कणकवली : कणकवली तालुक्यातील लोरे नंबर १ व हळवल ग्रामपंचायतींच्या पोटनिवडणुकीत भाजप पुरस्कृत दोन्ही उमेदवार विजयी झाले. या दोन ग्रामपंचायतीच्या पोटनिवडणुकीसाठी काल, मंगळवारी मतदान प्रक्रिया पार पडली होती. आज, बुधवारी सकाळी कणकवली तहसील कार्यालयात मतमोजणी झाली.हळवल ग्रामपंचायतच्या पोटनिवडणुकीत भाजप पुरस्कृत उमेदवार सुदर्शन राणे यांनी नामदेव राणे यांचा पराभव केला. सुदर्शन राणे यांना २३० मते तर नामदेव राणे यांना १८७ मते मिळाली. तीन मतदारांनी नोटाचा वापर केला.लोरे ग्रामपंचायतच्या प्रभाग क्रमांक ३ च्या पोटनिवडणुकीत भाजप पुरस्कृत काशीराम नवले यांनी संदीप नराम यांचा पराभव केला. काशिराम नवले यांना २२२ मते तर केशव नराम यांना ११० मते मिळाली. ३ मतदारांनी नोटाचा वापर केला. मतमोजणी ठिकाणी कणकवली तालुका निवडणूक अधिकारी तथा तहसीलदार आर.जे.पवार, हळवल येथे निवडणूक निर्णय अधिकारी विलास निकुम तर लोरे नंबर १ येथे रवी मेस्त्री, मतमोजणी सहाय्यक अधिकारी (हळवल) गणेश गोडे, सातारकर(लोरे),नायब तहसीलदार राठोड हे उपस्थित होते. यावेळी कणकवली तहसील कार्यालय परिसरात कडक पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता. दरम्यान, निकालानंतर भाजप कार्यकर्त्यांनी जल्लोष केला. तसेच आमदार नितेश राणे यांनी विजयी उमेदवारांचे अभिनंदन केले.
कणकवली तालुक्यातील ग्रामपंचायत पोटनिवडणुकीत भाजपची बाजी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 22, 2021 12:46 PM