चिपळूण : ग्रामपंचायत निवडणुकीत भाजपाने जोरदार मुसंडी घेत आपले उमेदवार विजयी केले आहेत. तसेच मागील २५ वर्षांपासून ग्रामीण स्तरावर भाजपाचा एकही सदस्य नसतानाही माधव गवळी यांनी अनेक ग्रामपंचायतींमध्ये उमेदवार उभे करण्याचे धाडस दाखवले आणि त्यात भाजपला यश मिळाले आहे.विधानसभेतील अपयशानंतरही गवळी यांनी भाजपची संघटनात्मक वाढ करण्यासाठी तालुक्यात आपले विशेष प्रयत्न सुरू ठेवले आहेत. पुढील पंचायत समिती आणि जिल्हा परिषद डोळ्यासमोर ठेवून कार्यकर्त्यांना ताकद देण्याचे काम त्यांनी सुरू ठेवले आहे.भाजपने तालुक्यातील सर्व जागा स्वबळावर लढवून मोठे यश मिळवले आहे. प्रत्येक ग्रामपंचायतीत भाजपने आपले कार्यकर्ते उभे केले होते. या कार्यकर्त्यांशी गवळी सातत्याने संपर्क ठेवून होते. सद्यस्थितीत भाजपच्या खात्यावर केवळ २१ सदस्य दिसत असले तरी हे यश पहिल्याच प्रयत्नात मिळालेले आहे. त्यामुळे आपल्यासाठी ते महत्त्वाचे असल्याचे गवळी यांनी सांगितले. (प्रतिनिधी)आकले३कादवड२कुडप२कुशिवडे३कोंडफणसवणे१कोंडमळा२कोळकेवाडी२तळवडे२तिवरे४दळवटणे४नांदिवसे२पेढांबे२मोरवणे२येगाव२रिक्टोली३कोंडिवरे १४४ ग्रामपंचायतीत भाजपच्या २१ उमेदवारांचा विजय
ग्रामपंचायत राजकारणात भाजपचा चंचुप्रवेश
By admin | Published: April 27, 2015 10:15 PM