
13
"...म्हणून पांडुरंगाने ते (घड्याळ) काढून घेतलं"; इंदापुरात सुप्रिया सुळेंनी काय सांगितलं?
14
पाक शान-शफिकची जोडी जमली; पण सचिन-सेहवागच्या रेकॉर्ड पर्यंत नाही पोहचली
15
Maharashtra Vidhan Sabha: किरीट सोमय्यांवर आता भाजपाने सोपवली नवी जबाबदारी!
16
हर्षवर्धन पाटील यांचा पक्षप्रवेश होताच प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील म्हणाले, "इंदापूरचे हे महाधनुष्य..."
17
'सुट्टी'वरून राडा! शिक्षिकेची सहकारी शिक्षकाला मारहाण; व्हिडीओ व्हायरल
18
900% पर्यंत खटा-खट परतावा देणारे शेअर धडा-धड आपटले! 6 महिन्यात नाव बुडाली, लोकांवर डोक्याला हात लावायची वेळ आली
19
रिल बनवत होता ड्रायव्हर, तेवढ्यात विजेच्या खांबावर आदळली बस, ३ प्रवाशांचा मृत्यू 
20
कोहली, धोनीपेक्षा भारी ठरला हार्दिक पांड्या; सेट केला सिक्सरसह मॅच फिनिश करण्याचा नवा रेकॉर्ड

सिंधुदुर्गात भाजपा-ठाकरे गटात राडा: दोन्ही गटांकडून तक्रारी दाखल, २५-३० जणांविरोधात गुन्हा

By सुधीर राणे | Published: January 25, 2023 12:49 PM

कणकवली पोलीस ठाण्यात परस्परविरोधी तक्रारी दाखल

कणकवली: कनेडी येथे शिवसेना व भाजप कार्यकत्यांमध्ये मंगळवारी झालेल्या राड्याप्रकरणी कणकवली पोलीस ठाण्यात परस्परविरोधी तक्रारी दाखल करण्यात आल्या आहेत. यात शिवसेना कार्यकर्ता कुणाल सावंत याच्या तक्रारीनुसार जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष संदेश उर्फ गोट्या सावंत यांच्यासह चौघांवर, तर गोट्या सावंत यांच्या तक्रारीनुसार शिवसेना तालुकाप्रमुख प्रथमेश सावंत, पंचायत समितीचे माजी सदस्य मंगेश सावंत यांच्यासह २५- ३० जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.कुणाल सावंत (सांगवे) याच्या तक्रारीनुसार, तो कनेडी बाजारपेठ येथे रिक्षा चालवतो. कनेडी बाजारपेठ येथे भाजपतर्फे माघी गणेशजयंती उत्सव कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले असून त्याची तयारी सुरु आहे. काल, मंगळवारी सकाळच्या सुमारास कुणाल बाजारपेठेत रिक्षा लावून तेथील एका किराणा दुकानात जात होता. त्यावेळी संदेश उर्फ गोटया सावंत यानी 'तू तुझी रिक्षा सारखी वर-खाली घेऊन जात आहेस. त्यामुळे आमच्या गणेश जयंती कार्यक्रम तयारीत अडथळा येत आहे.' असे म्हटले. त्यावर कुणाल याने मला भाडे असेल, तर मी रिक्षा घेऊन जाणारच' असे सांगितले. त्यानंतर गोट्या सावंत यानी कुणालचा हात पिरगळत, कानाखाली मारली. कुणालने पळण्याचा प्रयत्न केला असता प्रफुल्ल काणेकर, मंगेश बोभाटे, किशोर परब यांनी पकडून काठीने मारहाण केली. संशयितांनी कुणालला ठार मारण्याची धमकी दिली. असे तक्रारीत म्हटले आहे.संदेश उर्फ गोट्या सावंत यांच्या तक्रारीनुसार, भाजप विभागीय कार्यालयाजवळ माघी गणेश जयंती उत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. सावंत हे कनेडी येथील भाजप कार्यालयाकडे जात होते, तेव्हा कुणाल रिक्षामधून सातत्याने फेऱ्या मारत होता. याबाबत गोट्या सावंत यांनी विचारणा केली असता कुणाल याने खुन्नस दिली व बाचाबाची केली.

त्यावेळी शिवसेना तालुकाप्रमुख प्रथमेश सावंत, पंचायत समिती माजी सदस्य मंगेश सावंत, कुणाल सावंत, योगेश वाळके, अविनाश सावंत, मुकेश सावंत, उत्तम लोके, राजू पाटील, संदीप गावकर, पद्माकर पांगम यांच्यासह २५ - ३० जण भाजप कार्यालयात आले. त्यांनी कुणाल सावंत याला मारहाण  केल्याबाबत गोट्या सावंत यांना जाब विचारत धक्काबुक्की केली असे तक्रारीत म्हटले आहे. या तक्रारीवरून पोलिसांनी दोन्ही बाजूच्या कार्यकर्त्यांवर गुन्हे दाखल केले आहेत.

टॅग्स :sindhudurgसिंधुदुर्गCrime Newsगुन्हेगारीBJPभाजपाShiv Senaशिवसेना